Pankaja Munde Speech : मी रडून मत मागत नाही, मला शेवटची संधी द्या, सर्वांसमोर पदर पसरते : पंकजा मुंडे
Pankaja Munde Speech : मी पदर पसरवून एवढंच म्हणेन की, शेवटची संधी मला द्या. पुढच्या वेळी तुम्हाला जो खासदार पाहिजे असेल त्याच्यासाठी रात्रंदिवस एक करेन आणि घाम गाळेन.
Pankaja Munde Speech : "मी पदर पसरवून एवढंच म्हणेन की, शेवटची संधी मला द्या. पुढच्या वेळी तुम्हाला जो खासदार पाहिजे असेल त्याच्यासाठी रात्रंदिवस एक करेन आणि घाम गाळेन. पण मला आज शेवटची संधी द्या. मराठा बांधव असतील, धनगर बांधव असतील सर्वांना मी पदर पसरवून विनंती करत आहे. मला पैसे कमवायचे नाहीत किंवा प्रसिद्धी मिळवायची नाही. माझ्या ह्रदयात काटा घुसला", असे भाजपच्या बीड लोकसभेच्या उमेदवार पंकजा मुंडे (Pankaja Munde) म्हणाल्या. पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी बीड लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर त्या बोलत होत्या. यावेळी पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार बजरंग सोनवणे (Bajrang Sonwane) यांच्यावरही जोरदार टीका केली होती.
मी म्हणजे गोपीनाथ मुंडे असं मी म्हणणार नाही
पंकजा मुंडे म्हणाल्या, मी रडून मतं मागत नाही. माझं पुढे ऐका. पंकजा मुंडेंना मतदाना गोपीनाथ मुंडे मतदान, असं मी म्हणणार नाही. माझ्या वडिलांचा चुकून काही अवमान व्हायचा असेल तर तो मी या जन्मात करणार नाही. मी म्हणजे गोपीनाथ मुंडे असं मी म्हणणार नाही. पण गोपीनाथ मुंडेंची स्वप्न माझ्या डोळ्यात आहेत. जे त्यांनी तुमच्यासाठी पाहिले होते. ते पूर्ण करायची अशी संधी पुन्हा तुम्हाला मिळणार नाही, असं आवाहन पंकजा मुंडे यांनी केले.
मला बंगले बांधायचे नाहीत, गाड्या घ्यायच्या नाहीत
पुढे बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या, घडी गेली की, पिढी जाते. पाच वर्षे मी घरी बसू शकले. पण तुमच्यासाठी तळतळ जीव तुटत होता. मला बंगले बांधायचे नाहीत. मला काही गाड्या घ्यायच्या नाहीत. मला काहीच नकोय. मला खायला प्यायला व्यवस्थित आहे. एक रुपयाची लालच नाही. मला तुम्हाला तुम्हाला सांगायचे आहे की, दुध पोळल्यानंतर माणूस ताकही फुंकून पितो, असंही मुंडे यांनी सांगितले. शिवाय प्रीतम मुंडे यांची चिंता करु नका, मी त्यांना नाशिकमधून उभी करेन, असंही पंकजा मुंडे यांनी काही दिवसांपूर्वी म्हटलं होतं.
इतर महत्वाच्या बातम्या