![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Bhaskar Bhagare on Majha Katta : उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी एकदाच शरद पवारांना भेटलो होतो, माझ्यापेक्षा त्यांना विजयाची खात्री होती : भास्कर भगरे
Bhaskar Bhagare on Sharad Pawar, Majha Katta : "शरद पवार यांना भेटण्याचा योग उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी एकदाच आला होता. फॉर्म भरला नव्हता त्याच्या अगोदर एकदा भेटलो होतो."
![Bhaskar Bhagare on Majha Katta : उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी एकदाच शरद पवारांना भेटलो होतो, माझ्यापेक्षा त्यांना विजयाची खात्री होती : भास्कर भगरे Bhaskar Bhagare on Majha Katta I met Sharad Pawar once before filing nomination form, he was more sure of victory than me Bhaskar Bhagare Marathi News Bhaskar Bhagare on Majha Katta : उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी एकदाच शरद पवारांना भेटलो होतो, माझ्यापेक्षा त्यांना विजयाची खात्री होती : भास्कर भगरे](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/06/d901b180975b0dabd1d0ee85ea0a072c1720288791828924_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Bhaskar Bhagare on Sharad Pawar, Majha Katta : "शरद पवार यांना भेटण्याचा योग उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी एकदाच आला होता. फॉर्म भरला नव्हता त्याच्या अगोदर एकदा भेटलो होतो. प्रचाराच्या काळात स्टेजवर त्यांच्याजवळ बसण्याची संधी मिळाली. पण तेव्हा बोलण्याची संधी मिळाली नव्हती. जे लोक शरद पवारांना भेटायला जायचे ते सांगायचे की दिंडोरीची जागा निवडून येणार आहे. माझ्यापेक्षा शरद पवारांना ही जागा निवडून येईल याची खात्री होती. ते अनेक वर्षांपासून राजकारणात आहेत, लोकांशी संपर्क आहे. त्यांच्याबद्दल आपण कितीही बोललं तरी कमीच होणार आहे, असे दिंडोरीचे खासदार भास्कर भगरे म्हणाले. ते माझा कट्टावर बोलत होते.
सर्वसामान्य माणूस उमेदवार होऊ शकतो, निवडून येऊ शकतो
भास्कर भगरे म्हणाले, निवडून आल्यानंतर पहिल्यांदा शरद पवारांना भेटलो. त्यांचे आशीर्वाद घेतले. फारकाही बोलता आलं नाही. मात्र, आता साहेबांचा फोन येतो. साहेबांना संसदेत भेटता येतं. शरद पवार त्यांच्याकडे भेटायला येणाऱ्या प्रत्येकाला सांगतात. सर्वसामान्य माणूस उमेदवार होऊ शकतो, निवडून येऊ शकतो. याचे उदाहरण असेल तर भगरे सर आहेत. हे कोणी करु शकतं तर पवार साहेब करु शकतात.
ऐरणीवर घाव घातले जातात ते सोसण्याची तयारी मी ठेवलीये
पुढे बोलताना भगरे म्हणाले, वीस लाख मतदारांचा प्रतिनिधी म्हणून मला काम करण्याची संधी दिली आहे. संसदेत जनतेच्या विरोधात तयार होतं असेल तर ऐरणीवर घाव घातले जातात ते सोसण्याची तयारी मी ठेवलीये. म्हणूनच आजपर्यंत मी इथपर्यंत आलो आहे. मला हातोडा मारण्याची वेळ आली तरी मी ती करणार आहे.
दुसरी हरितक्रांती घडवण्याचं काम शरद पवारांनी केलं
देशाला न लाभलेले पंतप्रधान म्हणून शरद पवारांकडे पाहिलं जातं. त्यांनी शेतकऱ्यांसाठी जेवढं केलं, तेवढं देशामध्ये कोणीच केलं नाही. त्यामुळे पवार साहेबांसारखा नेता होणे नाही. दुसरी हरितक्रांती घडवण्याचं काम शरद पवारांनी केलं. दुसऱ्या बाजूला अजित पवार आहेत, त्यांच्याबद्दल बोलायची मला काही आवश्यकता वाटत नाही, असंही भास्कर भगरे यांनी सांगितलं.
इतर महत्वाच्या बातम्या
Eknath Shinde on Nana Patole : मोदींवर भ्रष्टाचाराचे आरोप केल्याने एकनाथ शिंदे नाना पटोलेंवर भडकले, म्हणाले "डोक्यावर पडलात का?"
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)