Eknath Shinde on Nana Patole : मोदींवर भ्रष्टाचाराचे आरोप केल्याने एकनाथ शिंदे नाना पटोलेंवर भडकले, म्हणाले "डोक्यावर पडलात का?"
Eknath Shinde on Nana Patole, Mumbai : काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर भ्रष्टाचाराचे आरोप केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चांगलेच भडकले आहेत.
Eknath Shinde on Nana Patole, Mumbai : काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर भ्रष्टाचाराचे आरोप केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चांगलेच भडकले आहेत. नरेंद्र मोदी भ्रष्टाचाराचे सरदार आहेत, असं नाना पटोले म्हणाले होते. त्यानंतर एकनाथ शिंदेंनी नाना पटोलेंना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. "तुम्ही डोक्यावर पडलात की कशावर पडलात?"असा सवाल एकनाथ शिंदेंनी केला आहे. शासकीय योजना व अंमलबजावणी संदर्भात राज्यस्तरीय महायुती पदाधिकाऱ्यांची बैठक षण्मुखानंद सभागृह, मुंबई येथे पार पडली. यावेळी ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह इतर महायुतीचे नेते उपस्थित होते.
दोन वर्षांपूर्वी जनमतासोबत झालेल्या विश्वासघाताचा बदला घेतला
एकनाथ शिंदे म्हणाले, महाविकास आघडीला माहिती नव्हते त्यांचे सरकार जाईल. दोन वर्षापूर्वी राज्याने मोठा उठाव पाहिला. मतदारांसोबत झालेल्या विश्वास घाताबाबत तो उठाव होता. देवेंद्र फडणवीस यांची मला भक्कम साथ लाभली. भाजपच्या कार्यकर्त्यांनी मला भरपूर प्रेम दिले. मोदी आणि अमित शाह पाठीशी उभे राहिले. आपले सरकार यायच्या आधी सर्व कामे ठप्प होती. सगळीकडे स्पीड ब्रेकर टाकले होते. फक्त फेसबुक लाईव्ह सुरू होते. दोन वर्षांपूर्वी जनमतासोबत झालेल्या विश्वासघाताचा बदला घेतला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भक्कम साथ मला लाभली. भाजपच्या नेत्या आणि पदाधिकाऱ्यांनी मला भरपूर प्रेम आणि सहकार्य दिलं. मोदी शाह चट्टान की तरह माझ्यासोबत उभे राहिले, असेही एकनाथ शिंदे म्हणाले.
अर्थसंकल्पातील योजना पाहून विरोधकांचे चेहरे पांढरे पडले
अर्थसंकल्पातील योजना पाहून विरोधकांचे चेहरे पांढरे पडले. आम्ही आधी पैशांची तरतूद केली, नियमांचं पालन केले आणि मगच योजना आणल्या. मोदी जिंकले म्हणून की पराभवाची हॅट्ट्रिक केली म्हणून आपण गाफील राहिलो. आपले लोक तीन दिवस सुट्ट्या घेऊन गेले, येणार तर मोदीच यावर लोक गाफील राहिले. 60 टक्के मतदान झालं असतं तर 40 जागा आल्या असत्या. फसवणूक एकदाच होते, नेहमीनेहमी नाही, असंही शिंदे यांनी सांगितले.
एकनाथ शिंदे म्हणाले, वैयक्तिक लाभाची कामे आम्ही केली नाहीत. सोन्याचा चमचा घेऊन आम्ही जन्माला आलो नाही, पण लोकांच्या आयुष्यचं सोनं करण्याचं काम आम्ही करतोय. नाना पटोले यांनी मोदींवर भ्रष्टाचाराचा आरोप केला. तुम्ही डोक्यावर पडला काय ? बोफोर्सपासून शेणापर्यंत तुम्ही पैसे खाल्लेत. तुम्हाला बोलण्याचा अधिकार आहे का? आता फुलप्रुफ काम करायचं आहे, विरोधकांना संधी द्यायची नाही, असं आवाहनही एकनाथ शिंदे यांनी केले.
इतर महत्वाच्या बातम्या