Bhandara Zilla Parishad : भाजपला मोठा धक्का, उद्या अध्यक्षपदाची निवडणूक अन् आज माहेश्वरी नेवारे यांचं जिल्हा परिषद सदस्यत्व रद्द
Bhandara Zilla Parishad : भंडाऱ्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनीही विभागीय आयुक्तांचा निर्णय कायम ठेवत भाजपच्या महिला जिल्हा परिषद सदस्य माहेश्वरी नेवारे यांचं जिल्हा परिषद सदस्यत्व रद्द केलं आहे
Bhandara Zilla Parishad : भाजपच्या जिल्हा परिषद सदस्य माहेश्वरी नेवारे यांचं जात वैधता प्रमाणपत्र विभागीय आयुक्तांनी रद्द केलं होतं. या आदेशाविरोधात माहेश्वरी नेवारे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली होती. मात्र, ती याचिका फेटाळल्यानंतर आता भंडाऱ्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनीही विभागीय आयुक्तांचा निर्णय कायम ठेवत भाजपच्या महिला जिल्हा परिषद सदस्य माहेश्वरी नेवारे यांचं जिल्हा परिषद सदस्यत्व रद्द केलं आहे. यामुळं उद्या होणाऱ्या भंडारा जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडीच्या विशेष सभेत उपस्थित राहता येणार नाही, असे आदेश भंडारा जिल्हाधिकाऱ्यांनी माहेश्वरी नेवारे यांना नोटीसद्वारे बजावले आहे.
काँग्रेसचा अध्यक्षपदाचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता
दरम्यान, माहेश्वरी नेवारे यांचं सदस्यत्व जिल्हाधिकाऱ्यांनी रद्ध ठरवल्यामुळे भाजपला हा मोठा धक्का मानल्या जातो. जिल्हा परिषद अध्यक्षपद हे अनुसूचित जमाती करिता राखीव होतं आणि माहेश्वरी नेवारे या भाजपकडून जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या प्रबळ दावेदार होत्या. मात्र, आता भंडारा जिल्हाधिकारी यांनी नेवारे यांचं निवडणुकीत सहभागी होता येणार नसल्याचं सांगितल्याने काँग्रेसचा अध्यक्षपदाचा मार्ग आता मोकळा झाला आहे. उद्या होणाऱ्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीवर याचा काय परिणाम पडतो, याकडं आता सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. मात्र, नेवारे यांचं सदस्यत्व रद्द झाल्यानं भाजपला हा फार मोठा धक्का मानला जातो.
कोण आहेत माहेश्वरी नेवारे?
# साकोली तालुक्यातील किन्ही एकोडी जिल्हा परिषद गावातून त्या अनुसूचित जमातीच्या आरक्षित जागेवर निवडून आल्यात.
# त्यांच्याकडं गोंडगोवारी या जात प्रमाणपत्रावर जिल्हा परिषद सदस्य म्हणून भाजपच्या तिकिटावर निवडून आल्यात.
# माहेश्वरी नेवारे यांचं जात वैधता प्रमाणपत्र 14 जानेवारीला गोंदियाच्या जात पडताळणी समितीनं रद्द केलं होतं.
# जात वैधता पडताळणी समितीच्या विरोधात नेवारी यांनी विभागीय आयुक्त कार्यालयात याचिका दाखल केली होती. मात्र, त्यात नेवारे यांचं जात वैधता प्रमाणपत्र रद्द करून त्यांचा सदस्यत्व ही रद्द केलं होतं.
# या निर्णयाच्या विरोधात नेवारे यांनी नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली मात्र ती आता फेटाळण्यात आली. त्यामुळे भंडारा जिल्हाधिकाऱ्यांनी नागपूर विभागीय आयुक्तांचा निर्णय कायम ठेवला आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
चंद्रपूरमध्ये कार आणि ऑटोचा भीषण अपघात, 2 महिलांचा जागीच मृत्यू तर 15 जण जखमी