एक्स्प्लोर

बीडमधील राजकीय वातावरण तापलं; पंकजांना धोका देणाऱ्या खांडेविरोधात मुंडे समर्थक आक्रमक, कार्यालयाची तोडफोड

मुंडे समर्थकांकडून जिल्ह्यात संताप व्यक्त केला जातोय. कुंडलिक खांडे यांच्याशी अद्याप संपर्क होऊ शकला नसून ते मुंबईत असल्याची माहिती त्यांच्या कार्यकर्त्याकडून देण्यात आलेली आहे.

बीड :  शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे  जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे (Kundlik Khade)  यांची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर बीडमधील (Beed)  मुंडे समर्थक चांगलेच आक्रमक  झाले आहे. बीड शहरातील जालना रोडवर असलेल्या खांडे यांच्या कार्यालयावर  दगडफेक करण्यात आली असून ऑफिसची तोडफोड करण्यात आली आहे. बीडचे खासदार बजरंग सोनवणेंना (Bajrang Sonawane)   कुंडलिक खांडेंची  कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. एबीपी माझा या कथित ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही.

कथित व्हायरल क्लिपनंतर आज मुंडे समर्थकांनी कुंडलिक खांडे यांचं कार्यालयाची तोडफोड केली आहे. जालना रोड परिसरात कुंडलिक खांडे यांचं कार्यालय आहे. आणि याच कार्यालयाची तोडफोड मुंडे समर्थकांनी केलीय. कथित ऑडिओ क्लिप मध्ये कुंडलिक खांडे पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडेयांच्या बाबत बोलत आहेत. यानंतर मुंडे समर्थकांकडून जिल्ह्यात संताप व्यक्त केला जातोय. कुंडलिक खांडे यांच्याशी अद्याप संपर्क होऊ शकला नसून ते मुंबईत असल्याची माहिती त्यांच्या कार्यकर्त्याकडून देण्यात आलेली आहे.

काय आहे व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये?

कुंडलिक खांडे यांच्यासोबत एका राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याची चर्चा चालू असताना निवडणुकीपूर्वीच बजरंग सोनवणे यांना त्यांनी कशी मदत करायची हे सांगतानाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. या ऑडिओतून दोघांमधील संवाद ऐकायला मिळत आहे. तर, दुसरी ऑडिओ क्लिप ही मतमोजणीनंतरची आहे, ज्यामध्ये म्हाळस जवळा या कुंडलिक खांडेंच्या मूळ गावातून पंकजा मुंडेंना मुद्दामून लीड दिली. कारण, ओबीसी मताचा आपल्याला फायदा होऊ शकतो हे सांगत असताना बीड विधानसभा मतदारसंघातील सगळ्या बुथवर कशाप्रकारे बजरंग सोनवणे यांच्यासाठी त्यांनी फिल्डिंग लावल्याचं ते सांगत आहेत. त्यामध्ये, धनंजय मुंडे आणि त्यांचे सहकारी वाल्मिक कराड त्यांच्याबाबतीत बोलत त्यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आल्याचंही बोलत आहेत.

नेमकं प्रकरण काय?

बीडचे शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे आणि राष्ट्रवादीच्या शरदचंद्र पवार पक्षाचे शिवराज बांगर यांची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे. या कथित ऑडिओ क्लिपमध्ये राष्ट्रवादीच्या शरदचंद्र पवार पक्षाचे लोकसभेचे उमेदवार बजरंग सोनवणेंना मदत केल्याची कबुली  कुंडलिक खांडे देत आहेत. तसेच या कथित ऑडिओ क्लिपमध्ये राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर हल्ला करण्याची भाषा करत आहेत. निवडणूक निकालापूर्वी झालेल्या या कथित संभाषणाची ऑडिओ क्लिप आता व्हायरल झालीय. त्यामुळे याची बीडच्या राजकारणात जोरदार चर्चा सुरु आहेत. 

हे ही वाचा :

पंकजाताईंसाठी 'दादा' समर्थक रस्त्यावर; परळीत सुषमा अंधारेंच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन, घोषणाबाजी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Mohol Case: खून का बदला खून से! शरद मोहोळच्या हत्येचा बदला घेण्यासाठी दोघांचं प्लॅनिंग; पण पोलिसांनी....,वाचा स्पेशल रिपोर्ट
खून का बदला खून से! शरद मोहोळच्या हत्येचा बदला घेण्यासाठी दोघांचं प्लॅनिंग; पण पोलिसांनी....,वाचा स्पेशल रिपोर्ट
आदित्य ठाकरेंची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पण काम एकनाथ शिंदेंच्या खात्याचं; गप्पांची 'चर्चा तर होणारच'
आदित्य ठाकरेंची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पण काम एकनाथ शिंदेंच्या खात्याचं; गप्पांची 'चर्चा तर होणारच'
बुलढाण्यातील केस गळती प्रकरणात मोठी अपडेट, पाण्याच्या अहवालात धक्कादायक माहिती उघड
बुलढाण्यातील केस गळती प्रकरणात मोठी अपडेट, पाण्याच्या अहवालात धक्कादायक माहिती उघड
Torres Scam : टोरेसच्या दादरच्या कार्यालयात 5 ते 6 कोटींची रोकड, EOW चं पथक पंचनाम्यासाठी दाखल, तीन बँक खाती सील
टोरेसच्या दादरच्या कार्यालयात 5 ते 6 कोटींची रोकड, EOW चं पथक पंचनाम्यासाठी दाखल, तीन बँक खाती सील
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 09 Jan 2025 : ABP MajhaSanjay Raut PC : दिल्लीत काँग्रेस- आपमध्ये जे घडलं तसं मुंबईतही होऊ शकतं; राऊतांचा काँग्रेसला इशाराPune : 5 जानेवारीला Sharad Mohol हत्येला वर्ष,हत्येचा बदला घेण्यासाठी दोघांचं प्लॅनिंग;पोलिसांची अटकDelhi Anil Desaiदिल्लीत मतांचं विभाजन होणार नाही;आपचा महाराष्ट्राच्या निवडणुकीत आम्हाला पाठिंबा होता

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Mohol Case: खून का बदला खून से! शरद मोहोळच्या हत्येचा बदला घेण्यासाठी दोघांचं प्लॅनिंग; पण पोलिसांनी....,वाचा स्पेशल रिपोर्ट
खून का बदला खून से! शरद मोहोळच्या हत्येचा बदला घेण्यासाठी दोघांचं प्लॅनिंग; पण पोलिसांनी....,वाचा स्पेशल रिपोर्ट
आदित्य ठाकरेंची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पण काम एकनाथ शिंदेंच्या खात्याचं; गप्पांची 'चर्चा तर होणारच'
आदित्य ठाकरेंची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पण काम एकनाथ शिंदेंच्या खात्याचं; गप्पांची 'चर्चा तर होणारच'
बुलढाण्यातील केस गळती प्रकरणात मोठी अपडेट, पाण्याच्या अहवालात धक्कादायक माहिती उघड
बुलढाण्यातील केस गळती प्रकरणात मोठी अपडेट, पाण्याच्या अहवालात धक्कादायक माहिती उघड
Torres Scam : टोरेसच्या दादरच्या कार्यालयात 5 ते 6 कोटींची रोकड, EOW चं पथक पंचनाम्यासाठी दाखल, तीन बँक खाती सील
टोरेसच्या दादरच्या कार्यालयात 5 ते 6 कोटींची रोकड, EOW चं पथक पंचनाम्यासाठी दाखल, तीन बँक खाती सील
मालेगावात बांग्लादेशी रोहिग्यांना जन्मदाखला, गृह विभागाकडून एसआयटीची घोषणा, समितीच्या अध्यक्षांना पत्रव्यवहारच नाही, तपासाबाबत प्रश्नचिन्ह
मालेगावात बांग्लादेशी रोहिग्यांना जन्मदाखला, गृह विभागाकडून एसआयटीची घोषणा, समितीच्या अध्यक्षांना पत्रव्यवहारच नाही, तपासाबाबत प्रश्नचिन्ह
Delhi Assembly Election 2025: अगोदरच उतरती कळा, त्यात पृथ्वीबाबांच्या वक्तव्याने गदारोळ, संजय राऊत म्हणाले, खरं आहे, आता पृथ्वीराज चव्हाण म्हणतात....
अगोदरच पक्षाला उतरती कळा, त्यात पृथ्वीबाबांच्या वक्तव्याने गदारोळ, वादानंतर पृथ्वीराज चव्हाण म्हणाले,....
पानाच्या पिचकाऱ्यांनी भिंती लाल भडक,तंबाखूच्या पुड्या, कचरा..सरकारी इमारत आहे की खंडर?
पानाच्या पिचकाऱ्यांनी भिंती लाल भडक,तंबाखूच्या पुड्या, कचरा..सरकारी इमारत आहे की खंडर?
Torres Scam : 13.76 कोटींचं बोगस कर्ज, 75 किलो सोनं,25 किलो चांदी बेकायदेशीरपणे भारतात, टोरेस घोटाळा प्रकरणी धक्कादायक माहिती 
75 किलो सोनं बेकायदेशीरपणे भारतात, मुंबईतल्या काळंबादेवीतील ज्यूसच्या दुकानाशी कनेक्शन? टोरेस घोटाळ्याप्रकरणी नवी अपडेट
Embed widget