देशहित न पाहता, स्वत:चं नाव होण्यासाठी बोलून हिनवण्याचा प्रकार असेल तर रामगिरी महाराजांवर कारवाई करा, बच्चू कडूंची मागणी
Bachchu Kadu on Ramgiri Maharaj : "राजकीय लोक संत, महात्मा, महापुरुष, दैव, अल्ला, ज्यांच्यावर लोकांची श्रद्धा असेल त्यांच्या व्यक्तिगत जीवनामध्ये जाऊन ते खरं की खोटं न तपासता बोलतात त्याला काही अर्थ नाही. जाणीवपूर्वक देशहित न बघता मुद्दाम कुठेतरी आपलं नाव मोठं व्हावं यासाठी बोलून हिनवण्याचा प्रयत्न होत असेल तर त्यावर कारवाई व्हायला पाहिजे"
Bachchu Kadu on Ramgiri Maharaj : "राजकीय लोक संत, महात्मा, महापुरुष, दैव, अल्ला, ज्यांच्यावर लोकांची श्रद्धा असेल त्यांच्या व्यक्तिगत जीवनामध्ये जाऊन ते खरं की खोटं न तपासता बोलतात त्याला काही अर्थ नाही. जाणीवपूर्वक देशहित न बघता मुद्दाम कुठेतरी आपलं नाव मोठं व्हावं यासाठी बोलून हिनवण्याचा प्रयत्न होत असेल तर त्यावर कारवाई व्हायला पाहिजे", असे आमदार बच्च कडू म्हणाले आहेत. रामगिरी महाराजांनी धर्माबाबत वादग्रस्त वक्तव्य केले आणि त्यामुळे दोन शहरात तणाव निर्माण झाला. त्यानंतर बच्चू कडू यांनी एबीपी माझाशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे.
तिशय जोमदारपणे आता बॅटिंग करावी लागणार आहे
बच्चू कडू म्हणाले, निवडणूक आयोगाचे आभार मानतो. शोभेल असं चिन्ह आम्हाला दिलं. खऱ्या अर्थाने चौकार आणि षटकार आता मारणार आहोत. अतिशय जोमदारपणे आता बॅटिंग करावी लागणार आहे. शेतकरी शेतमजूर कष्टकरी कामगार दिव्यांग यांना सोबत घेऊन रन रेट आम्ही वाढवणार आहोत. दरवेळी निवडणूक लढवताना आमचा चिन्ह बदललं पण मतदार बदलला नाही. मताधिक्य पण बदललं नाही. या निवडणुकीत बॅट मात्र आता करिष्मा दाखवेल, असंही बच्चू कडू यांनी सांगितलं.
रामगिरी महाराजांच्या वक्तव्यामुळे दोन शहरांमध्ये तणाव
महंत रामगिरी महाराज (Ramgiri Maharaj) यांनी नाशिकच्या (Nashik) सिन्नर तालुक्यातील पंचाळे गावामध्ये प्रवाचनाच्या दरम्यान एका धर्माविषयी वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यानंतर या वक्तव्यामुळे छत्रपती संभाजीनगरच्या (Chhatrapati Sambhajinagar) वैजापूरमध्ये तणाव निर्माण झाला होता. वैजापूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये रात्री आठच्या दरम्यान जमाव आला आणि त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी टायरही जाळण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी महंत रामगिरी महाराज यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. मात्र, तरीही रामगिरी महाराज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासोबत व्यासपीठावर पाहायला मिळाले.
View this post on Instagram
View this post on Instagram
इतर महत्वाच्या बातम्या
Ramgiri Maharaj : धर्माविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे गुन्हा दाखल, एकनाथ शिंदेंसोबत व्यासपीठावर, कोण आहेत रामगिरी महाराज?