एक्स्प्लोर

Maharashtra Politics: पालकमंत्री, जनता दरबार ते शिवसेनेचा 'नवा उदय', एकनाथ शिंदेंना डिवचण्याचा महायुतीचाच डाव?

मुख्यमंत्रीपद सोडावं लागल्यानंतर शिंदे यांचा नाराजीचा सूर सातत्याने चर्चेत राहिला. नंतर राजकीय समिकरणं इतकी बदलली की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदें राजकारणातून बाहेर फेकले जात असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत.

Maharashtra Politics: महाराष्ट्राच्या राजकारणात  वेगाने  हालचाली सुरू आहेत. मुख्यमंत्री पदावरून थेट उपमुख्यमंत्री पदावर आलेल्या एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना सत्तेतील मित्र पक्षांकडूनच अडचणी येत असल्याची चर्चा रंगली आहे. लोकसभा निवडणुकीनंतर लोकसभा निवडणुकीनंतर समीकरणं बदलली असून, त्याचा फटका शिंदेंना बसत असल्याचं बोललं जात आहे. विधानसभेनंतर राजकीय समिकरणं इतकी बदलली आहेत की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदें राजकारणातून बाहेर फेकले जात असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. पालकमंत्रीपद, जनता दरबार ते शिवसेनेतला 'नवा उदय'अशा चर्चांनी एकनाथ शिंदेंना डिवचण्याचा प्रयत्न सुरु असल्याची चर्चा आहे. (Politics)

मुख्यमंत्रीपद सोडावं लागल्यानंतर शिंदे यांचा नाराजीचा सूर सातत्याने चर्चेत राहिला. दिल्लीच्या फेऱ्या वाढल्या, संपर्क होत नाही, या चर्चांदरम्यानच गिरीश महाजन थेट त्यांच्या घरी जाऊन भेटले. त्यानंतर शिंदेंनी पत्रकार परिषद घेतली, पण त्यांचं समाधान झालं का, हा प्रश्न कायम राहिला. मंत्रिमंडळ विस्तारातही त्यांना फारसं महत्त्व मिळालं नाही. शिवसेनेच्या माजी मंत्र्यांना संधी दिली नाही, गृहमंत्रीपद फडणवीसांकडेच राहिलं, महसूल आणि सार्वजनिक बांधकाम खातंही भाजपने स्वतःकडेच ठेवलं. रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रीपदावर राष्ट्रवादीच्या नेत्यांची वर्णी लागली, आणि शिंदेंच्या मावळ्यांचा पत्ता कट झाला. (Gurdian Minister)

‘नवा उदय’ आणि शिंदेंभोवती राजकीय संकट?

उद्योगमंत्री उदय सामंत हे मुख्यमंत्र्यांसह दावोस दौऱ्यावर गेले आणि शिवसेनेत ‘नवा उदय’ होणार असल्याच्या चर्चांनाही उधाण आलं. सामंत हे 20 आमदारांसह वेगळा गट काढणार का? अशा चर्चा राजकीय वर्तुळात चांगल्याच रंगल्या. यावर सामंत यांनी परदेशातूनच खुलासा करत चर्चांना पूर्णविराम द्यायचा प्रयत्न केला, पण शिंदेंना मात्र या चर्चांमधून चांगलंच डीवचण्यात आलं.

कालच्या कॅबिनेट बैठकीला शिंदे ऑनलाइन हजर होते. यावरूनही राजकीय चर्चांना उधाण आलं. ‘शिंदे मागे का?’ हा प्रश्न विचारला जातोय. यातच भाजपचे ज्येष्ठ नेते आणि पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी ठाण्यात जनता दरबार घेणार असल्याचं जाहीर केलं. भाजप आता ठाण्यातही शिंदेंना आव्हान देणार का, हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

अजित पवारांचा नवा डाव?

त्यातच अजित पवार यांनी मंत्रालयात ठाण मांडला, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची भेट घेतली. मात्र पण रायगडच्या शिवसेनेच्या दोन आमदारांना आणि एका मंत्र्याला भेट दिली नाही. शिंदेंवर दबाव वाढवण्यासाठीच हा नवा राजकीय डाव असल्याचं बोललं जातंय. शिंदेंभोवतीचा तणाव वाढत आहे. भाजपने ठाण्यात वेगळीच खेळी सुरू केलीय. आता हे वाद किती वाढतात आणि शिंदे त्यातून कसे बाहेर पडतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

हेही वाचा:

Eknath Shinde VS BJP : शिंदेंच्या बालेकिल्ल्यात नाईकांचा जनता दरबार, सेनेचं ठाण्यातील वर्चस्व कमी करण्यासाठी भाजपची फिल्डिंग

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Shiv Sena : नाशिकच्या शिवसेनेला गटबाजीचे ग्रहण, शिवसैनिक संभ्रमात; एकनाथ शिंदे भाकरी फिरवणार?
नाशिकच्या शिवसेनेला गटबाजीचे ग्रहण, शिवसैनिक संभ्रमात; एकनाथ शिंदे भाकरी फिरवणार?
Ind vs Eng 4th T20 : हार्दिक पांड्या OUT, 'या' 3 खेळाडूंची एन्ट्री... कर्णधार सूर्या घेणार मोठा निर्णय; चौथ्या टी-20 सामन्यात 'ही' असणार भारताची प्लेइंग-11
हार्दिक पांड्या OUT, 'या' 3 खेळाडूंची एन्ट्री... कर्णधार सूर्या घेणार मोठा निर्णय; चौथ्या टी-20 सामन्यात 'ही' असणार भारताची प्लेइंग-11
Budget  2025 :निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर करणार, कमोडिटी बाजार सुरु राहणार, शेअर बाजाराचं काय?
निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर करणार, शनिवारी कमोडिटी अन् शेअर बाजार सुरु राहणार की बंद?
Ajit Pawar in Beed: अजित पवारांनी बीडमध्ये सगळ्यांची खरडपट्टी काढली, गुन्हेगारांना इशारा; धडाकेबाज भाषणाची जोरदार चर्चा
बीडचा चार्ज हाती घेताच अजितदादांचं धडाकेबाज भाषण, गुन्हेगारांना इशारा, स्वपक्षीयांचे कान टोचले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MNS Melava Raj Thackeray: राज ठाकरेंच्या उपस्थितीत मुंबईत मनसेचा मेळावा, NSCI डोम येथे आयोजनBeed Ajit Pawar : बीडमध्ये अजितदादांचा दरबार, जिल्हा नियोजन समितीची बैठकTop 70 News : टॉप 70 बातम्यांचा वेगवान आढावा : 7 AM : 30 Jan 2025 : ABP MajhaNitesh Rane : नितेश राणे म्हणतात परीक्षा केंद्रावर बरखाबंदी हवी, भाजप नेत्यांंचा मागणीला पाठिंबा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shiv Sena : नाशिकच्या शिवसेनेला गटबाजीचे ग्रहण, शिवसैनिक संभ्रमात; एकनाथ शिंदे भाकरी फिरवणार?
नाशिकच्या शिवसेनेला गटबाजीचे ग्रहण, शिवसैनिक संभ्रमात; एकनाथ शिंदे भाकरी फिरवणार?
Ind vs Eng 4th T20 : हार्दिक पांड्या OUT, 'या' 3 खेळाडूंची एन्ट्री... कर्णधार सूर्या घेणार मोठा निर्णय; चौथ्या टी-20 सामन्यात 'ही' असणार भारताची प्लेइंग-11
हार्दिक पांड्या OUT, 'या' 3 खेळाडूंची एन्ट्री... कर्णधार सूर्या घेणार मोठा निर्णय; चौथ्या टी-20 सामन्यात 'ही' असणार भारताची प्लेइंग-11
Budget  2025 :निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर करणार, कमोडिटी बाजार सुरु राहणार, शेअर बाजाराचं काय?
निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर करणार, शनिवारी कमोडिटी अन् शेअर बाजार सुरु राहणार की बंद?
Ajit Pawar in Beed: अजित पवारांनी बीडमध्ये सगळ्यांची खरडपट्टी काढली, गुन्हेगारांना इशारा; धडाकेबाज भाषणाची जोरदार चर्चा
बीडचा चार्ज हाती घेताच अजितदादांचं धडाकेबाज भाषण, गुन्हेगारांना इशारा, स्वपक्षीयांचे कान टोचले
Ambadas Danve:'जय भवानी जय शिवाजी म्हणत मतं मिळवण्याचे दिवसे गेले', अंबादास दानवेंचा शिवसैनिकांना अजब सल्ला, म्हणाले..
'जय भवानी जय शिवाजी म्हणत मतं मिळवण्याचे दिवसे गेले', अंबादास दानवेंचा शिवसैनिकांना अजब सल्ला, म्हणाले..
Akshay Shinde Encounter: अक्षय शिंदेच्या बोटांचे ठसे पावसात वाहून गेले, फॉरेन्सिक रिपोर्ट उघड करणाऱ्या शिंदे गटाच्या नेत्याला अक्षय शिंदेच्या वकिलांची नोटीस
शिंदे गटाच्या मंत्र्याने गोपनीय माहिती बाहेर फोडली; अक्षय शिंदेच्या वकिलांनी धाडली मंत्र्यांना नोटीस
Mutual Fund SIP : शेअर बाजारातील गुंतवणुकीनं नुकसान? 'या' म्युच्यूअल फंड SIP तून अपेक्षाभंग,कमाई ऐवजी तोटा, आता पुढं काय?   
शेअर बाजारात सातत्यानं घसरण, 'या' म्युच्यूअल फंडातील एसआयपीतून कमाई ऐवजी नुकसान, आता पुढं काय?
Dhananjay Munde : दिल्लीवारी धनंजय मुंडेंचं मंत्रिपद वाचवणार का? राजीनाम्याचा फैसला कुणाच्या कोर्टात? 
दिल्लीवारी धनंजय मुंडेंचं मंत्रिपद वाचवणार का? राजीनाम्याचा फैसला कुणाच्या कोर्टात? 
Embed widget