(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Ramgiri Maharaj : धर्माविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे गुन्हा दाखल, एकनाथ शिंदेंसोबत व्यासपीठावर, कोण आहेत रामगिरी महाराज?
Ramgiri Maharaj : महंत रामगिरी महाराज (Ramgiri Maharaj) यांनी नाशिकच्या (Nashik) सिन्नर तालुक्यातील पंचाळे गावामध्ये प्रवाचनाच्या दरम्यान एका धर्माविषयी वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यानंतर या वक्तव्यामुळे छत्रपती संभाजीनगरच्या (Chhatrapati Sambhajinagar) वैजापूरमध्ये तणाव निर्माण झाला होता.
Ramgiri Maharaj : महंत रामगिरी महाराज (Ramgiri Maharaj) यांनी नाशिकच्या (Nashik) सिन्नर तालुक्यातील पंचाळे गावामध्ये प्रवाचनाच्या दरम्यान एका धर्माविषयी वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यानंतर या वक्तव्यामुळे छत्रपती संभाजीनगरच्या (Chhatrapati Sambhajinagar) वैजापूरमध्ये तणाव निर्माण झाला होता. वैजापूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये रात्री आठच्या दरम्यान जमाव आला आणि त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी टायरही जाळण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी महंत रामगिरी महाराज यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. मात्र, तरीही रामगिरी महाराज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासोबत व्यासपीठावर पाहायला मिळाले. एका धर्माविषयी वादग्रस्त वक्तव्य करणारे आणि गुन्हा दाखल असूनही मुख्यमंत्री शिंदेंसोबत व्यासपीठ शेअर करणारे रामगिरी महाराज कोण आहेत? जाणून घेऊयात...
कोण आहेत रामगिरी महाराज?
वैजापूर तालुक्यातील कापूरवाडीचे भूमिपूत्र थोर संत सद्गुरु गंगागिर महाराज यांचा जन्म सन 1814 साली झाला आणि सन 1902 मध्ये त्यांचे महानिर्वाण झाले. त्यांनी वैजापूर (जि.छत्रपती संभाजीनगर) आणि श्रीरामपूर (जि.अहमदनगर) या दोन तालुक्यांच्या सीमांना स्पर्श करणार्या गोदाकाठावरील सराला बेटावर मठाची स्थापना केली. या बेटावरील त्यांचे कार्य पाहून प्रभावित झालेल्या वैजापूरच्या रुपचंद संचेती यांनी या बेटावरील त्यांची 65 एकर सुपिक जमीन त्यांना दान केली. वारकरी संप्रदायाच्या समर्पक विचारधारेतून त्यांनी तत्कालीन निजामशाहीच्या जुलमी राजवटीत पिचलेल्यांना एकत्र केले. शिर्डीचे साईबाबा सद्गुरु गंगागिर महाराजांना गुरुस्थानी मानीत असतं. लोकांना संघटीत करण्यासाठी त्यांनी लोकसहभागातून सुमारे पावणे दोनशे वर्षांपूर्वी देवळा-रावळातून अखंड हरिनाम सप्ताहाची परंपरा रुजवली.
व्यसनमुक्त समाज, अस्पृश्य निर्मूलन यासारख्या गोष्टींवर या सप्ताहाच्या माध्यमातून भर दिला गेला. जगातील सर्वात मोठा धार्मिक उत्सव आणि त्यात दररोज सात दिवस अगदी नियोजनबद्ध पद्धतीने होणारे अन्नदान अशी ओळख असलेल्या गंगागिर महाराजांच्या सप्ताहाची दखल ‘गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स’मध्येही घेण्यात आलेली आहे. त्यांनी सुरु केलेली ही परंपरा महाराष्ट्राच्या कानाकोपर्यात आजही अखंडपणे सुरु आहे.
2009 पासून रामगिरी महाराज 'या' पालखीचे भोई
सन 1902 साली त्यांचे देहावसान झाल्यानंतर त्यांची ही परंपरा पुढे त्यांचे प्रियशिष्य दत्तगिरी महाराज यांनी सुरु ठेवली. तीच परंपरा त्यानंतरच्या श्रीनाथगिरी महाराज, सोमेश्वरगिरी महाराज, श्रीनारायणगिरी महाराज यांनी कायम ठेवली आणि 2009 पासून रामगिरी महाराज या पालखीचे भोई झाले आहेत. त्यांनी गेल्या पंधरा वर्षांत सरला बेटाचा केवळ धार्मिक क्षेत्र म्हणून विकास न करता पर्यटन क्षेत्र म्हणूनही या परिसराला साज चढवला आहे. येथून जवळच असलेल्या शनिदेव गाव या शनी महाराजांच्या जागृत ठिकाणाचाही त्यांनी कायापालट केला आहे. त्यामुळे सरालाबेट आणि शनिदेव गाव या ठिकाणी येणार्या भाविकांसह पर्यटकांच्या संख्येतही मोठी वाढ झाली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
जे स्वतः स्टंटमॅन आहेत, त्यांनी सरकारने काय करायचं हे सांगायला नको, लाडकी बहीण योजनेवरुन अमृता फडणवीसांचे विरोधकांना खडे बोल