Ashish Shelar on Narayan Rane : नारायण राणे यांची उमेदवारी नागरिकांनी उचलून धरली, आशिष शेलार काय काय म्हणाले?
Ashish Shelar on Narayan Rane : भाजप नेते नारायण राणे यांना सिंधुदुर्ग-रत्नागिरी लोकसभा मतदारसंघातून यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
Ashish Shelar on Narayan Rane : भाजप नेते नारायण राणे यांना सिंधुदुर्ग-रत्नागिरी लोकसभा मतदारसंघातून यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सिंधुदुर्ग-रत्नागिरी लोकसभेच्या जागेवरुन शिंदे सेना आणि भाजपमध्ये संघर्ष सुरु होता. अखेर ही जागा भारतीय जनता पक्षाला सुटली आहे. त्यामुळे नारायण राणेंना दिलासा मिळाला आहे. दरम्यान, नारायण राणे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
काय म्हणाले आशिष शेलार?
आशिष शेलार नारायण राणेंबाबत बोलताना म्हणाले, रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेचा निर्णय योग्य वेळेत झाला नाही, त्यामुळे वाद वाढला. पण त्या जागेवर कोण निवडून येईल. याबाबत घटक पक्षांमध्ये चर्चा झाली आहे. त्यानंतरच निर्णय घेण्यात आलाय. याला विसंवाद समजू नये, असं आवाहन भाजप नेते आशिष शेलार यांनी केलं आहे. आज पुण्यात युवा मन की बात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते.
ॲपमध्ये पुण्यातील युवकांचा जाहीरनामा असेल
पुढे बोलताना आशिष शेलार म्हणाले, एक ॲप तयार करण्यात आलं आहे. ॲपमध्ये पुण्यातील युवकांचा जाहीरनामा असेल. प्रत्येक युवकाला निवडणूक प्रक्रियेत सामील करून घेण्यासाठी ॲप करण्यात आले आहे. सर्व आकडेवारी आल्यावर भाष्य करणं योग्य होईल. सुप्रिया सुळे यांचा पराभव नक्की होईल. सुनेत्रा ताई यांचा विजय होईल. किती लाखांनी होईल सांगता येणार नाही पण होणार हे स्पष्ट आहे.
घरातल्या सुनेला मुलीचं स्थान दिलं जातं
सूनेला बाहेरची म्हणणे पवार साहेबांकडून अपेक्षित नाही. घरातल्या सुनेला मुलीचं स्थान दिलं जातं. तिला बाहेरच म्हणणं योग्य नाही. हो सुप्रिया ताई बोलल्या. कुठली धमकी नाही काही नाही, असंही शेलार यांनी सांगितलं. पुढे शेलार म्हणाले, रामदास कदम आमचे वरिष्ठ नेते आहेत. टीका करत नसतानाही ते टीक करत असतील तर ते चुकीचं आहे. कोकणात शिवसेनेवर अन्याय झालेला नाही. एखाद्याला अपेक्षा असण्यात काही चुकीचं नाही. जिंकून कोण येईल त्यावर निर्णय होत असतो.
सरकारने निर्णय केला आहे. मोदींनी कर कमी केला. राज्यांना कमी करायला सांगितला. उद्धव ठाकरे सरकारमध्ये कर कमी झाला नाही. शिंदे फडणवीस सरकारने लगेच कर कमी केला. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित दादा सगळ्यांची बैठक झाली. युवकांच्या अपेक्षा राज ठाकरेंनी व्यक्त केल्या. जुने व्हिडिओ काढा, उद्धवजी यांनी शरद पवार, राहुल गांधी यांना काय सांगितलं होतं ते बघा, असंही शेलार यांनी सांगितलं. बारामतीत सुनेत्रा पवार यांचा पराभव निश्चित, चुकून आशिष शेलार बोलून गेले, मग केली दुरुस्ती केली.
इतर महत्वाच्या बातम्या