एक्स्प्लोर
Nitesh Rane: हिंदुधर्म रक्षक, हिंदु धर्मासाठी लढणारे नितेश राणे; 'मातोश्री'बाहेर बॅनर झळकले!
Nitesh Rane Banner In Mumbai: नितेश राणेंच्या समर्थकांनी लावलेल्या या बॅनरची सध्या राज्यभर चर्चा सुरु आहे.

nitesh rane
1/9

भाजपचे खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) आणि माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यातील वाद महाराष्ट्राला नवा नाही.
2/9

ठाकरे आणि राणेंकडून वारंवार एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जातात. गेल्या काही दिवसांआधीच लोकसभेचा निकाल लागला.
3/9

नारायण राणे यांनी रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि ठाकरे गटाचे उमेदवार विनायक राऊत यांचा पराभव केला.
4/9

लोकसभेच्या निवडणुका झाल्यानंतर आता महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकीची तयारी सुरु झाली आहे.
5/9

याचदरम्यान मुंबईतील मातोश्रीबाहेर (उद्धव ठाकरेंचं निवासस्थान) नितेश राणे समर्थकांचे बॅनर लावण्यात आले आहेत.
6/9

नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त वांद्रे कलानगर येथे हे बॅनर झळकवण्यात आले आहेत.
7/9

नितेश राणे यांचे समर्थक मयूर बगेरिया यांनी हे बॅनर लावले आहेत.
8/9

23 जून रोजी नितेश राणे यांचा वाढदिवस असल्याने राणे समर्थकांनी बॅनर लावल्याचे दिसून येत आहे.
9/9

नितेश राणेंच्या समर्थकांनी लावलेल्या या बॅनरची सध्या राज्यभर चर्चा सुरु आहे.
Published at : 22 Jun 2024 01:20 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
आयपीएल
पुणे
व्यापार-उद्योग
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
