एक्स्प्लोर

पुण्यात पुन्हा अल्पवयीन मुलाकडून अपघात; 14 वर्षांच्या मुलानं टँकरनं अनेकांना उडवलं

Pune Accident : पुण्यात पुन्हा अल्पवयीन मुलाकडून भीषण अपघात झाला असून 14 वर्षांच्या मुलानं टँकरनं अनेकांना उडवल्याची माहिती मिळत आहे.

Pune Accident : पुणे : पोर्शे अपघातानंतर (Pune Porsche Accident) आणखी एका अल्पवयीन मुलाकडून पुण्यातील (Pune Latest Updates) वानवडीत (Vadavani Accident) आणखी एक भीषण अपघात. धक्कादायक बाब म्हणजे, टँकरच्या धडकेत इतरही काहीजण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. एक 14 वर्षांचा मुलगा टँकर चालवत होता. त्यानं टँकरनं अनेकांना धडक दिली. सकाळी व्यायामासाठी बाहेर पडलेल्या मुलांना, तसेच एका दुचाकीवरुन जाणाऱ्या महिलेलाही या मुलानं धडक दिली आहे. दरम्यान, सकाळी साडेसहाच्या सुमारास हा अपघात झाला. 

टँकर अवघ्या 14 वर्षांच्या मुलाच्या ताब्यात देण्यात आल्याचा गंभीर प्रकार समोर आल्यानं पुण्यात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. पुण्यातल्या वानवडी येथे भरधाव टँकरनं सकाळी व्यायामासाठी बाहेर पडलेल्या मुलांना धडक दिली. तसेच, एका दुचाकी चालक महिलेला देखील धडक दिली. हा अपघात सकाळी साडे सहाच्या सुमारास घडला. या अपघातात काही मुले आणि महिला जखमी झाली आहे. विशेष म्हणजे या अपघाताला कारणीभूत ठरलेला टँकर अवघ्या 14 वर्षांचा मुलगा चालवीत होता. नागरिकांनी हा टँकर अडवून धरला असून चालकाला पकडून ठेवलं आहे. 

वानवडी येथे भरधाव टँकरनं सकाळी व्यायामासाठी बाहेर पडलेल्या मुलांना धडक दिली. तसेच, एका दुचाकी चालक महिलेला देखील धडक दिली. हा अपघात सकाळी साडे सहाच्या सुमारास घडला. या अपघातात काही मुलं आणि महिला जखमी झाली आहे. विशेष म्हणजे, या अपघाताला कारणीभूत ठरलेला टँकर अवघ्या 14 वर्षांचा मुलगा चालवीत होता. नागरिकांनी हा टँकर अडवून धरला असून अल्पवयीन चालकाला पकडून ठेवलं आहे. 

पुण्यात कल्याणीनगर अपघात प्रकरणानंतर देखील अनेक गंभीर अपघात घडत आहेत. एका हायवा ट्रकनं मार्केटयार्ड येथे एका महिलेला चिरडलं होतं. तसेच, कात्रज येथे एसटी बसच्या धडकेत अभियंता तरुणीचा प्राण गेला होता. उंड्री येथे ट्रक दुचाकीच्या झालेल्या अपघातात एका तरुणीला जीव गमवावा लागला होता. एका पाठोपाठ एक असे अनेक अपघात घडत असताना देखील अनेक अल्पवयीन मुलं वाहने चालवताना शहरात दिसत आहेत. त्यातच अवजड टँकर अवघ्या 14 वर्षांच्या मुलाच्या ताब्यात देण्यात आल्याचा गंभीर प्रकार समोर आल्यानं खळबळ उडाली आहे. नागरिकांनी या अल्पवयीन मुलाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे.

दुचाकीवरून कुस्ती प्रशिक्षक संतोष ढुमे आणि त्यांची पत्नी जात होती. त्यांच्या तालमीत शिकणाऱ्या मुली व्यायामासाठी रस्त्यावरून धावत होत्या. टँकरची दुचाकीला धडक बसताच त्यांची पत्नी दुचाकीवरून उडून थेट समोर रस्त्यावर पडली. तर, टँकरखाली दोन मुली आल्या. स्वतः ढुमे यांनी या मुलींना बाहेर काढलं. या अपघातात मुलीही जखमी झाल्या आहेत. 

पाहा व्हिडीओ : Pune Tanker Accident : अल्पवयीन मुलानं टँकर चालवत दुचाकीस्वाराला उडवलं, पुण्यात चाललंय काय?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

बांग्लादेशातून आले, पुण्यात नोकरीही मिळवली; दहशतवादविरोधी पथकाने तिघांना उचललं, मोबाईल तपासले
बांग्लादेशातून आले, पुण्यात नोकरीही मिळवली; दहशतवादविरोधी पथकाने तिघांना उचललं, मोबाईल तपासले
IPO : 2024 मधील शेवटचा आयपीओ तब्बल 227 पट सबस्क्राइब, इंडो फार्मसाठी गुंतवणूकदारांनी तिजोरी उघडली, GMP किती रुपयांवर ?
इंडो फार्मच्या आयपीओसाठी गुंतवणूकदारांनी तिजोरी उघडली, 227 पट सबस्क्राइब, जीएमपी कितीवर?
मुंबईत मराठी-हिंदी वाद; मुंब्रा बंद करुन टाकेन म्हणणाऱ्यातरुणाला जमावाने मागायला लावली माफी
मुंबईत मराठी-हिंदी वाद; मुंब्रा बंद करुन टाकेन म्हणणाऱ्यातरुणाला जमावाने मागायला लावली माफी
Ladki Bahin Yojana : मोठी बातमी, लाडकी बहीण योजनेच्या काही अर्जांची पडताळणी होणार, 'ते' अर्ज बाद होणार, आदिती तटकरेंची घोषणा
लाडकी बहीण योजनेच्या काही अर्जांची पडताळणी होणार, 'ते' अर्ज बाद होणार, आदिती तटकरेंची घोषणा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Job majha : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळात नोकरीची संधी, अटी काय?Sunil Tatkare PC | वाल्मिक कराड अजित पवारांच्या कारमध्ये होता का? सुनील तटकरे म्हणाले...Chhagan Bhujbal : माझ्यासाठी कुणाचं तरी मंत्रीपद काढून घेणं मला पटत नाही : छगन भुजबळLadki Bahin Verification : लाडकी बहीण अर्जाची पडताळणी होणार, अपात्र बहिणींचं काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बांग्लादेशातून आले, पुण्यात नोकरीही मिळवली; दहशतवादविरोधी पथकाने तिघांना उचललं, मोबाईल तपासले
बांग्लादेशातून आले, पुण्यात नोकरीही मिळवली; दहशतवादविरोधी पथकाने तिघांना उचललं, मोबाईल तपासले
IPO : 2024 मधील शेवटचा आयपीओ तब्बल 227 पट सबस्क्राइब, इंडो फार्मसाठी गुंतवणूकदारांनी तिजोरी उघडली, GMP किती रुपयांवर ?
इंडो फार्मच्या आयपीओसाठी गुंतवणूकदारांनी तिजोरी उघडली, 227 पट सबस्क्राइब, जीएमपी कितीवर?
मुंबईत मराठी-हिंदी वाद; मुंब्रा बंद करुन टाकेन म्हणणाऱ्यातरुणाला जमावाने मागायला लावली माफी
मुंबईत मराठी-हिंदी वाद; मुंब्रा बंद करुन टाकेन म्हणणाऱ्यातरुणाला जमावाने मागायला लावली माफी
Ladki Bahin Yojana : मोठी बातमी, लाडकी बहीण योजनेच्या काही अर्जांची पडताळणी होणार, 'ते' अर्ज बाद होणार, आदिती तटकरेंची घोषणा
लाडकी बहीण योजनेच्या काही अर्जांची पडताळणी होणार, 'ते' अर्ज बाद होणार, आदिती तटकरेंची घोषणा
Chhagan Bhujbal : तुका म्हणे उगी राहावे, जे जे होईल ते पाहावे, संत तुकाराम महाराजांच्या अभंगाच्या ओळी मांडत छगन भुजबळांचं मंत्रिपदाच्या चर्चेवर भाष्य
कुणाचं काढून मला मंत्रिपद नकोय, विदेशातून नाशिकमध्ये येताच छगन भुजबळांकडून भूमिका स्पष्ट
IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या;  पुणे जिल्हाधिकारीपदी जितेंद्र डुडी; पूजा खेडकरमुळे चर्चेत आलेल्या दिवसेंना पदोन्नती
IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; पुणे जिल्हाधिकारीपदी जितेंद्र डुडी; पूजा खेडकरमुळे चर्चेत आलेल्या दिवसेंना पदोन्नती
राज्यातील 12 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, मिलिंद म्हैसकर यांना नवी जबाबदारी; पुण्याचे जिल्हाधिकारीही बदलले
राज्यातील 12 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, मिलिंद म्हैसकर यांना नवी जबाबदारी; पुण्याचे जिल्हाधिकारीही बदलले
मुंंडेंच्या परळीत पोलीसप्रमुख, तहसीलदार अन् BDO सुद्धा वंजारीच; अंजली दमानियांनी शेअर केली यादीच
मुंंडेंच्या परळीत पोलीसप्रमुख, तहसीलदार अन् BDO सुद्धा वंजारीच; अंजली दमानियांनी शेअर केली यादीच
Embed widget