"निलेश लंके तुम्हारे पास क्या है? माझ्याकडे माझी मायबाप जनताय"; अमोल कोल्हेंची डायलॉगबाजी, उपस्थितांकडून टाळ्यांचा कडकडाट
अहमदनगरमध्ये झालेल्या महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्या प्रचारसभेत शिरूर मतदारसंघाचे उमेदवार अमोल कोल्हे उपस्थित होते. या प्रचार सभेत अमोल कोल्हेंनी आपल्या क्लासी अंदाजानं सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला.
Amol Kolhe, Ahmednagar : अहमदनगर : महाविकास आघाडीचे (Maha Vikas Aghadi) उमेदवार निलेश लंके (Nilesh Lanke) यांच्या प्रचारासाठी आज अहमदनगर (Ahmednagar) शहरात शिरूर मतदार संघाचे खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी सभा घेतली होती. या सभेदरम्यान बोलताना अमोल कोल्हे यांनी दिवार चित्रपटातील अमिताभ बच्चन आणि शशी कपूर यांच्यामध्ये गाजलेला संवाद म्हणून दाखवला आणि पुढे बोलताना निलेश लंके यांच्याजवळ जनतेचा कौल आहे, असं म्हटलं. अमोल कोल्हे यांच्या आगळ्या वेगळ्या अंदाजानं उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला.
"निलेश लंके के पास जनता का कौल है..."
रविवारी अहमदनगरमध्ये झालेल्या महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्या प्रचारसभेत शिरूर मतदारसंघाचे उमेदवार अमोल कोल्हे उपस्थित होते. या प्रचार सभेत अमोल कोल्हेंनी आपल्या क्लासी अंदाजानं सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. अमोल कोल्हेंनी प्रचारसभेत बोलताना गाजलेल्या बॉलिवूड पटातील डायलॉग म्हटला. "मेरे पास गाडी है बंगला है तुम्हारे पास क्या है... तशीच परिस्थिती सध्या शिरूर आणि अहमदनगर दक्षिण मतदार संघात असल्याचं अमोल कोल्हे यांनी सांगितलं. मेरे पास गाडी है, बंगला है, तुम्हारे पास क्या है... असं अमिताभ बच्चन यांच्या आवाजात अमोल कोल्हे यांनी म्हटलं. तसेच पुढे बोलताना निलेश लंके यांच्याजवळ जनतेचा कौल आहे आणि त्यामुळेच निलेश लंके हे निवडून येतील, असंही त्यांनी सांगितलं आहे.
दरम्यान, शिरूर मतदारसंघात मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री यांच्या अनेक सभा झाल्या आहेत, पुढेही होणार आहेत आणि एक उपमुख्यमंत्री तर त्यांच्या मतदारसंघातील निवडणूक झाल्यानंतर शिरूरमध्येच येऊन बसतील, असं सांगत त्याचप्रमाणे दक्षिण मतदार संघातही असंच चित्र आहे. निलेश लंके यांच्याविरुद्ध प्रचार करण्यासाठी पुढील काळात अनेक नेत्यांच्या सभा लावल्या असल्याचं कळतंय. यावरून अमोल कोल्हे यांनी दीवार चित्रपटातील डायलॉग मारून उपस्थितांना खळखळून हसायला लावलं. अशातच आता लोकसभेच्या निवडणुकीचं मैदान कोण मारणात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
तब्येतीच्या कारणास्तव शरद पवारांचे सर्व कार्यक्रम रद्द
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांचे आजचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. थकवा जाणवत असल्यानं डॉक्टरांनी शरद पवारांना विश्रांती करण्याचा सल्ला दिला आहे. दरम्यान, शिरुर मतदारसंघात आज महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कोल्हे यांच्यासाठी शरद पवार सभा घेणार होते. परंतु शरद पवारांची तब्येत ठीक नसल्यानं ही सभा रद्द करण्यात आली आहे. यावर शिरुर लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कोल्हे यांनीही यासंदर्भात आपली प्रतिक्रिया दिली आहे.
पाहा व्हिडीओ : Amol kolhe Dialogue : अमोल कोल्हे यांनी मारला दिवार चित्रपटातील डायलॉग... तुम्हारे पास क्या है?
महत्त्वाच्या इतर बातम्या :