एक्स्प्लोर

Sanjay Raut : विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन राजकीय फायद्यासाठी अक्षय शिंदेची हत्या; राऊतांचा खळबळजनक आरोप

Sanjay Raut on Akshay Shinde Encounter : अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणात पाच पोलीस जबाबदार असल्याचं निरिक्षण मुंबई उच्च न्यायालयाने नोंदवले आहे.

Sanjay Raut on Akshay Shinde Encounter : बदलापूर येथील शाळेतील दोन लहान मुलींवर लैंगिक अत्याचार (Badlapur School Crime News) करणाऱ्या अक्षय शिंदेचा 23 सप्टेंबर 2024 पोलिसांनी एन्काऊंटर (Akshay Shinde Encounter) केला होता. या प्रकरणाचा मुंबई हायकोर्टात न्यायालयीन चौकशी समितीचा सादर करण्यात आला आहे. न्यायमूर्तींनी या प्रकरणावर महत्त्वाचे निरिक्षण नोंदवले आहे. चौकशी अहवालात अक्षय शिंदे याला बनावट चकमकीत मारण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे. तसेच बनावट चकमकीतील पाच पोलीस कर्मचाऱ्यांनी आपल्या बळाचा गैरपद्धतीने वापर केला. त्यामुळे हे पाच पोलीस कर्मचारी अक्षय शिंदे याच्या मृत्यूसाठी जबाबदार आहेत, असे म्हटले आहे. आता यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) खळबळजनक आरोप केलाय.  

संजय राऊत म्हणाले की, हा न्यायालयाचा आणि कायद्याचा विषय आहे. बदलापूर प्रकरण हे अत्यंत गंभीर प्रकरण आहे. आरोपीला पकडलं, आता तो आरोपी खरा होता की, अजून कोणाला वाचवण्यासाठी त्याचा बळी दिला? असा प्रश्न उद्भवत आहे. त्याची ज्या पद्धतीने हत्या केली ती विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून राजकीय फायद्यासाठी हत्या केली, असा आरोप त्यांनी केला. या घटनेतील चित्र रंगवण्यात आलं. तेव्हा देवेंद्र फडणवीस गृहमंत्री होते. त्यांना अंधारात ठेवून, असे सर्व घडवण्यात आलं का? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला. 

...तर यांच्यावर 302 चा खटला दाखल होईल

संजय राऊत पुढे म्हणाले की, यापूर्वी सुद्धा मुंबई, महाराष्ट्रात एन्काऊंटर झालेत. पण, त्यातील 90 टक्के एन्काऊंटर असेच झालेत. न्यायालयीन समितीने त्यावर ठपका ठेवला आहे. यासंदर्भात काय करायचं हे न्यायालयाने ठरवायचं किंवा गृहमंत्र्यांनी ठरवावं. याबाबत आमची काहीच मागणी नाही. कायद्याने आणि न्यायालयाच्या मार्गाने काय होईल ते आम्ही पाहू. त्यांच्यात गेम करण्याचं प्रकरण खूप वाढलं आहे. अगदी मंत्रिमंडळ विस्तारापासून मुख्यमंत्रीपदापासून ते  पालकमंत्र्यापर्यंत एकमेकांचे गेम करत आहेत. सध्या मुख्यमंत्री आणि गृहमंत्री विदेशात आहेत. त्यांना कोट्यावधीची गुंतवणूक काढायची आहे. ते येताना हजार कोटींची गुंतवणूक आणतील, त्यांच्यासाठी ही लहान गोष्ट आहे. राजकीय फायद्यासाठी पोलिसांचे असेच बळी घेतले जातात. न्यायालयाने ठरवलं की यांच्यावर कायदेशीर कारवाई करायची तर यांच्यावर 302 चा खटला दाखल होईल, असेही त्यांनी म्हटले. 

आणखी वाचा 

Video: माझा मुलगा निर्दोष होता, आम्ही आजही भीक मागून जगतोय; कोर्टाच्या अहवालावर अक्षयच्या आईची प्रतिक्रिया

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kalyan Crime News: जंगली रम्मीचा नादच बेक्कार, तो बनला अट्टल गुन्हेगार; 7 लाख किंमतीचे दागिने जप्त करून ठोकल्या बेड्या
जंगली रम्मीचा नादच बेक्कार, तो बनला अट्टल गुन्हेगार; 7 लाख किंमतीचे दागिने जप्त करून ठोकल्या बेड्या
सोन्याचे दागिने, चांदीचे भांडे, मोठी रोकड जप्त; सराईत चोरट्याच्या पुणे पोलिसांनी आवळल्या मुसक्या
सोन्याचे दागिने, चांदीचे भांडे, मोठी रोकड जप्त; सराईत चोरट्याच्या पुणे पोलिसांनी आवळल्या मुसक्या
Bhandara : 62 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाचं भंडारा जिल्हा परिषदवर अनुसूचित जमातीचा अध्यक्ष; काँग्रेसच्या कविता उईके, तर महायुतीचा उपाध्यक्ष
62 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाचं भंडारा जिल्हा परिषदवर अनुसूचित जमातीचा अध्यक्ष; काँग्रेसच्या कविता उईके, तर महायुतीचा उपाध्यक्ष
Railway: मध्य रेल्वेला ऐतिहासिक ठेव्याचा विसर; अडगळीत, धुळखात पडलंय पहिलं इलेक्ट्रिक इंजिन
Railway: मध्य रेल्वेला ऐतिहासिक ठेव्याचा विसर; अडगळीत, धुळखात पडलंय पहिलं इलेक्ट्रिक इंजिन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Guardian Minister : नावं गायब करण्यात, तटकरेंचा हातखंड शिंदेंचे आमदार गोगावले,थोरवे,दळवींचा आरोपABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 6 PM : 27 Jan 2025 : ABP MajhaSaif Ali Khan :बदनामीचा सामना करावा लागतोय,सैफ हल्ला प्रकरणी ताब्यात घेतलेल्या संशयिताचं लग्न मोडलंBaburao Chandere : Vijay Raundal यांनी पोकलेनच्या ड्रायव्हरला दगड मारले,बाबूराव चांदेरे यांचा पलटवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kalyan Crime News: जंगली रम्मीचा नादच बेक्कार, तो बनला अट्टल गुन्हेगार; 7 लाख किंमतीचे दागिने जप्त करून ठोकल्या बेड्या
जंगली रम्मीचा नादच बेक्कार, तो बनला अट्टल गुन्हेगार; 7 लाख किंमतीचे दागिने जप्त करून ठोकल्या बेड्या
सोन्याचे दागिने, चांदीचे भांडे, मोठी रोकड जप्त; सराईत चोरट्याच्या पुणे पोलिसांनी आवळल्या मुसक्या
सोन्याचे दागिने, चांदीचे भांडे, मोठी रोकड जप्त; सराईत चोरट्याच्या पुणे पोलिसांनी आवळल्या मुसक्या
Bhandara : 62 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाचं भंडारा जिल्हा परिषदवर अनुसूचित जमातीचा अध्यक्ष; काँग्रेसच्या कविता उईके, तर महायुतीचा उपाध्यक्ष
62 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाचं भंडारा जिल्हा परिषदवर अनुसूचित जमातीचा अध्यक्ष; काँग्रेसच्या कविता उईके, तर महायुतीचा उपाध्यक्ष
Railway: मध्य रेल्वेला ऐतिहासिक ठेव्याचा विसर; अडगळीत, धुळखात पडलंय पहिलं इलेक्ट्रिक इंजिन
Railway: मध्य रेल्वेला ऐतिहासिक ठेव्याचा विसर; अडगळीत, धुळखात पडलंय पहिलं इलेक्ट्रिक इंजिन
Nashik Guardian Minister : एकीकडे महायुतीत पालकमंत्रिपदावरून वाद, दुसरीकडे नाशिकमध्ये झळकले गिरीश महाजनांच्या अभिनंदनाचे बॅनर्स; नेमकं काय घडतंय?
एकीकडे महायुतीत पालकमंत्रिपदावरून वाद, दुसरीकडे नाशिकमध्ये झळकले गिरीश महाजनांच्या अभिनंदनाचे बॅनर्स; नेमकं काय घडतंय?
Saif Ali khan: सैफ अली खानवरील हल्ल्याच्या तपासात पोलिसांची चूक; विनाकारण आकाशचं लग्न मोडलं, नोकरीही गेली
सैफ अली खानवरील हल्ल्याच्या तपासात पोलिसांची चूक; विनाकारण आकाशचं लग्न मोडलं, नोकरीही गेली
Pune News : पुण्यात जॉबची मारामार, अवघ्या 50 जागांसाठी 5 हजार तरूण मुलाखतीसाठी रांगेत, बेरोजगारीचं भीषण वास्तव समोर
पुण्यात जॉबची मारामार, अवघ्या 50 जागांसाठी 5 हजार तरूण मुलाखतीसाठी रांगेत, बेरोजगारीचं भीषण वास्तव समोर
मोठी बातमी : BMC निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, बड्या महिला नगरसेविकेने साथ सोडली!
मोठी बातमी : BMC निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, बड्या महिला नगरसेविकेने साथ सोडली!
Embed widget