एक्स्प्लोर

Maharashtra Cabinet Expansion : अजित पवार-प्रफुल्ल पटेल यांनी घेतली अमित शाहांची भेट, मंत्रिमंडळ विस्तारावर पटेल म्हणाले, 'एक-दोन दिवसात चित्र स्पष्ट होईल'

Maharashtra Cabinet Expansion : अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांनी बुधवारी (12 जुलै) रात्री दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीत दोन्ही नेत्यांनी अमित शाह यांच्यासोबत मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा केल्याचं समजतं.

Maharashtra Cabinet Expansion : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांनी बुधवारी (12 जुलै) रात्री दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांची भेट घेतली. या भेटीत दोन्ही नेत्यांनी अमित शाह यांच्यासोबत मंत्रिमंडळ विस्तारावर (Cabinet Expansion) चर्चा केल्याचं समजतं. परंतु मीडियासोबत बोलताना प्रफुल्ल पटेल म्हणाले की सत्तेत सहभागी झाल्यावर आम्ही सदिच्छा भेटीसाठी इथे आलो होता. आम्ही केंद्रीय मंत्रिमंडळात कोणतंही पद मागितलेलं नाही."  तसंच सत्ताधारी महायुतीमध्ये कोणतीही फूट नाही. महाराष्ट्रात एक दोन दिवसात खातेवाटप होईल, असंही प्रफुल्ल पटेल पुढे म्हणाले.

शाह, पवार आणि पटेल यांच्यात एक तास चर्चा

भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शाह, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार प्रफुल्ल पटेल यांच्यात एक तास चर्चा झाली.  मंत्रिमंडळ विस्ताराबाबत पटेल म्हणाले की, "मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत आमची बैठक झाली. सध्या महाराष्ट्रात तीन पक्षांचं सरकार आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्ताराबाबत काम सुरु आहे. यात काही अडचण नाही. एक-दोन दिवसात चित्र स्पष्ट होईल." दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार दिल्लीवरुन मुंबईत 1.45 वाजता आपल्या देवगिरी बंगल्यावर पोहोचले.

तर दुसरीकडे 18 जुलै रोजी एनडीएच्या घटक पक्षांची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीदरम्यान अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट घेणार आहेत.

प्रफुल्ल पटेल काय म्हणाले?

प्रफुल्ल पटेल म्हणाले की, याच आठवड्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या बैठकीत खातेवाटपावर चर्चा झाली. यात काही अडचणी तर येणारच. सध्या सर्व खाती भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्याकडे आहेत. राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना खाती देण्यासाठी या दोन्ही पक्षांना काही विभाग सोडावे लागतील. सत्तेत सहभागी झाल्यानंतर 4 ते 5 दिवसात आम्ही खातेवाटपाचा मुद्दा उपस्थित केला नव्हता. काही दिवसांपूर्वीच आम्ही हा मुद्दा उपस्थित केला आणि त्यानंतर आम्ही तीन बैठका घेतल्या.

अजित पवार गटाच्या 9 आमदारांचा शपथविधी

दरम्यान 2 जुलै रोजी अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या 35 हून अधिक आमदारांच्या मदतीने बंड केलं आणि शरद पवार यांना मोठा धक्का दिला. अजित पवार हे भाजप आणि शिवसेना युतीच्या सरकारमध्ये सामील झाले होते. त्याच दिवशी अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या नऊ आमदारांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. या मंत्र्यांना अद्याप खातेवाटप झालेलं नाही.

VIDEO : Meeting With Amit Shah : Ajit Pawar, Praful Patel आणि अमित शाह या तिघांमध्ये तब्बल एक तास बैठक

हेही वाचा

NCP Ministers: कॅबिनेट मंत्र्यांना राज्यमंत्र्यांचे बंगले; निवासस्थानाच्या वाटपावरून राष्ट्रवादीच्या मंत्र्यांमध्ये नाराजी

महत्त्वाच्या बातम्या

महापुरुषांच्या शेजारी पंतप्रधान मोदी फोटो प्रकरण; मनसेच्या आंदोलनातील आशिष साबळेला मुंबईतून अटक
महापुरुषांच्या शेजारी पंतप्रधान मोदी फोटो प्रकरण; मनसेच्या आंदोलनातील आशिष साबळेला मुंबईतून अटक
Maratha Reservation : उद्यापासूनच हैदराबाद गॅझेटनुसार प्रमाणपत्र वाटप, मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या आधी मराठ्यांचे सर्व प्रश्न सोडवणार; प्रसाद लाड यांचा जरांगेंना शब्द
उद्यापासूनच हैदराबाद गॅझेटनुसार प्रमाणपत्र वाटप, मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या आधी मराठ्यांचे सर्व प्रश्न सोडवणार; प्रसाद लाड यांचा जरांगेंना शब्द
'चार रद्द झालेली प्रमाणपत्र दिल्याशिवाय मी उपोषण सोडणार नाही..' मनोज जरांगेंची प्रसाद लाड यांच्यासमोर अट; म्हणाले, विखे पाटील शाळा करून शिंदे-फडणवीसांचे भांडण लावत आहेत
'चार रद्द झालेली प्रमाणपत्र दिल्याशिवाय मी उपोषण सोडणार नाही..' मनोज जरांगेंची प्रसाद लाड यांच्यासमोर अट; म्हणाले, विखे पाटील शाळा करून शिंदे-फडणवीसांचे भांडण लावत आहेत
विद्यानंद बापट नक्षली मानसिकतेचा, गुन्हा दाखल करा; सदाशिव पेठेतूनच मागणी, शिक्षणतज्ज्ञ कुलकर्णींनी दंड थोपटले
विद्यानंद बापट नक्षली मानसिकतेचा, गुन्हा दाखल करा; सदाशिव पेठेतूनच मागणी, शिक्षणतज्ज्ञ कुलकर्णींनी दंड थोपटले

व्हिडीओ

Sandeep Deshpande Mumbai : दुसऱ्यांना पप्पू म्हणता, आम्ही तुम्हाला फेकू म्हटलं तर राग येईल ना?
Ravindra Chavan News: अमित ठाकरेंच्या विरोधात भाजपने केलेल्या आंदोलनावर रवींद्र चव्हाणांची नापसंती
Manoj Jarange Patil: तुम्ही अभ्यास करून अधिकारी झालात, तुम्हाला बकरा बनवताय, पुन्हा येऊ नका; जिल्हाधिकाऱ्यांशी बोलताना मनोज जरांगेंना अश्रू अनावर
GDP Rate India : जीडीपाचा बोलबाला, पंतप्रधानांचा बचतीचा सल्ला Special Report
Nepal Flood : नेपाळमध्ये मृतांचा आकडा आता हजाराच्या घरात, एबीपी माझाचा हा ग्राऊंड रिपोर्ट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महापुरुषांच्या शेजारी पंतप्रधान मोदी फोटो प्रकरण; मनसेच्या आंदोलनातील आशिष साबळेला मुंबईतून अटक
महापुरुषांच्या शेजारी पंतप्रधान मोदी फोटो प्रकरण; मनसेच्या आंदोलनातील आशिष साबळेला मुंबईतून अटक
मुलगा ते मुलगी प्रवास झालेल्या अनाया बांगरच्या मोनोकिनीत मोहक अदा; म्हणाली, 'ज्या शरीराला ओळखणं मला एकेकाळी कठीण जात होतं, तेच आता...'
मुलगा ते मुलगी प्रवास झालेल्या अनाया बांगरच्या मोनोकिनीत मोहक अदा; म्हणाली, 'ज्या शरीराला ओळखणं मला एकेकाळी कठीण जात होतं, तेच आता...'
Manoj Jarange Patil: अंतरवालीत शासनाकडून प्रसाद लाड आले; मनोज जरांगे पाणी प्यायले, सलाईनही लावले, पण उपोषणावर ठाम
अंतरवालीत शासनाकडून प्रसाद लाड आले; मनोज जरांगे पाणी प्यायले, सलाईनही लावले, पण उपोषणावर ठाम
'चार रद्द झालेली प्रमाणपत्र दिल्याशिवाय मी उपोषण सोडणार नाही..' मनोज जरांगेंची प्रसाद लाड यांच्यासमोर अट; म्हणाले, विखे पाटील शाळा करून शिंदे-फडणवीसांचे भांडण लावत आहेत
'चार रद्द झालेली प्रमाणपत्र दिल्याशिवाय मी उपोषण सोडणार नाही..' मनोज जरांगेंची प्रसाद लाड यांच्यासमोर अट; म्हणाले, विखे पाटील शाळा करून शिंदे-फडणवीसांचे भांडण लावत आहेत
अल्पवयीन मुलाच्या गुप्तांगाचे चुंबन घेणे हा पॉक्सो कायद्यांतर्गत 'लैंगिक अत्याचार', हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल; आरोपीची 20 वर्षांची शिक्षा कायम ठेवली
अल्पवयीन मुलाच्या गुप्तांगाचे चुंबन घेणे हा पॉक्सो कायद्यांतर्गत 'लैंगिक अत्याचार', हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल; आरोपीची 20 वर्षांची शिक्षा कायम ठेवली
विद्यानंद बापट नक्षली मानसिकतेचा, गुन्हा दाखल करा; सदाशिव पेठेतूनच मागणी, शिक्षणतज्ज्ञ कुलकर्णींनी दंड थोपटले
विद्यानंद बापट नक्षली मानसिकतेचा, गुन्हा दाखल करा; सदाशिव पेठेतूनच मागणी, शिक्षणतज्ज्ञ कुलकर्णींनी दंड थोपटले
Kangana Ranaut: बाबा रामदेव झाल्यानंतर आता कंगना आणि स्वरा भास्करमध्ये वादाची ठिणगी; नेमकं घडलं तरी काय?
बाबा रामदेव झाल्यानंतर आता कंगना आणि स्वरा भास्करमध्ये वादाची ठिणगी; नेमकं घडलं तरी काय?
Babar Azam : पाकिस्तानच्या खेळाडूने लाज काढली! 15 रुपयांचा स्वस्त हेयर डाय लावून किंग चार्ल्स यांच्या भेटीला पोहोचलेला बाबर आझम ट्रोल
पाकिस्तानच्या खेळाडूने लाज काढली! 15 रुपयांचा स्वस्त हेयर डाय लावून किंग चार्ल्स यांच्या भेटीला पोहोचलेला बाबर आझम ट्रोल
Embed widget