(Source: ECI/ABP News/ABP Majha)
''आम्ही काही साधू-संत नाही, तुम्ही द्या, आमच्याकडून घ्या, आणि वाजवून घ्या''; अजित पवारांचा वेगळाच स्वॅग
दौंडमध्ये महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना अजित पवारांनी परखडपणे भाष्य केलं. बारामतीप्रमाणेच दौंडचाही विकास करू
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार (Ajit Pawar) यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातील दौंड तालुक्यात जाहीर सभा घेतली. यावेळी, तेथील भाजपा नेते राहुल कुल (Rahul kul) आणि कांचन कुल यांच्यासमवेत दौंड तालुक्यात विकासासाठी आपल्याला काम करायचं असल्याचं अजित पवारांनी म्हटले. आम्ही एकमेकांचा बांध रेटला आहे का? भांड्याला भांड लागते. आपण शब्दाचे पक्के आहोत. आपण एकमेकांसोबत काम करु. आपण यातून मार्ग काढू. तुम्ही मला ढिगाने मते द्या, मला म्हणजे बायकोला. मी चांगली शिक्षण संस्था इथे काढतो. माझी अनेकांशी ओळख आहे, बाकी मी कसे काय करायचं ते करतो. तुम्ही फक्त बटणे दाबा, असे म्हणत अजित पवारांनी सुनेत्रा पवारांसाठी दौंडकरांना आवाहन केले.
दौंडमध्ये महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना अजित पवारांनी परखडपणे भाष्य केलं. बारामतीप्रमाणेच दौंडचाही विकास करू. अर्थमंत्री असल्याने माझ्याकडे 6 ते 6.5 लाख कोटींचा निधी आहे, त्यामुळे निधी द्यायला काहीच अडचण नाही. फक्त, निधी सत्कारणी लागला पाहिजे, एवढचं मला वाटत. यापूर्वीच्या येथील पुरंदर उपसा सिंचन योजनेची अंतिम मंजुरी माझ्या सहीने आहे, असे म्हणत दौंड तालुक्याच्या विकासासाठी यंदा महायुतीच्या उमेदवाराला निवडून देण्याचं आवाहन अजित पवारांनी केलं.
राजकारणात एकेक दिवस महत्त्वाचा
मी राजकारणात आलो तेव्हा पुणे शहाराला 5 टीएमसी पाणी लागत होतं. पण, पुणे शहराला आज 22 टीमएमसी एवढं पाणी लागत आहे, पुणे शहर वाढलं तिथं पाणी गेलं ते आपल्या भागातूनच गेलं. दिवंगत गिरीश बापट यांनी पुण्यात विकासाची अनेक कामे केली. नदीसुधार कार्यक्रमासाठी निधी आणला, पिण्याच्या पाण्यासाठी निधी आणला. मेट्रो रेल्वे सुरू केली. मोदींच्या विचारांचा खासदार असल्यामुळेच पुणे शहराच्या विकासासाठी ही कामे झाली. आपल्या बारामती मतदारसंघात ही कामे का झाली नाहीत, तर गेल्या 10 वर्षात सत्ताधारी पक्षाच्या विरोधातील खासदार आहे म्हणूनच, विकास रखडल्याचे अजित पवारांनी म्हटले. राजकारणात एकेक दिवस महत्त्वाचा असतो. एक वर्षे पाऊस नाही पडला तर माझा शेतकरी तीन वर्षे दुष्काळाचा सामना करतो, तीन वर्षे घडी बसवण्यासाठी जातात, असेही अजित पवारांनी म्हटले.
आम्ही साधू-संत नाहीत
देवेंद्र फडणवीसांकडे जलसंपदा आणि ऊर्जा खाते असून माझ्याकडे अर्थखातं आहे. त्यामुळे, तिन्ही महत्त्वाच्या खात्याच्या माध्यमातूनच पाणी इथपर्यंत येणार आहे. पण, त्यासाठी 7 तारखेला घड्याळाचं बटण दाबायचं, आम्ही काही साधू-संत नाही. तुम्ही द्या, आमच्याकडून घ्या, आणि वाजवून घ्या,. त्यात कुठे कमी पडलो तर बोला... असे म्हणत अजित पवारांनी दौंडमधील मतदारांना आवाहन केलं. ब्रिटीशांच्या काळात टाटा धरण झालं, आता पाण्याचं महत्त्व जास्त आहे, म्हणून आम्हाला पाणी पाहिजे, ते पाणी आपण आणू, असे आश्वासन अजित पवारांनी दौडकरांना दिले. यावेळी, उपस्थितांमध्येही हशा पिकल्याचे दिसून आले.
तुम्ही कधी सोयाबिन, कापूस पिकवला
आतापर्यंत पवार साहेबांना जेवढं द्यायचे तेवढं दिलं, आता मला द्या असं आवाहन करत अजित पवार म्हणाले की, तुम्ही म्हणाल हा इतकं आता का करतो आहे आधी का केलं नाही? आता लक्षात आलं म्हणून करतोय. लोकांचा विरोध असलेली एकही गोष्ट आम्ही करणार नाही. काही जण म्हणतात सोयाबीन, कापसाला दर नाही. तुम्ही कधी हे पिकवले? दुधाचे काही लोकांना अनुदान मिळाले नाही. आचारसंहिता आहे म्हणून मला अधिकाऱ्यांना सांगता येत नाही
हेही वाचा