(Source: Poll of Polls)
Abdul Sattar on Raosaheb Danve : अखेर रावसाहेब दानवे हरले, अब्दुल सत्तारांची प्रतिज्ञा पूर्ण, 1 लाख लोकांसमोर टोपी उतरवणार!
Abdul Sattar on Raosaheb Danve, Sillod : "राजकारणात कुणी कुणाचा शत्रू किंवा मित्र नसतो. रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांना भोकरदनमध्ये (Bhokardan) देखील मते मिळाली नाहीत"
Abdul Sattar on Raosaheb Danve, Sillod : "राजकारणात कुणी कुणाचा शत्रू किंवा मित्र नसतो. रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांना भोकरदनमध्ये (Bhokardan) देखील मते मिळाली नाहीत. मनोज जरांगे फॅक्टर होता, आमचे कार्यकर्ते यावेळी नाराज होते, दानवे यांना मी बोलून दाखवले होते. आम्हाला शत्रू म्हणणाऱ्या लोकांनी पैठण मधून किती मतदान आहे हे पाहावे. रावसाहेब दानवे यांना कमी मतदान याचे वेगवेगळे कारणे आहेत. जरांगे यांनी दानवे (Raosaheb Danve) यांच्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती, त्यामुळे त्यांचा पराभव झाला", असं मंत्री अब्दुल सत्तार यांनी म्हटलं आहे. ते एबीपी माझाशी बोलत होते.
मी दानवे यांच्यासाठी अनेक सभा घेतल्या
अब्दुल सत्तार म्हणाले, मी दानवे यांच्यासाठी अनेक सभा घेतल्या. 17 सभा सिल्लोडमध्ये झाल्या, पण आमचे कार्यकर्ते नाराज होते. लोकसभेत होणारे मतदान विधानसभेत होत नाही, अशी कार्यकर्ते यांची नाराजी होती. वेगळा आदेश कसे देणार, किती लोकांना फोन करणार? मराठा समाज नेत्यांसमोर बोलत नव्हता,पण एकट्याच्या चर्चा होती, मी दानवे यांना याबाबत सांगितले होते. आम्ही दोघे दोस्त आहोत, मी त्यांच्यासोबत चर्चा केली होती.
कल्याण काळे देखील माझे मित्र आहेत, त्यांना मदत केली मान्य करतो
पुढे बोलताना अब्दुल सत्तार म्हणाले, कल्याण काळे देखील माझे मित्र आहेत. त्यांना मदत केली मान्य करतो, दानवे त्यांच्या भोकरमध्येही पिछाडीवर होते. आमचे कार्यकर्ते नाराज होते, माझ्या काही कार्यकर्त्यांनी कल्याण काळे यांना मदत केली, हे मी मान्य करतो. याबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना देखील मी माहिती दिली होती. मी नाही तर आमचे काही कार्यकर्ते दानवे यांच्या विरोधात गेले हे प्रामाणिकपणे कबूल करतो. मला विधानसभाला त्यांनी मदत न केल्याची भावना त्यांच्यामध्ये होती. लोक पारावर बसून विरोधात चर्चा करत असल्याची कल्पना दानवे यांना दिली होती. माझ्याकडून जेवढी झाली ते तेवढी दानवे यांना मदत केली आहे. दानवे याच्या भोकरदन मध्ये देखील 1400 मतांची पिछाडी आहे.
पक्षाच्या जबाबदारी मुळे त्यांना वेळ देता आला नाही
शेतकऱ्यांची देखील दानवे यांच्याबद्दल नाराजी होती, रेल्वे बाबत देखील नाराजी होती. लोकांमध्ये वेगवेगळ्या चर्चा होत्या. 25 वर्षांपासून जनसंपर्क नव्हता, केंद्रात जबाबदारी असल्याने तिकडे अधिक वेळ जात होता. पक्षाच्या जबाबदारी मुळे त्यांना वेळ देता आला नाही. मी केलेल्या घोषणेवर अजूनही कायम आहे. टोपी काढताना त्याचे प्रमुख पाहुणे रावसाहेब दानवे असतील. यावेळी तब्बल एक लाख लोक असतील. मोठा कार्यक्रम ठेवून टोपी काढेल. रावसाहेब दानवे आता योगायोगाने पडले, त्यामुळे त्यांच्या साक्षीने संभाजीनगरमध्ये कार्यक्रम ठेवून टोपी काढणार आहोत, असंही अब्दुल सत्तार यांनी सांगितले.
इतर महत्वाच्या बातम्या