एक्स्प्लोर

Video: पुण्यात 50 खोके, एकदम ओकेच्या घोषणा; अब्दुल सत्तारांनी सभागृहातून घेतला काढता पाय

Video: महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळाच्यावतीने संवाद साधण्यासाठी बाजार समित्यांचे सभापती, उपसभापती व सचिव यांची गुरुवारी निगडीतील ग. दि. माडगुळकर नाट्यगृह येथे राज्यस्तरीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते

पुणे : शिवसेना पक्षात फूट पडल्यानंतर 40 पेक्षा जास्त आमदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाऊन सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे, शिवसेनेत दोन गट पडले आहेत. त्यातच, शिवसेनेतील फुटीनंतर 50 खोके घेऊन आमदारांनी गद्दारी केल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटातील नेत्यांकडून करण्यात आला. त्यात, शिवसेना (Shivsena) खासदार संजय राऊत यांनी सातत्याने हा आरोप केला होता. त्यामुळे, 50 ओक्के एकदम ओक्के अशा घोषणाही अनेक ठिकाणी देण्यात आल्या. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून बंद झालेल्या या घोषणा अचानक देण्यात आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. 50 खोक्के, एकदम ओक्के असे म्हणत पुण्यात मंत्री अब्दुल सत्तार (Abdul sattar) यांना डिवचण्यात आलं. पुण्यातील या घटनेचा व्हिडिओही समोर आला आहे. राज्यातील सर्व बाजार समित्यांचे सभापती, उपसभापती व सचिवांनी अब्दुल सत्तारचे करायचे काय, खाली डोक वर पाय, पन्नास खोके एकदम ओक्केच्या घोषणांनी गुरुवारी निगडीतील ग. दि.माडगुळकर नाट्यगृह दणाणून सोडले. 

महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळाच्यावतीने संवाद साधण्यासाठी राज्यातील सर्व बाजार समित्यांचे सभापती, उपसभापती व सचिव यांची गुरुवारी पुण्यातील निगडीतील ग. दि. माडगुळकर नाट्यगृह येथे राज्यस्तरीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. राज्यातील बाजार समित्यांच्या कामकाजात करावयाचे कालानुरूप बदल, शेतमालाच्या विपणनामध्ये अंगीकारावयाच्या आधुनिक बाबी, शेतकरी व इतर सर्व बाजार घटकांना द्यावयाच्या सोयी-सुविधा, त्यात येणाऱ्या अडचणी व त्यावर करावयाच्या उपाययोजना इत्यादी विषयाचे अनुषंगाने येथील परिषदेत चर्चा करण्यात येणार होती.  या राज्यस्तरीय परिषदेचे उद्घाटन पणन मंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी सहकार व पणन, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. राजगोपाल देवरा, पणन संचालक विकास रसाळ, महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघाचे सभापती प्रविणकुमार नहाटा, पुणे कृषि पणन मंडळाचे कार्यकारी संचालक संजय कदम आणि राज्यातील सर्व बाजार समित्यांचे सभापती, उपसभापती, सचिव, राज्य बाजार समिती संघाचे सदस्य उपस्थित होते. 

राज्याचे पणनमंत्री अब्दुल सत्तार नियोजीत कार्यक्रमाला दीड तास उशिरा पोहचले. तसेच, तेथे आल्यानंतर त्यांनी केवळ एकाच प्रतिनिधीला बोलण्याचे निर्देश दिले. प्रतिनिधी बोलत असताना त्यांनी तुम्ही तुमचे प्रश्न मांडा, वाद निर्माण होईल असे वक्तव्य करु नका, असे म्हटले. तसेच, मला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला जायचे असे म्हणून परिषदेतून काढता पाय घेतला. मात्र, यावेळी बाजारसमितीच्या सर्वच सदस्य व पदाधिकाऱ्यांनी अब्दुल सत्तार यांच्याविरुद्ध घोषणाबाजी करत आपला रोष व्यक्त केला. येथील नाट्यगृहात पन्नास खोके एकदम ओकेच्या घोषणा देण्यात आल्या. तसेच, अब्दुल सत्तारांचं करायचं काय, खाली मुंडकं वर पाय.. अशी घोषणाबाजी देखील करण्यात आली आहे. 

हेही वाचा

ठाकरेंचा जबरा डाव, भायखळ्यातून डॉन अरुण गवळींची लेक; मिलिंद नार्वेकरांनी घेतली भेट 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Palghar News: वडिलांचा कारमधील मृतदेह पाहून लेकाने फोडला टाहो; आरोपींना तशीच शिक्षा द्या, माझ्याही जिवाला धोका
वडिलांचा कारमधील मृतदेह पाहून लेकाने फोडला टाहो; आरोपींना तशीच शिक्षा द्या, माझ्याही जिवाला धोका
पुणेकरांनो सावधान! खासगी टँकरमधून घरी येणारं पाणी दूषित; GBS रोगाचा धोका, 15 पाँईटवर कारवाई
पुणेकरांनो सावधान! खासगी टँकरमधून घरी येणारं पाणी दूषित; GBS रोगाचा धोका, 15 पाँईटवर कारवाई
मुंबईतील उद्यानात बिबट्या सफारी सुरू होणार; पर्यंटकांना बिबट्याचे दर्शन; पालकमंत्री आशिष शेलारांचे निर्देश
मुंबईतील उद्यानात बिबट्या सफारी सुरू होणार; पर्यंटकांना बिबट्याचे दर्शन; पालकमंत्री आशिष शेलारांचे निर्देश
मृत्युपूर्वी गोपीनाथ मुंडेंनी इशारा दिला होता, सांभाळून राहा, पण ऐकलं नाही; प्रकाश महाजनांनी सांगितला भस्मासूर
मृत्युपूर्वी गोपीनाथ मुंडेंनी इशारा दिला होता, सांभाळून राहा, पण ऐकलं नाही; प्रकाश महाजनांनी सांगितला भस्मासूर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pune Eknath Shinde : पालकमंत्रिपदाचा तिढा लवकरच सुटेल : एकनाथ शिंदेAshok Dhodi Kidnap Case Palghar : मोठी बातमी! अशोक धोडींचा मृतदेह गाडीच्या डिक्कीमध्ये सापडलाMahakumbh:ममता कुलकर्णी आणि लक्ष्मी त्रिपाठीचे महामंडलेश्वर पद काढले, किन्नर आखाड्याकडून मोठी कारवाईRaj Thackeray - Eknath Shinde Pune : एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे  पुण्यात एका कार्यक्रमात एकत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Palghar News: वडिलांचा कारमधील मृतदेह पाहून लेकाने फोडला टाहो; आरोपींना तशीच शिक्षा द्या, माझ्याही जिवाला धोका
वडिलांचा कारमधील मृतदेह पाहून लेकाने फोडला टाहो; आरोपींना तशीच शिक्षा द्या, माझ्याही जिवाला धोका
पुणेकरांनो सावधान! खासगी टँकरमधून घरी येणारं पाणी दूषित; GBS रोगाचा धोका, 15 पाँईटवर कारवाई
पुणेकरांनो सावधान! खासगी टँकरमधून घरी येणारं पाणी दूषित; GBS रोगाचा धोका, 15 पाँईटवर कारवाई
मुंबईतील उद्यानात बिबट्या सफारी सुरू होणार; पर्यंटकांना बिबट्याचे दर्शन; पालकमंत्री आशिष शेलारांचे निर्देश
मुंबईतील उद्यानात बिबट्या सफारी सुरू होणार; पर्यंटकांना बिबट्याचे दर्शन; पालकमंत्री आशिष शेलारांचे निर्देश
मृत्युपूर्वी गोपीनाथ मुंडेंनी इशारा दिला होता, सांभाळून राहा, पण ऐकलं नाही; प्रकाश महाजनांनी सांगितला भस्मासूर
मृत्युपूर्वी गोपीनाथ मुंडेंनी इशारा दिला होता, सांभाळून राहा, पण ऐकलं नाही; प्रकाश महाजनांनी सांगितला भस्मासूर
धक्कादायक! तपोवन एक्सप्रेससमोर ट्रक आडवा; लोको पायलटने शहाणपणा दाखवला, दुर्घटना टळली
धक्कादायक! तपोवन एक्सप्रेससमोर ट्रक आडवा; लोको पायलटने शहाणपणा दाखवला, दुर्घटना टळली
Palghar News: मोठी बातमी ! शिवसेना पदाधिकारी अशोक धोडींची ब्रीझा कार तलावातून बाहेर; मृतदेह पाहून उडाली खळबळ
मोठी बातमी ! शिवसेना पदाधिकारी अशोक धोडींची ब्रीझा कार तलावातून बाहेर; मृतदेह पाहून उडाली खळबळ
Kash Patel : आई वडिलांची ओळख करून दिली, जय श्री कृष्णा म्हणत अमेरिकन सिनेटमध्ये भाषण, लोकांनी जातीयवादी शिव्या दिल्या; एफबीआय संचालक काश पटेल काय काय म्हणाले?
आई वडिलांची ओळख करून दिली, जय श्री कृष्णा म्हणत अमेरिकन सिनेटमध्ये भाषण, लोकांनी जातीयवादी शिव्या दिल्या; एफबीआय संचालक काश पटेल काय काय म्हणाले?
... तर दिवसा मुदडे पडतील; नामदेव शास्त्रींच्या वक्तव्यावर धनंजय देशमुख संतापले, म्हणाले, आमची मानसिकता काय असेल
... तर दिवसा मुदडे पडतील; नामदेव शास्त्रींच्या वक्तव्यावर धनंजय देशमुख संतापले, म्हणाले, आमची मानसिकता काय असेल
Embed widget