एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
चित्रपट पाहून गाडीसाठी मित्राचे अपहरण करुन हत्या
खतरनाक खिलाडी टू या चित्रपटातील नकारात्मक बाजू उमरने आत्मसात केली आणि हे दुष्कर्म तो करून बसला. तेव्हा आपली मुलं कोणता चित्रपट पाहत आहेत. पाहिलेल्या चित्रपटाचा त्यांच्यावर सकारात्मक परिणाम होतोय का? यासंदर्भात त्यांच्याशी चर्चा करत राहाणे गरजेचं आहे.
पिंपरी : आलिशान गाडी घेण्यासाठी मित्राचे अपहरण करून मित्रानेच हत्या केली आहे. एक हिंदी चित्रपट पाहून त्याने हे दुष्कर्म केलं आहे. खतरनाक खिलाडी टू.... हा चित्रपट पाहून उमर शेख या 21 वर्षीय तरुणाने 17 वर्षीय अब्दुल अहद सिद्धिकी या त्याच्या मित्राचीच हत्या केली आहे. पिंपरी चिंचवडमधील या खतरनाक घटनेने खळबळ उडाली आहे. उमर शेखने चाळीस लाख रुपयांच्या खंडणीसाठी स्वतःच्याच मित्राचे अपहरण केले आणि त्याची हत्या केली आहे.
माहितीनुसार एकाच परिसरात राहणारे अब्दुल अहद आणि उमर रोज सोबतच असायचे. तो दोघे अनेकदा पार्ट्या करायचे. काल देखील उमर पार्टीसाठी अब्दुल अहदला घरून घेऊन गेला होता. मात्र उमरला आलिशान गाडी घ्यायची असल्याने त्याने आपल्या मित्राचाच गळा घोटला. आता तो तुरुंगाची हवा खात आहे.
अब्दुल अहदला घेऊन गेल्यानंतर त्याने अब्दुलच्या घरी फोन करुन अब्दुल हवा असेल तर 40 लाख रुपये द्या, अशी मागणी केली. अब्दुलच्या भावाने त्याच्याशी बोलताना पैसे देण्याचे कबूल देखील केले. अशा आशयाचे फोन रेकॉर्डिंग देखील पोलिसांच्या हाती लागले आहे. पैसे द्या आणि अब्दुलला घेऊन जा, असे त्याने फोनवर बोलताना सांगितले. त्यानंतर मी त्याला घरी आणून सोडेल, असेही त्याने म्हटले.
खतरनाक खिलाडी टू या चित्रपटातील नकारात्मक बाजू उमरने आत्मसात केली आणि हे दुष्कर्म तो करून बसला. तेव्हा आपली मुलं कोणता चित्रपट पाहत आहेत. पाहिलेल्या चित्रपटाचा त्यांच्यावर सकारात्मक परिणाम होतोय का? यासंदर्भात त्यांच्याशी चर्चा करत राहाणे गरजेचं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
ठाणे
महाराष्ट्र
Advertisement