एक्स्प्लोर

Somnath Suryawanshi case: सरकारचे 10 लाख नाकारणाऱ्या सोमनाथ सूर्यवंशीच्या आईला सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर रडू कोसळलं, म्हणाल्या....

Somnath Suryawanshi case: प्रकाश आंबेडकर यांनी हे प्रकरण न्यायालयात लावून धरले होते. त्यासाठी प्रकाश आंबेडकर यांनी अनेक वर्षांनी काळा कोट चढवून कोर्टात युक्तिवादही केला होता.

Somnath Suryawanshi case: परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी मृत्यूप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने एक महत्त्वाचा निकाल दिला. सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला सोमनाथ सूर्यवंशी मृत्यूप्रकरणात (Somnath Suryawanshi death case) गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. यापूर्वी उच्च न्यायालयाने हाच आदेश दिला होता. मात्र, महायुती सरकारने याविरोधात सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) धाव घेतली होती. परंतु, आता सर्वोच्च न्यायालयाने कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय योग्य ठरवत सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात गुन्हा दाखल करण्यास सांगितले आहे. हा महायुती सरकार आणि परभणीतील पोलीस यंत्रणेला मोठा धक्का मानला जात आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालानंतर सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आई विजयाबाई यांनी 'एबीपी माझा'शी संवाद साधला. यापूर्वी सरकारने सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाला 10 लाखांची आर्थिक मदत जाहीर केली होती. मात्र, सोमनाथच्या मृत्यूला पोलीसच जबाबदार आहेत, असे सांगत सोमनाथ यांच्या आईने ही मदत नाकारली होती. त्यानंतर आज सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आल्यानंतर सोमनाथ यांच्या आईला रडू कोसळले. यावेळी प्रतिक्रिया देताना विजयाबाई सूर्यवंशी यांनी म्हटले की, मी परभणी वकील संघ, औरंगाबाद वकील संघ, मुंबई उच्च न्यायालय वकील संघ आणि प्रकाश आंबेडकर या सर्वांची आभारी आहे. प्रकाश आंबेडकर एखाद्या भावासारखे माझ्या पाठीशी उभे राहिले. त्यांनी खंबीरपणे उभे राहून मला न्याय मिळवून दिला. या देशाच्या संविधानासाठी सोमनाथचं रक्त सांडलं आहे, त्याने बलिदान दिलं आहे. प्रकाश आंबेडकर साहेबांनी त्यांचं बलिदान वाया जाऊन दिले नाही, यासाठी मी त्यांची आभारी आहे, असे विजयाबाई सूर्यवंशी यांनी म्हटले.

Parbhani Somnath Suryawanshi case: माझ्या लेकराला हाडं तुटेपर्यंत बेदम मारलं, पोलिसांनी त्याचा खून केला; सोमनाथ सूर्यवंशीच्या आईचा आरोप

पोलिसांनी घरात शिरुन दारं तोडून मारहाण केली. सोमनाथचं इन कॅमेरा शवविच्छेदन झाले होते, ते खरं झालं होतं. त्या शवविच्छेदन अहवालात मारहाणीमुळे सोमनाथचा मृत्यू झाल्याचे म्हटले होते. कोणाच्या लेकरावर ही वेळ येऊ नये. माझा मुलगा वकील होणार होता. माझ्या लेकराला डांबून नेऊन पोलिसांनी मारलं मात्र, राज्य सरकारने दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. माझ्या मुलाला चार दिवस मारहाण करुन पोलीस कोठडीत ठेवलं. माझ्या लेकराला हाडं तुटेपर्यंत बेदम मारलं, पोलिसांनी माज्या लेकराचा खून केला आणि त्याला हृदयविकाराचा झटका आल्याचे सांगितले, असे विजयाबाई सूर्यवंशी यांनी म्हटले.

आणखी वाचा

सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा महायुती सरकारला झटका, प्रकाश आंबेडकर ट्विट करुन म्हणाले...

'सोमनाथ सूर्यवंशीला मारहाण झालीच नाही', परभणी हिंसाचारावर देवेंद्र फडणवीसांचे 2 मोठे खुलासे अन् 2 मोठ्या घोषणा!

10 लाख नको, माझ्या मुलाला काहीही आजार नव्हता, सोमनाथ सूर्यवंशीच्या आईने मुख्यमंत्र्यांचा दावा 5 मिनिटांत खोडला!

महत्त्वाच्या बातम्या

IND vs NZ : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या वनडेवर पावसाचं सावट, वेलिंग्टनमध्ये वातावरण कसं असणार? जाणून घ्या अपडेट
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या वनडेवर पावसाचं सावट, वेलिंग्टनमध्ये वातावरण कसं असणार? जाणून घ्या अपडेट
BMC Law Department Shakeup : सुप्रीम कोर्टाच्या चपराकीनंतर मुंबई महापालिका ॲक्टिव्ह मोडवर, मुख्य विधी अधिकारी कोमल पंजाबी सक्तीच्या रजेवर 
सुप्रीम कोर्टाच्या चपराकीनंतर मुंबई महापालिका ॲक्टिव्ह मोडवर, मुख्य विधी अधिकारी कोमल पंजाबी सक्तीच्या रजेवर 
CBI Action On Kishore Biyani : 'बिग बाजार'चे संस्थापक किशोर बियाणी यांच्यावर CBI कडून गुन्हा दाखल! SBI ची 904 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप
'बिग बाजार'चे संस्थापक किशोर बियाणी यांच्यावर CBI कडून गुन्हा दाखल! SBI ची 904 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप
Virat Kohli: विराट कोहली सचिन तेंडुलकरचा 100 शतकांचा विक्रम मोडणार का? टीम इंडियाच्या माजी प्रशिक्षकाचं कोहलीच्या चाहत्यांचं टेन्शन वाढवणारं वक्तव्य...
विराट कोहली सचिन तेंडुलकरचा 100 शतकांचा विक्रम मोडणार का?टीम इंडियाचा माजी प्रशिक्षक म्हणाला...

व्हिडीओ

NCP Merger News : तटकरेंचा यू-टर्न, पुन्हा चर्चेत विलिनीकरण Special Report
Ameet Satam vs Shiv Sena : साटमांना आमंत्रण, वादाला निमंत्रण Special Report
Raju Shetti Andolan Kolhapur : 'उसाला द्या दाम' , हायवेवर चक्काजाम Special Report
Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IND vs NZ : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या वनडेवर पावसाचं सावट, वेलिंग्टनमध्ये वातावरण कसं असणार? जाणून घ्या अपडेट
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या वनडेवर पावसाचं सावट, वेलिंग्टनमध्ये वातावरण कसं असणार? जाणून घ्या अपडेट
BMC Law Department Shakeup : सुप्रीम कोर्टाच्या चपराकीनंतर मुंबई महापालिका ॲक्टिव्ह मोडवर, मुख्य विधी अधिकारी कोमल पंजाबी सक्तीच्या रजेवर 
सुप्रीम कोर्टाच्या चपराकीनंतर मुंबई महापालिका ॲक्टिव्ह मोडवर, मुख्य विधी अधिकारी कोमल पंजाबी सक्तीच्या रजेवर 
CBI Action On Kishore Biyani : 'बिग बाजार'चे संस्थापक किशोर बियाणी यांच्यावर CBI कडून गुन्हा दाखल! SBI ची 904 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप
'बिग बाजार'चे संस्थापक किशोर बियाणी यांच्यावर CBI कडून गुन्हा दाखल! SBI ची 904 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप
Virat Kohli: विराट कोहली सचिन तेंडुलकरचा 100 शतकांचा विक्रम मोडणार का? टीम इंडियाच्या माजी प्रशिक्षकाचं कोहलीच्या चाहत्यांचं टेन्शन वाढवणारं वक्तव्य...
विराट कोहली सचिन तेंडुलकरचा 100 शतकांचा विक्रम मोडणार का?टीम इंडियाचा माजी प्रशिक्षक म्हणाला...
Beed : खेळाडूंच्या बोगस प्रमाणपत्र घोटाळ्याचा पर्दाफाश करणाऱ्या वैभव चव्हाणचा संशयास्पद मृत्यू, घातपाताचा आरोप; बीडमध्ये खळबळ
खेळाडूंच्या बोगस प्रमाणपत्र घोटाळ्याचा पर्दाफाश करणाऱ्या वैभव चव्हाणचा संशयास्पद मृत्यू, घातपाताचा आरोप; बीडमध्ये खळबळ
चौफेर घेरलेल्या निवडणूक आयोगाचा रिव्हर्स गिअर सुरुच, तीन दिवसात दुसरा निर्णय! SIR मधून वगळलेल्या महाराष्ट्रासह 7 राज्यातील मतदारांना आणखी एक संधी मिळणार
चौफेर घेरलेल्या निवडणूक आयोगाचा रिव्हर्स गिअर सुरुच, तीन दिवसात दुसरा निर्णय! SIR मधून वगळलेल्या महाराष्ट्रासह 7 राज्यातील मतदारांना आणखी एक संधी मिळणार
चीन बांगलादेशला 22 हजार कोटींची लढाऊ विमाने देणार अन् पाकिस्तानी हवाई दल भारतीय सीमेपासून अवघ्या 40 किमी अंतरावर बांगलादेशी पायलट्सना ट्रेनिंग देणार
चीन बांगलादेशला 22 हजार कोटींची लढाऊ विमाने देणार अन् पाकिस्तानी हवाई दल भारतीय सीमेपासून अवघ्या 40 किमी अंतरावर बांगलादेशी पायलट्सना ट्रेनिंग देणार
Eknath Shinde : शरद पवारांवर ब्रीच कँडीत उपचार सुरू; एकनाथ शिंदेंसह 'हे' नेते ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल, मुख्यमंत्र्यांनी फोनवरून केली विचारपूस
शरद पवारांवर ब्रीच कँडीत उपचार सुरू; एकनाथ शिंदेंसह 'हे' नेते ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल, मुख्यमंत्र्यांनी फोनवरून केली विचारपूस
Embed widget