'सोमनाथ सूर्यवंशीला मारहाण झालीच नाही', परभणी हिंसाचारावर देवेंद्र फडणवीसांचे 2 मोठे खुलासे अन् 2 मोठ्या घोषणा!
Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सोमनाथ सूर्यवंशीच्या मृत्यूबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. त्यांनी एकूण दोन खुलासे केले असून दोन महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत.
नागपूर : परभणीत संविधानाच्या शिल्पाची विटंबना झाल्यानंतर दगडफेक आणि हिंसाचाराची घटना घडली. या घटनेनंतर पोलिसांनी अनेकांना ताब्यात घेतले. यात सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाचा पोलीस न्यायालयीन कोठडीत असताना मृत्यू झाला. सूर्यवंशी या तरूणाच्या मृत्यूनंतर राज्यात सर्वत्र संताप व्यक्त करण्यात आला. सूर्यवंशी मृत्यूप्रकरणाची सखोल चौकशी केली पाहिजे, अशी मागणी केली जात होती. यावरच देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात सविस्तर माहिती दिली आहे. त्यांनी सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांना 10 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याचे घोषित केले आहे. सोबतच देवेंद्र फडणवीस यांनी दोन महत्त्वाचे खुलासे केले आहेत. तसेच दोन महत्त्वाच्या घोषणाही केल्या आहेत.
देवेंद्र फडणवीसांचा पहिला खुलासा
सोमनाथ सूर्यवंशी (Somnath Suryavanshi) हे लॉचे शिक्षण घेत होते. ते मूळचे लातूर जिल्ह्यातील आहेत. ते हल्ली पुण्यात असतात आणि परभणीत शिक्षण घेत होते. त्यांच्यासंदर्भात वस्तुस्थिती अशी आहे की, परभणीत जळपोळीच्या व्हिडीओमध्ये जी मंडळ दिसत होती, त्यांना अटक करण्यात आली होती. यातच सूर्यवंशी यांनाही अटक करण्यात आली. त्यांना दोन वेळा मॅजिस्ट्रेटपुढे उभे करण्यात आले. मॅजिस्ट्रेटची ऑर्डर माझ्याकडे आहे. दोन्ही वेळा मॅजिस्ट्रेटने त्यांना पोलिसांनी तुम्हाला कुठल्या थर्ड डिग्रीचा वापर केलेला आहे का, पोलिसांनी तुम्हाला मारहाण झालेली आहे का? असं विचारलं. सोमनाथ सूर्यवंशी यांनी मला कुठलीही मारहाण झालेली नाही, असे सांगितलेले आहे. सोमनाथ सूर्यवंशी पोलीस कोठडीत असतानाचे व्हिडीओ फुटेज आपल्याकडे आहेत. हे व्हिडओ फुटेज अनएडिटेड आहेत. या पूर्ण व्हिडीओ फुटेजमध्ये सोमनाथ सूर्यवंशी यांना कुठेही मारहाण झाल्याचं दिसत नाही.
देवेंद्र फडणीसांचा दुसरा खुलासा
सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. त्या शवविच्छेदनाच्या रिपोर्टचे पहिले पान सर्वांनी पाहिले आहे. या रिपोर्टनुसार सोमनाथ सूर्यवंशी यांना श्वसनाचा दुर्धर आजार आहे. सोमनाथ सूर्यवंशी यांच्या अंगावरील जुन्या जखमांचाही उल्लेख आहे. पोलीस कोठडीतून ते जेव्हा एमसीआरमध्ये गेले. तेव्हा सूर्यवंशी यांना जळजळ होत होतं. तक्रारीनंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आले आणि त्यांना मृत घोषित करण्यात आले, अशी माहिती फडणवीस यांनी दिली.
देवेंद्र फडणवीस यांनी कोणत्या दोन घोषणा केल्या?
सोबतच सोमनाथ सूर्यवंशी हे आरोपी असले तरी ते गरीब समाजाचे आहेत. मागासवर्गीय आहेत. पैशाने कोणाचा जीव परत येत नाही. परंतु त्यांच्या कुटुंबीयांना 10 लाख रुपयांची आर्थिक मदत करण्यात येईल, अशी पहिली घोषणा फडणवीस यांनी केली. तसेच काही शंका उपस्थित झाल्या आहेत. शंका उपस्थित झाल्या असतील तर त्यांचे निरसण झाले पाहिजे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची न्यायालयीन चौकशी केली जाईल. 1998 साली न्यायालयीन चौकशीसाठी निवृत्त न्यायाधीशांची समिती स्थापन केली जाईल, अशी दुसरी घोषणा फडणवीस यांनी केली.
Devendra Fadnavis Video News :
हेही वाचा :