एक्स्प्लोर

परभणी प्रकरणातील मृत सोमनाथ सूर्यवंशीला न्याय द्या, भीमसैनिकांवरील खोटे गुन्हे मागे घ्या, सचिन खरातांनी दिला आंदोलनाचा इशारा

परभणी प्रकरणातील मृत सोमनाथ सूर्यवंशीला न्याय द्यावा, अन्यथा पुढच्या दोन दिवसात आंदोलन करणार असल्याचा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे  राष्ट्रीय अध्यक्ष सचिन खरात यांनी दिला आहे.

Sachin Kharat : परभणी प्रकरणातील मृत सोमनाथ सूर्यवंशीला न्याय द्यावा, तसेच आंबेडकरी महिला वत्सला मानवते यांचा पोलिसांनी विनयभंग करून बेदम मारहाण केली होती, त्यांनाही न्याय द्यावा, अन्यथा दोन दिवसात आंदोलन करणार असल्याचा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे  राष्ट्रीय अध्यक्ष सचिन खरात यांनी दिला आहे. तसेच अनेक भीमसैनिकांवर खोटे गुन्हे दाखल केले आहेत, ते अजूनपर्यंत मागे घेतलेले नाहीत, ते तात्काळ मागे घ्यावेत अशी मागणी खरात यांनी केली आहे. 

भीमसैनिकांवर दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घ्यावेत

परभणीमध्ये संविधानाच्या प्रतिकृतीची समाजकंटकाने विटंबना केली होती. त्यानंतर भीमसैनिकांनी परभणी बंदची घोषणा केली होती. यादरम्यान तीव्र आंदोलन झाले होते, यावेळी पोलीस अधिकाऱ्यांनी घरात घुसून कोंबिंग ऑपरेशन करत युवकांना आणि महिलांना बेदम मारहाण केली होती. तसेच अनेकांना अटकही करण्यात आली होती. या ऑपरेशन दरम्यान मोठ्या प्रमाणावर घरांचे आणि गाड्यांचे देखील नुकसान झाले होते. यावेळी आंबेडकरी महिला वत्सला मानवते यांचा पोलिसांनी विनयभंग करून बेदम मारहाण केली होती. तसेच सोमनाथ सूर्यवंशी या युवकाचा न्यायालयीन कोठडीमध्ये मृत्यू झाला होता. या प्रकरणांमध्ये अजूनपर्यंत पोलिस अधिकाऱ्यांवर ॲट्रॉसिटी आणि मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला नाही. तसेच खोटे गुन्हे भीमसैनिकांवर दाखल केले आहेत, ते अजूनपर्यंत मागे घेतलेले नाहीत. हे सर्व गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत. तसेच अधिकाऱ्यांवर कारवाई करुन न्याय द्यावा असे खऱात म्हणाले. अन्यथा 2 दिवसानंतर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा सचिन खरात यांनी दिला आहे.

परभणी येथील घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी बीडमध्ये मोर्चा

परभणी येथील घटनेचा निषेध व्यक्त करत, बीडमध्ये आंबेडकरवादी संघटनेच्या वतीने, संविधान बचाव जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चाला बीड शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून सुरुवात झाली असून हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे. या मोर्चाच्या माध्यमातून, सोमनाथ सुर्यवंशीच्या हत्येस जबाबदार पोलीसांवर गुन्हे दाखल करा, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करणारे गृहमंत्री अमित शाह यांची मंत्री मंडळातुन हकालपट्टी करा, परभणी येथील महिलांवर अमानुष लाठीचार्ज करणाऱ्या पोलीसांवर गुन्हे दाखल करा, देशातील सर्व निवडणूका मतपत्रिकेवर घ्या, शासकिय नोकरीतील गुत्तेदारी पध्दती रद्द करुन कायमस्वरुपी नौकरी द्या आणि रिक्त असलेल्या राखीव जागा त्वरीत भरा, मागासवर्गीय विद्यार्थ्यांना मिळणारी भारत सरकार शिष्यवृत्ती दरमहा वेळेवर द्या, शासकिय सेवेतील आरक्षणामधील वगर्गीकरण कायदा रद्द करा, शिक्षणाचे राष्ट्रीयकरण करा. या प्रमुख मागण्या करण्यात येत आहेत.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

HMPV व्हायरसबाबत महत्त्वाची अपडेट, भारतातील लहान मुलांना कितपत धोका, व्हायरस महामारीचं रुप घेणार?
HMPV व्हायरसबाबत महत्त्वाची अपडेट, भारतातील लहान मुलांना कितपत धोका, व्हायरस महामारीचं रुप घेणार?
Sucess Story: आता आमचो आंबाच नाय ड्रॅगन पण! नोकरीचा नाद सोडून गावी परतला, 35 गुंठ्यात ड्रॅगनफ्रूटमधून तरुण कमावतोय..
आता आमचो आंबाच नाय ड्रॅगन पण! नोकरीचा नाद सोडून गावी परतला, 35 गुंठ्यात ड्रॅगनफ्रूटमधून तरुण कमावतोय..
What is Human Metapneumovirus In India : भारतात एन्ट्री केलीच, एचएमपीव्ही व्हायरस किती खतरनाक? लक्षणे अन् उपाय काय? आपल्याला पडलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे!
भारतात एन्ट्री केलीच, एचएमपीव्ही व्हायरस किती खतरनाक? लक्षणे अन् उपाय काय? आपल्याला पडलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे!
Human Metapneumovirus : भारतात एकाच दिवसात HMVP व्हायरस बाधित दुसरा रुग्ण सापडला, महाराष्ट्र सरकार अलर्ट मोडवर!
भारतात एकाच दिवसात HMVP व्हायरस बाधित दुसरा रुग्ण सापडला, महाराष्ट्र सरकार अलर्ट मोडवर!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

All Party Leader Meet Governer Mumbai : सर्वपक्षीय नेत्यांनी घेतली राज्यपालांची भेट,काय मागणी केली?Dr Ravi Godse On HMPV virus : एचएममपीव्हीची व्हायरस नेमका काय आहे? डॉ. रवी गोडसेंनी सविस्तर सांगितलंABP Majha Marathi News Headlines 12PM TOP Headlines 12 PM 06 January 2025 दुपारी १२ च्या हेडलाईन्सWhat Is HMPV virus : चीनमध्ये HMPV व्हायरस, जगाला धडकी; नवा व्हायरस कोरोनापेक्षाही घातक?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
HMPV व्हायरसबाबत महत्त्वाची अपडेट, भारतातील लहान मुलांना कितपत धोका, व्हायरस महामारीचं रुप घेणार?
HMPV व्हायरसबाबत महत्त्वाची अपडेट, भारतातील लहान मुलांना कितपत धोका, व्हायरस महामारीचं रुप घेणार?
Sucess Story: आता आमचो आंबाच नाय ड्रॅगन पण! नोकरीचा नाद सोडून गावी परतला, 35 गुंठ्यात ड्रॅगनफ्रूटमधून तरुण कमावतोय..
आता आमचो आंबाच नाय ड्रॅगन पण! नोकरीचा नाद सोडून गावी परतला, 35 गुंठ्यात ड्रॅगनफ्रूटमधून तरुण कमावतोय..
What is Human Metapneumovirus In India : भारतात एन्ट्री केलीच, एचएमपीव्ही व्हायरस किती खतरनाक? लक्षणे अन् उपाय काय? आपल्याला पडलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे!
भारतात एन्ट्री केलीच, एचएमपीव्ही व्हायरस किती खतरनाक? लक्षणे अन् उपाय काय? आपल्याला पडलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे!
Human Metapneumovirus : भारतात एकाच दिवसात HMVP व्हायरस बाधित दुसरा रुग्ण सापडला, महाराष्ट्र सरकार अलर्ट मोडवर!
भारतात एकाच दिवसात HMVP व्हायरस बाधित दुसरा रुग्ण सापडला, महाराष्ट्र सरकार अलर्ट मोडवर!
Nandurbar News : मोठी बातमी : 23 वर्षीय दिपाली चित्तेला भोसकलं, तरुणीच्या मृत्यूने महाराष्ट्र हादरला
मोठी बातमी : 23 वर्षीय दिपाली चित्तेला भोसकलं, तरुणीच्या मृत्यूने महाराष्ट्र हादरला
Beed Crime: संतोष देशमुख प्रकरणात सीआयडीच्या मोठ्या हालचाली, वाल्मिक कराडला मकोका लागणार?
मोठी बातमी: वाल्मिक कराडला मोक्का लागणार? सीआयडीच्या हालचालींना वेग
Eknath Shinde : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना जीवे मारण्याची धमकी, व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल, इन्स्टाग्राम लाईव्हवर शिवीगाळ
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना जीवे मारण्याची धमकी, व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल, इन्स्टाग्राम लाईव्हवर शिवीगाळ
Walmik Karad : 'खाकी' आहे खंडणीखोर, हाफ मर्डर करणाऱ्यांच्या साक्षीला! दोन शासकीय बाॅडीगार्ड ठेवणाऱ्या वाल्मिक कराडवर 15 गुन्हे, सुदर्शन घुले त्याच्या पुढचा निघाला
'खाकी' आहे खंडणीखोर, हाफ मर्डर करणाऱ्यांच्या साक्षीला! दोन शासकीय बाॅडीगार्ड ठेवणाऱ्या वाल्मिक कराडवर 15 गुन्हे, सुदर्शन घुले त्याच्या पुढचा निघाला
Embed widget