एक्स्प्लोर

मला शून्यावर जाऊन पुन्हा काम करायचंय : पंकजा मुंडे

मला पुन्हा शून्यावर जाऊन काम करुन स्वत:ला सिद्ध करायचं आहे, अशा भावना भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी व्यक्त केल्या आहेत. एबीपी माझाला दिलेल्या एक्स्क्लुझिव्ह मुलाखतीत मुंडे यांनी विविध विषयांवर संवाद साधला. एबीपी माझाचे संपादक राजीव खांडेकर यांनी त्यांची मुलाखत घेतली. गोपीनाथगडावर झालेल्या भाषणानंतर त्यांनी पहिल्यांदाच संवाद साधला.

मुंबई : माझ्यावर अशी टीका होते की वडिलांमुळे मला हे सगळं मिळालं. त्यामुळं मला शून्यावर जाऊन पुन्हा काम करायचं आहे. मला आता स्वतःला पाहायचं आहे. मी किती मुंडे साहेबांमुळं आहे आणि किती स्वत:च्या कामामुळं. मी स्वतःला आधीच सिद्ध केलं आहे मात्र पुन्हा शून्यावर जाऊन काम करुन स्वत:ला सिद्ध करायचं आहे, अशा भावना भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी व्यक्त केल्या आहेत. एबीपी माझाला दिलेल्या एक्स्क्लुझिव्ह मुलाखतीत मुंडे यांनी विविध विषयांवर संवाद साधला. एबीपी माझाचे संपादक राजीव खांडेकर यांनी त्यांची मुलाखत घेतली. गोपीनाथगडावर झालेल्या भाषणानंतर त्यांनी पहिल्यांदाच संवाद साधला. मुंडे यावेळी म्हणाल्या की, मी नाराज नाहीच. मला आता स्वतःला पाहायचं आहे. यावेळी त्यांनी अमिताभ बच्चन यांचं उदाहरण दिलं. त्या म्हणाल्या की अमिताभ बच्चन यांच्या मुलें कितीही चांगला अभियान केला तरी त्याला अमिताभ बच्चन यांचा मुलगा आहे हीच ओळख मिळते, असे त्या म्हणाल्या. त्या म्हणाल्या, मी आमदार झाले नाही पण माझ्यामुळे अनेक आमदार झाले याचा आनंद आहे. मी फेसबुकवर पोस्ट लिहिली त्यावेळी माजी मंत्री लिहू नका असं मी सांगितलं होतं. ट्विटर हँडलवर कधी कमळ नव्हतं, त्यामुळं कमळ त्यावेळीच नव्हतं असं म्हणणं चूक आहे. त्यावेळी माझ्या मनात खदखद नव्हती, आता आपण आमदारही नाहीत. त्यामुळं पुढे काय करायचं हे ठरवायचं होतं त्यासाठी ती पोस्ट लिहिली होती, असे त्या म्हणाल्या. मी पक्ष सोडण्याच्या वावड्या का कुठल्या माहिती नाही, मी आजिबात तणावाखाली नाही पण अस्वस्थ आहे. मी पॉवर गम खेळतेय असं वातावरण तयार झालं. मी दबाव तयार करतेय अशी चर्चा झाली, असे त्या म्हणाल्या. मुंडे म्हणाल्या की, मला त्या चर्चेला विराम द्यायचा होता. त्यामुळे कोअर कमिटीतून काढा असं म्हटलं. मला आता भाजप कार्यकर्ती म्हणून काम करायचं आहे. एनजीओच्या माध्यमातून काम करायचं आहे. मी बंड का करू, मी पक्ष का बदलू? असंही त्या म्हणाल्या. मी भाजप सोडणार नाही. भाजपने मला सोडायचं का नाही ते त्यांनी ठरवावं. मी कोअर कमिटीत आता मी जाणार नाही. मी हे पद स्वतःसाठी सोडलं असल्याचं देखील त्यांनी सांगितलं. माझं व्यक्त होणं हे नैसर्गिक आहे. मी अनेक छटा राजकारणाच्या पहिल्या आहेत. वडिलांच्या कर्तृत्वाचा प्रभाव माझ्यावर आहे. माझे वडील वारले त्यावेळी मी शून्यावर होते. आता माझ्यावर अशी टीका होते की वडिलांमुळे हे मिळालं. आता मला पुन्हा शून्यावर जायचं आहे. मला पाहायचं आहे की, काही नसताना मी काही मिळवू शकेल का?, असं पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या. मी अन्याय झाला असं मी कधीच म्हटलं नाही. मी पराभवानंतर मी जबाबदारी स्वीकारली होती. पराभवाविषयी मी नाराज नाही. माझा झालेला पराभव माझा पराभव आहे कुणाचा विजय नाही, असे देखील त्या म्हणाल्या.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: परीक्षा सुधारणा विधेयक आज राज्यसभेत मांडणार, काल लोकसभेत मंजूर
Maharashtra Live News Updates: परीक्षा सुधारणा विधेयक आज राज्यसभेत मांडणार, काल लोकसभेत मंजूर
Tukaram Mundhe Pune FDA Action: पुण्यातील पेठाही आता FDAच्या रडारावर; अनेक मिठाईच्या दुकानावर छापे, 4 दिवसांत 45 लाख 70 हजार अन्नसाठा जप्त, 5 हॉटेलचे परवानेही निलंबित
पुण्यातील पेठाही आता FDAच्या रडारावर; अनेक मिठाईच्या दुकानावर छापे, 4 दिवसांत 45 लाख 70 हजार अन्नसाठा जप्त, 5 हॉटेलचे परवानेही निलंबित
WI vs PAK 1st Test : कराची ते इस्लामाबाद सन्नाटा! आधी वेस्ट इंडिजने काढली इज्जत, अन् मग ICCने फिरवला चाबूक; पाकिस्तानच्या 2 खेळाडूंवर मोठी कारवाई
कराची ते इस्लामाबाद सन्नाटा! आधी वेस्ट इंडिजने काढली इज्जत, अन् मग ICCने फिरवला चाबूक; पाकिस्तानच्या 2 खेळाडूंवर मोठी कारवाई
Rahu Gochar 2026 : श्रावण महिन्यात राहूचं मोठ्ठं संक्रमण; ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीलाच 4 राशींचा भाग्योदय होणार सुरु, धनसंपत्तीत भरभराट
श्रावण महिन्यात राहूचं मोठ्ठं संक्रमण; ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीलाच 4 राशींचा भाग्योदय होणार सुरु, धनसंपत्तीत भरभराट

व्हिडीओ

Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
Rahul Gandhi Vs Amit Shah : विधेयकाची नौका पार, 'पॅलेट'वरुन 'गोळीबार' | Special Report ABP Majha
Pune University Scam | बाजार डीग्रीचा, शिक्षणाचा बट्ट्याबोळ | Special Report ABP Majha
Maratha Reservation | जरांगेंचा पुन्हा एल्गार, सरकारपुढे नवं आव्हान | Special Report ABP Majha
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sangli Crime News: दोघांत कामावरून नेहमीच वाद; झोपलेला पाहून डाव साधला; डोक्यात दांडकं मारलं अन्...; विट्यात नेमकं काय घडलं?
दोघांत कामावरून नेहमीच वाद; झोपलेला पाहून डाव साधला; डोक्यात दांडकं मारलं अन्...; विट्यात नेमकं काय घडलं?
Tukaram Munde FDA News: तुकाराम मुंढेंना डबल धक्का; 29 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची तक्रार, नरहरी झिरवळांना पत्र धाडलं, नेमकं काय घडलं?
तुकाराम मुंढेंना डबल धक्का; 29 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची तक्रार, नरहरी झिरवळांना पत्र धाडलं, नेमकं काय घडलं?
4000 कोटींच्या 'रामायण: पार्ट 1'चा भव्य ट्रेलर प्रदर्शित; ब्रह्ममुहूर्तावर घडलं प्रभू श्रीरामांचं भव्य दर्शन, तर रावणाच्या भूमिकेतला सुपरस्टार यश 'शोस्टॉपर'
4000 कोटींच्या 'रामायण: पार्ट 1'चा भव्य ट्रेलर प्रदर्शित; ब्रह्ममुहूर्तावर घडलं प्रभू श्रीरामांचं भव्य दर्शन, तर रावणाच्या भूमिकेतला सुपरस्टार यश 'शोस्टॉपर'
Shivsena Symbol Hearing: शिवसेना पक्ष नाव अन् धनुष्यबाण चिन्ह प्रकरण, सर्वोच्च न्यायालयात आज महत्वपूर्ण सुनावणी पार पडणार
शिवसेना पक्ष नाव अन् धनुष्यबाण चिन्ह प्रकरण, सर्वोच्च न्यायालयात आज महत्वपूर्ण सुनावणी पार पडणार
E20: ई20 च्या मुद्यावर वाहन कंपन्यांवर केंद्र सरकारचा दबाव, अरविंद केजरीवाल यांचा आरोप, राष्ट्रीय टाऊन हॉल कार्यक्रमावर ठाम
अधिकारी फोनवर बोलतात पण सरकारचा वाहन उत्पादक कंपन्यांवर ई 20 वरुन दबाव : अरविंद केजरीवाल
Ramayana Part 1 Trailer Review: प्रभू श्रीरामांचं तेजस्वी रुप, रावणरुपी यशचा रुद्रावतार, इंद्राचा ऐरावत, डोळे खिळवून ठेवणारा जटायू; 4000 कोटींच्या 'रामायण'मध्ये काय खास?
प्रभू श्रीरामांचं तेजस्वी रुप, रावणरुपी यशचा रुद्रावतार, इंद्राचा ऐरावत, डोळे खिळवून ठेवणारा जटायू; 4000 कोटींच्या 'रामायण'मध्ये काय खास?
State Excise Exam Leak : राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक परीक्षा पेपर फुटीचा आरोप, वाद हायकोर्टात; एमपीएससीला उत्तर सादर करण्याचे आदेश
राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक परीक्षा पेपर फुटीचा आरोप, वाद हायकोर्टात; एमपीएससीला उत्तर सादर करण्याचे आदेश
Koyna Dam : कोयना धरणाच्या 'शिवाजी सागर' जलाशयाचं नाव बदललं, सरकारचा मोठा निर्णय 
Koyna Dam : कोयना धरणाच्या 'शिवाजी सागर' जलाशयाचं नाव बदललं, सरकारचा मोठा निर्णय 
Embed widget