एक्स्प्लोर
निर्यातमूल्य हटवल्यानंतर दुसऱ्याच दिवशी कांद्याच्या भावात तेजी!
बांग्लादेश, मलेशिया, श्रीलंका, यूएई या देशातून मोठ्याप्रमाणावर भारतातील कांदा आयात केला जातो. किमान निर्यातमूल्य हटवल्याचा त्या देशांनाही फायदा होईल. भारत सर्वात मोठा कांदा निर्यातदार देश आहे.
नाशिक : निर्यातमूल्य शून्य केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत, येवला बाजार समितीमध्ये कांद्याच्या भावात तेजी बघायला मिळते आहे. गेल्या काही दिवसात आवक वाढल्याने कांद्याचे भाव घसरायला सुरवात झाली होती. त्यावर लगाम लावण्यासाठी आणि निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी निर्यात शुल्क रद्द करण्याचा निर्णय घेतला गेला.
येत्या काही दिवसात उन्हाळी कांदा बाजारात येईल. त्याचबरोबर गुजरात, राजस्थान मध्यप्रदेशमधल्या कांद्याची आवकही वाढणार आहे.
तब्बल 200 रुपयांनी सरासरी भावात वाढ
केंद्र सरकारने कांद्याचे निर्यातमूल्य शून्य करताच कांद्याच्या दरात आज वाढ झाली असून, त्याचा परिणाम आज नाशिक जिल्ह्यातील बाजार समितीमध्ये पहायला मिळाला. केंद्रसरकारने निर्यातमूल्य शून्य करताच कोसळणाऱ्या कांद्याच्या भावाला ब्रेक लागला असून आज येवला बाजार समितीत कांद्याचे सरासरी भावात वाढ झाली. काल जास्ती जास्त 1553 तर सरासरी 1400 रुपये भाव होता. आज तब्बल सरासरी भावात 200 रुपयांनी वाढ झाली. आज येवला येथे जास्ती जास्त 1960 तर सरासरी 1600 रुपये भाव निघाला.
कांद्यावरील निर्यातमूल्य हटवलं!
कांद्यावरील निर्यातमूल्य हटवल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळला आहे. कांद्यावर 700 डॉलर्स प्रती टन किमान निर्यातमूल्य लावण्यात आलं होतं. त्यामुळे कांद्याची निर्यात अशक्य बनली होती. या काळात देशांतर्गत बाजारात कांद्याच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळाली.
कांद्याचे दर घसरणीला लागल्यानंतर निर्यातमूल्य हटवण्याचा केंद्र सरकारने निर्णय घेतला आणि कांद्याची निर्यात खुली झाली.
सर्वात मोठ्या लासलगाव बाजारपेठेत इतर राज्यातील आवक वाढल्यानं कांदा 900 रुपयांनी कोसळला होता. त्यामुळे निर्यात मूल्य हटवण्याच्या मागणीने जोर धरला होता. आता निर्यात खुली झाल्यामुळे कांद्याचे दर स्थिर व्हायला मदत होणार आहे.
भारत सर्वात मोठा कांदा निर्यातदार देश
दरम्यान, बांग्लादेश, मलेशिया, श्रीलंका, यूएई या देशातून मोठ्याप्रमाणावर भारतातील कांदा आयात केला जातो. किमान निर्यातमूल्य हटवल्याचा त्या देशांनाही फायदा होईल. भारत सर्वात मोठा कांदा निर्यातदार देश आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement