(Source: ECI/ABP News/ABP Majha)
OnePlus Nord CE 2 Lite 5G : अवघ्या 20 हजारांत खरेदी करता येणार ‘वन प्लस’चा नवा स्मार्ट फोन! जाणून घ्या खास फीचर्स...
OnePlus Nord CE 2 Lite 5G : चीनी स्मार्टफोन कंपनी OnePlusने आजपर्यंतचा सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन भारतात लाँच केला आहे.
OnePlus Nord CE 2 Lite 5G : चीनी स्मार्टफोन कंपनी OnePlusने आजपर्यंतचा सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन भारतात लाँच केला आहे. या नव्या फोनचे नाव आहे OnePlus Nord CE 2 Lite 5G. हा कंपनीचा सर्वात स्वस्त स्मार्टफोन आहे, जो 64MP कॅमेरा सह येतो. फोनमध्ये क्वालकॉम प्रोसेसर, 33W फास्ट चार्जिंग आणि 5000mAh बॅटरीसह 120Hz रिफ्रेश रेट डिस्प्ले आहे.
या फोनसोबत कंपनीने OnePlus Nord Buds देखील लाँच केले आहे. कंपनीने प्रथमच नॉर्ड ब्रँडिंग इयरबड्स लाँच केले आहेत. चला जाणून घेऊया या स्मार्टफोनची आणि इतर फीचर्स...
OnePlus Nord CE 2 Lite 5G किंमत
OnePlus चा हा फोन दोन कॉन्फिगरेशनमध्ये लाँच करण्यात आला आहे. फोनच्या 6GB RAM + 128GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 19,999 रुपये आहे. तर, 8GB RAM + 128GB स्टोरेज व्हेरिएंट 21,999 रुपयांना लाँच करण्यात आला आहे. हा फोन दोन रंगात उपलब्ध असेल. त्याची विक्री 30 एप्रिल रोजी दुपारी 12 वाजता सुरु होईल. हा फोन OnePlus वेबसाईट आणि स्टोर, तसेच Amazonच्या अधिकृत वेबसाईटवरून खरेदी करू शकता.
OnePlus Nord CE 2 Lite ची वैशिष्ट्ये
ड्युअल सिम सपोर्ट असलेला हा फोन Android 12 वर आधारित ऑक्सिजन ओएसवर काम करतो. यात 6.59-इंचाची FHD+ स्क्रीन आहे, जी 120Hz रिफ्रेश रेट सपोर्टसह येते. फोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट देण्यात आला आहे. हा फोन ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 695 प्रोसेसरवर काम करतो. यात 8GB पर्यंत रॅम आणि 128GB स्टोरेज देण्यात आले आहे. फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे, ज्याची प्रायमरी लेन्स 64MPची आहे. याशिवाय या फोनला 16MP सेल्फी कॅमेरा दिला गेला आहे.
हा फोन 5000mAh बॅटरीसह येतो आणि 33W सुपर सुपर फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो. फोनमध्ये वायफाय, ब्लूटूथ, जीपीएस, 3.5 मिमी ऑडिओ जॅक होल आणि यूएसबी टाइप-सी पोर्ट आहे.
OnePlus Nord Buds ही लाँच!
OnePlus ने दोन कलर व्हेरियंटमध्ये हे इयरबड्स लाँच केले आहेत. ब्लॅक स्लेट आणि व्हाईट मार्बल या दोन रंगात उपलब्ध आहेत. याची किंमत 2799 रुपये आहे. या इयरबड्सची विक्री 10 मे रोजी दुपारी 12 वाजता सुरु होईल. हे इअरबड्स OnePlus वेबसाईट आणि स्टोर, तसेच Amazonच्या अधिकृत वेबसाईटवरून खरेदी करू शकता.
हेही वाचा :