WhatsApp : व्हॉट्सअपचे नवीन फीचर; आता फक्त आठ नाही तर तब्बल 32 लोकांशी एकाच वेळी करू शकता Voice Call
WhatsApp new feature : व्हॉट्सअॅपने अलीकडेच ग्रुप कॉलिंगसाठी नवीन फीचर सादर केले आहे. हे नवीन फीचर, iOS आणि Android दोन्हीवर उपलब्ध आहे.
WhatsApp new feature : व्हॉट्सअॅपने (WhatsApp) अलीकडेच ग्रुप कॉलिंगसाठी (Group call) नवीन फीचर सादर केले आहे. हे नवीन फीचर, iOS आणि Android दोन्हीवर उपलब्ध आहे. या नवीन फीचर्सनुसार आता यूजर्सना व्हॉट्सअप व्हॉईस कॉलमध्ये (Voice Call) एकाच वेळी 32 लोकांशी संवाद साधता येणार आहे. पूर्वी फक्त आठच लोकांशी संवाद साधता यायचा पण नवीन फीचरनुसार आता तब्बल 32 लोकांशी एकाच वेळी तुम्ही बोलू शकणार आहात. व्हॉट्सअपचं हे नवीन फीचर फक्त व्हॉइस कॉलसाठीच उपलब्ध आहे. व्हिडीओ कॉलसाठी नाही.
या ठिकाणी एक गोष्ट मात्र लक्षात घेतली पाहिजे की, ज्यावेळेस तुम्ही voice call करता तेव्हा तुमचे आणि तुमच्या बरोबर जोडल्या गेलेल्या इतरांचे नेटवर्क कनेक्शन मजबूत असणे गरजेचे आहे. तसेच तुम्ही ग्रूप व्हॉईस कॉलला व्हिडीओ कॉलमध्ये रूपांतरित करू शकणार नाही. तसेच, कॉलमधून डिस्कनेक्ट करण्यासाठी, यूजरन त्यांचा फोन कट करणे आवश्यक आहे.
ग्रुप चॅटवरून ग्रुप व्हॉइस कॉल करण्यासाठी स्टेप्स :
- व्हॉइस कॉल करण्यासाठी, तुम्हाला कॉल करायचा असलेल्या ग्रुप चॅटवर जा.
- तुमच्या ग्रुप चॅटमध्ये 33 किंवा अधिक सहभागी असल्यास ग्रुप कॉल बटणावर टॅप करा.
- तुमच्या ग्रुप चॅटमध्ये 32 किंवा त्यापेक्षा कमी सहभागी असल्यास व्हॉइस कॉलवर टॅप करा आणि तुमच्या पर्यायाची पुष्टी करा.
- फोनला उत्तर देणाऱ्या पहिल्या सात लोकांनाच कॉलमध्ये सामील होण्याची परवानगी आहे आणि फक्त ग्रुप सदस्यांना सहभागी होण्याची परवानगी आहे.
- तुम्हाला कॉलमध्ये जोडण्याची इच्छा असलेली व्यक्ती सापडल्यावर व्हॉइस कॉलवर टॅप करा.
पर्सनल चॅट्समधून ग्रुप व्हॉइस कॉल करण्यासाठी स्टेप्स :
- तुम्ही कॉल करू इच्छित असलेल्या लोकांपैकी एकासह पर्सनल चॅट उघडा.
- व्हॉइस कॉल करण्यासाठी, कॉल बटण दाबा.
- संपर्क कॉल स्वीकारतो तेव्हा टॅप करा. आता आणखी सहभागी जोडले जाऊ शकतात.
- तुम्ही कॉलमध्ये जोडू इच्छित असलेली दुसरी व्यक्ती शोधा.
- तुम्हाला आणखी संपर्क जोडायचे असल्यास, सहभागी जोडा वर टॅप करा.
महत्वाच्या बातम्या :
- Smartphone : Realme, Redmi, Samsung आणि Oppo चे 'हे' आहेत बजेट फ्रेंडली स्मार्टफोन, किंमत माहितीये ?
- Realme GT 2 : Realme चा GT 2 फ्लॅगशिप स्मार्टफोन भारतात लॉन्च; 65W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 'या' स्मार्टफोनशी होईल स्पर्धा
- Samsung Galaxy M53 : 108 मेगा पिक्सलच्या दमदार कॅमेरासह सॅमसंग गॅलॅक्सी एम53 भारतात लाँच, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत...