एक्स्प्लोर
48 तास उलटूनही तूर खरेदीचे आदेश नाहीच, उस्मानाबादेत 44 पोती तूर चोरीला
उस्मानाबाद : तूर खरेदी पुन्हा सुरु करण्यासाठी विविध जिल्ह्यात शेतकऱ्यांसह विरोधी पक्ष रस्त्यावर उतरले आहेत. लातूरमधील खरेदी केंद्रावर जवळपास 75 हजार क्विंटल तूर खरेदीविना पडून आहे. तिथे मनसेने बैलांना तूर खायला घालून आंदोलन केलं.
तूर खरेदी सुरु न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा मनसेने दिला आहे. परभणीमध्ये तूर खरेदी पुन्हा सुरू व्हावी यासाठी शेतकऱ्यांसोबत माकपनेही आंदोलन केलं. यावेळी परभणी वसमत महामार्गावर रास्तारोको करण्यात आला.
वाशिममध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीने तूर जाळून रास्ता रोको केला. 22 एप्रिलपर्यंत नोंदणी झालेल्या तूर खरेदीचे आदेश सरकारने दिलेत. मात्र बाजार समित्यांमध्ये तुरीचं वजनही होत नसल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे.
उस्मानाबाद बाजार समितीत 44 पोती तूर चोरीला
एकीकडे सरकार अजूनही शेतकऱ्यांच्या तूरीसंदर्भात ठोस निर्णय घेताना दिसत नाही. दुसरीकडे उस्मानाबादच्या वाशी बाजार समितीत 7 शेतकऱ्यांची तब्बल 44 पोती तूर चोरीला गेली आहे. याप्रकरणी अज्ञात आरोपीविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उघड्यावर असलेल्या लाखो क्विंटल तुरीची राखण करत हजारो शेतकऱ्यांनी बाजार समितीत तळ ठोकला आहे.
22 तारखेपर्यंत बाजार समितीत आलेली तूर राज्य सरकारमार्फत खरेदी करण्याचा निर्णय बाजार समित्यात पोहोचला नाही. त्यामुळे आज राज्यातल्या 316 पैकी एकाही समितीत प्रत्यक्षात वजनाला सुरुवात झाली नाही.
तूर खरेदीसाठी शेतकरी कोर्टात
तूर खरेदी खोळंबल्यामुळे मोठ्या अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली आहे. शेतकऱ्यांच्या संघटनेकडून दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेमध्ये खरेदी न झालेल्या तुरीची आकडेवारी सादर करण्यात आली. ही तूर खरेदी करण्यासाठी सरकारला आदेश देण्यात यावेत, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. या याचिकेची पुढील सुनावणी 2 मे रोजी ठेवण्यात आली आहे.
संबंधित बातम्या :
शेतकरी हवालदिल, लातुरात तूर जाळली!
सरकारकडून तूर विक्रीसाठी शेतकऱ्यांना धान्य तारण योजनेचा पर्याय
काहीही करा, पण तूर खरेदी करा, शेतकऱ्याची सरकारला आर्त हाक
तूर खरेदी केंद्रावर शेतकऱ्याला चक्कर, उपचारासाठी 50 हजार रुपये खर्च
तूर खरेदीवर राज्य सरकार तोंडघशी, लाखो क्विंटल तूर खरेदी विना
नाफेडकडून तूरखरेदी बंद, खरेदी केंद्राबाहेर 5 किमी लांब रांगा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
महाराष्ट्र
क्राईम
क्रीडा
Advertisement