एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
तर शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी एकत्र येणार?
राष्ट्रपती राजवट आली तर आपले आमदार सांभाळणे कठीण होईल याची जाणीव शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला आहे. अशा परिस्थितीत हे एकत्र येऊ शकतात अशी शक्यता राजकीय विश्लेषक अभय देशपांडे यांनी व्यक्त केली आहे.
मुंबई : राज्यात सत्ता स्थापनेचा तिढा कायम असतानाच शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याची शक्यता आहे. राष्ट्रपटी राजवट लागू झाल्यास आमदार फुटीच्या भीतीने तिन्ही पक्ष एकत्र येऊन सत्ता स्थापन करण्याची चर्चा रंगली आहे. शिवसेना+राष्ट्रवादीचं सरकार, काँग्रेसकडे विधानसभेचे अध्यक्षपद आणि बाहेरुन पाठिंबा अशी चर्चा शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्या भेटीनंतर सुरु झाली आहे.
भाजप स्वबळावर सत्ता स्थापनेचा दावा करणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शिवसेनेकडून चर्चेची दारं बंद असल्याने भाजप प्रतिसादासाठी शेवटच्या क्षणापर्यंत 'वेट अँड वॉचच्या' भूमिकेत असल्याचं समजतं. 8 नोव्हेंबर रोजी रात्री 12 वाजता विधीमंडळ बरखास्त होताच राष्ट्रपती राजवट लागू होण्याची प्रक्रिया सुरु होईल, असं कळतं. सहा महिन्यांच्या कालावधीसाठी राष्ट्रपती राजवट लागू असेल.
आमदार फुटीच्या शक्यतेने शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी एकत्र : अभय देशपांडे
"राज्यात राष्ट्रपती लागवट लागू होण्याच्या दिशेने सर्वपक्षीयांची पावलं पडत असल्याचं चित्र आहे. असे झाले तर आपले आमदार सांभाळणे कठीण होईल याची जाणीव शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला आहे. असं झालं तर हे एकत्र येऊ शकतात," अशी शक्यता राजकीय विश्लेषक अभय देशपांडे यांनी व्यक्त केली आहे.
शिवसेनेचे आमदार पुन्हा निवडून आणू : जयंत पाटील
भाजपने शिवसेनेचे आमदार फोडण्याचा प्रयत्न केला तर पोटनिवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र येऊन भाजपच्या उमेदवारांना पराभूत करतील. तसंच भाजपने शिवसेनेचे आमदार फोडले तर आम्ही पाठिंबा देऊ आणि शिवसेनेचे आमदार पुन्हा निवडून आणू, असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलं आहे.
भाजपकडून फोडाफोडीचं किंवा बेरजेचं राजकारण नाही
2014 साली भाजपच्या बाजूने आकडे होते. मात्र यंदा आमदारांचे आकडे कमी पडत असल्याची भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना जाणीव आहे. त्यामुळे फोडाफोडीचं किंवा बेरजेचं राजकारण करुन सत्तास्थापनेचा कुठलाही प्रयत्न भाजपकडून होणार नाही, अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय.
संबंधीत बातम्या :
Maharashtra Government Formation | भाजप स्वबळावर सत्ता स्थापनेचा दावा करणार नाही : सूत्र
देवेंद्र फडणवीस 'मावळते मुख्यमंत्री', सामनाद्वारे शिवसेनेचा हल्ला
राज्यातील सत्तास्थापनेत शिवसेनेचा कोणताही अडथळा नाही : संजय राऊत
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
ट्रेडिंग न्यूज
निवडणूक
निवडणूक
Advertisement