Pune Homeopathy : पुण्यात नॅशनल कॉन्फरन्स ऑन हॅनिमॅनियन होमिओपॅथी परिषदेचे आयोजन; देशभरातील नामांकित डॉक्टर, संशोधकांसह विद्यार्थ्यांची हजेरी
Pune : पुणे शहरात नॅशनल कॉन्फरन्स ऑन हॅनिमॅनियन होमिओपॅथी या भव्य परिषदेचे आयोजन करण्यात आले. या परिषदेत देशभरातील नामांकित होमिओपॅथिक डॉक्टर, संशोधक, तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झालेत.

Pune News : पुणे शहरात 'नॅशनल कॉन्फरन्स ऑन हॅनिमॅनियन होमिओपॅथी' (National Conference on Hahnemannian Homeopathy)या भव्य परिषदेचे आयोजन करण्यात आले. या परिषदेचे उद्घाटन भारत सरकारचे आयुष मंत्रालयाचे राज्य मंत्री प्रतापराव जाधव (Prataprao Jadhav) यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी देशभरातील नामांकित होमिओपॅथिक डॉक्टर, संशोधक, तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झालेत. परिषदेत होमिओपॅथीच्या मूलभूत तत्त्वांवर, संशोधनाच्या नव्या संधींवर तसेच रुग्णांच्या उपचारामध्ये होमिओपॅथीचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले आहे.
'होमिओपॅथीला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकार सदैव प्रयत्नशील'- प्रतापराव जाधव
दरम्यान, या कार्यक्रमात बोलताना मंत्री प्रतापराव जाधव म्हणाले की, 'होमिओपॅथी ही पर्यायी वैद्यकपद्धती नसून, ती जगभरातील लाखो रुग्णांसाठी प्रभावी उपचार पद्धती ठरली आहे. केंद्र सरकार आयुष मंत्रालयामार्फत होमिओपॅथीला प्रोत्साहन देण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. या परिषदेत विविध सत्रांमधून संशोधनपर व्याख्याने, अनुभवकथन आणि चर्चासत्रे होणार आहेत. हॅनिमॅनियन होमिओपॅथीचा सखोल अभ्यास आणि जागतिक स्तरावर त्याचा प्रभाव वाढवण्याचा निर्धार सहभागी डॉक्टरांनी व्यक्त केलाय.
औषधांची ऑनलाइन, बेकायदेशीर विक्रीवर औषध विक्रेत्या संघटनांकडून बंदीची मागणी
औषधांची ऑनलाइन, बेकायदेशीर विक्रीवर औषध विक्रेत्या संघटनांकडून बंदी घालण्याची मागणी करण्यात आली आहे. पुण्यासह अखिल भारतीय औषध विक्रेत्या संघटनांनी औषधांच्या बेकायदेशीर ऑनलाइन विक्रीबाबत सरकारला गंभीर इशारा दिला आहे. संघटनेने ‘10 मिनिटांत औषध वितरण’ करणाऱ्या ई-फार्मसी कंपन्यांवर त्वरित बंदी घालावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे. या मागणीला पुणे केमिस्ट असोसिएशनने देखील दिला पाठिंबा दिला आहे. दरम्यान हि औषधे नेमकी कोठून येतात, ते योग्य तापमानात ठेवलेली असतात का? याबाबतही शंका उपस्थित केल्या जात आहेत. त्यामुळे या मागणीला प्रशासन किती गांभीर्याने घेत हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
आणखी वाचा
- Pigeon spreading diseases: कबुतरांमुळे श्वसनाचा दुर्मिळ आजार, फुफ्फुसांना डाग पडले, नामांकित रुग्णालयांनीही हात टेकले, पुण्यातील शितल मानकरांसोबत नेमकं काय घडलं?
- पतंजलीचा मोठा दावा! ‘कार्डिओग्रिट गोल्ड’ने हृदयरोगावर इलाज शक्य, आंतरराष्ट्रीय संशोधन जर्नलमध्ये संशोधन प्रकाशित
























