Video : पहिल्या मजल्यावरून खोल खड्ड्यात पडल्याने तरुणाचा जागीच मृत्यू, थरारक घटना सीसीटीव्हीत कैद
पहिल्या मजल्यावरून 20 फूट खोल खड्ड्यात पडल्याने तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. विनोद गिते असे मृत्यू झालेल्या तरूणाचे नाव आहे. ही थरारक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
नाशिक : इमारतीच्या पहिल्या मजल्यावरून 20 फूट खोल खड्ड्यात पडल्याने तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. विनोद गिते असे मृत्यू झालेल्या तरूणाचे नाव आहे. ही थरारक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, नाशिक येथील एक्सिलन्सी ईन या हॉटेलच्या नुतनीकरणाचे काम सुरू होते. यावेळी काल मध्यरात्री विनोद हा आपल्या नातेवाईकांना याच हॉटेलमध्ये रूम दाखवण्यासाठी आला होता. परंतु, काम सुरू असल्याने तोडलेले बांधकाम त्याच्या लक्षात आले नाही. त्यामुळे चालत जाताना तो पहिल्या मजल्यावरून थेट खाली कोसळला. खाली बांधकामासाठी आणलेले मोठ-मोठे दगड होते. या दगडांवर विनोद आपटल्याने त्याचा जागीत मृत्यू झाला. घटनेची माहिती समजताच हॉटेलमधील कर्मचारी आणि स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिकांनी तत्काळ विनोदला उपचारासाठी जवळच्या रूग्णालयात दाखल केले. परंतु, डोक्याला गंभीर दुखापत होऊन मोठा रक्तस्त्राव झाला होता. त्यामुळे विनोदचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषीत केले. शवविच्छेदन करून विनोदचा मृतदेह नातेवाईकांकडे देण्यात आला. रूग्णालयाबाहेर नातेवाईकांनी एकच आक्रोश केल्याने रूग्णालयाच्या परिसरातील वातवरण अतिशय भावूक झाले होते.
दरम्यान, या धक्कादायक घटनेची अंबड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अंबड पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत. या घटनेने विनोदच्या कुटुंबीयांना धक्का बसला असून त्याच्या मृत्यूबाबत नातेवाईकांतून हळहळ व्यक्त होत आहे.
Nashik: पहिल्या मजल्यावरुन पडून तरुणाचा मृत्यू, घटना CCTV मध्ये कैद ABP Majha, पाहा व्हिडिओ
महत्वाच्या बातम्या