एक्स्प्लोर
नाशिकमधील चार तालुक्यात ऐन पावसाळ्यात पाणीटंचाई
नांदगाव तालुक्यात यंदा पावसाने ओढ दिली असून सरासरीच्या निम्माही पाऊस तालुक्यात न झाल्याने ऐन पावसाळ्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झालीय.
नाशिक : नाशिक जिल्ह्याच्या पूर्व भागातील मालेगाव, नांदगाव, येवला आणि चांदवड या चार तालुक्यांमध्ये अत्यल्प प्रमाणात पाऊस झाल्याने, सध्या या परिसरात ऐन पावसाळ्यात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. नांदगाव तालुक्यातील अनेक गाव, वाड्यावस्त्यांवर तर टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ आली आहे.
नांदगाव तालुक्यात यंदा पावसाने ओढ दिली असून सरासरीच्या निम्माही पाऊस तालुक्यात न झाल्याने ऐन पावसाळ्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झालीय.
एकीकडे पाऊस नसल्याने शेतकऱ्यांना समोर दुबार पेरणीच संकट, तर दुसरीकडे तालुक्यातील अनेक गावांना पिण्याच्या पाण्यासाठी टँकरवर अवलंबून रहावे लागत आहे.
बाणगाव, वडाळी, मोरझर, सोयगाव, खिर्डी, मांडवड, जतपुरा या सात गावांसह अनेक वाड्या-वस्त्यांवर पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत असून, या गावांसाठी प्रशासनाने पाण्याचे सात टँकर सुरु केले आहेत. अनेक ठिकाणी सामाजिक संस्थांकडून पाण्याचं मोफत वाटप केले जात आहे. पाण्यासाठी अनेकवेळा दूरवर जावे लागत असल्याचे महिला सांगतात.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
रायगड
भारत
नाशिक
Advertisement