एक्स्प्लोर
राज्यात पुन्हा भगवाच फडकणार, विजय संकल्प मेळाव्यात आदित्य ठाकरेंचे उद्गार
शिवसेनेने केलेल्या कामांच्या आणि शिवसैनिकांच्या मेहनतीच्या जोरावर महाराष्ट्र पुन्हा भगवा होणार आहे, असा विश्वास युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला आहे.

नाशिक : शिवसेनेने केलेल्या कामांच्या आणि शिवसैनिकांच्या मेहनतीच्या जोरावर महाराष्ट्र पुन्हा भगवा होणार आहे, असा विश्वास युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. नाशिकमध्ये शिवसेनेकडून विजय संकल्प मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यादरम्यान आयोजित कार्यक्रमात आदित्य ठाकरे बोलत होते. नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात हा विजय संकल्प मेळावा पार पडला. यावेळी आदित्य ठाकरे यांनी शिवसैनिकांना मार्गदर्शन केले. "1995 मध्ये नाशकात शिवसेनेचे अधिवेशन झालं, त्यावेळी शिवसेनेचं सरकार आलं, म्हणूनच आज त्यासाठी नाशिकला आलो आहे", असं आदित्य यावेळी म्हणाले. आदित्य ठाकरे यांनी यावेळी शिवसैनिकांचे कौतुक केले ते म्हणाले की, "शिवसैनिक आणि कार्यकर्ते जनतेची कामं करतात, जनतेची मदत करतात म्हणून आज मला प्रचंड प्रेम मिळत आहे. कार्यकर्त्यांचा जोश आणि जल्लोषच महाराष्ट्र भगवा करणार आहे." जन आशीर्वाद यात्रेत आदित्य ठाकरेंचं शेतकरी कर्जमुक्तीचं आश्वासन | धुळे | ABP Majha आदित्य म्हणाले की, "नव्वदीच्या काळात आजोबांसोबत (बाळासाहेब ठाकरे) फिरताना जो जोश आणि जल्लोष कार्यकर्त्यांमध्ये दिसायचा, तोच जोश मला जन आशीर्वाद यात्रेमध्ये दिसतोय."
आणखी वाचा























