एक्स्प्लोर

महिलेची फसवणूक आणि मानसिक छळ प्रकरण, रोईंगपटू दत्तू भोकनळला जामीन

दत्तू भोकनळने आपण या महिलेसोबत लग्न केल्याच मान्य केलं असून ही महिला दत्तूची पत्नीच असल्याचं आता सिद्ध झालं आहे. मात्र दत्तूला जामीन मिळाल्याने तक्रारदार महिलेने नाराजी व्यक्त केली आहे.

नाशिक : राष्ट्रीय रोईंगपटू दत्तू भोकनळची अटक टळली असून त्याला नाशिक जिल्हा न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. 15 हजारांच्या जातमुचक्यावर दत्तूला जामीन मंजूर करण्यात आला आहे. मात्र आठवड्यातून एकदा दत्तूला नाशिकच्या आडगाव पोलीस ठाण्यात हजेरी लावावी लागणार आहे.

यासोबत तक्रारदार महिलेला कुठलाही त्रास होणार नाही याची काळजी घेण्याचीही त्याला सूचना देण्यात आली आहे. जिल्हा न्यायाधीश एन. जी. गिमेकर यांनी आज संध्याकाळी हा निकाल दिला. विशेष म्हणजे दत्तू भोकनळने आपण या महिलेसोबत लग्न केल्याच मान्य केलं असून ही महिला दत्तूची पत्नीच असल्याचं आता सिद्ध झालं आहे.

या निकालाचं दत्तूच्या वकिलांकडून स्वागत केलं जात असून आम्ही या अटी शर्तींचं पालन करु, असं सांगितलं. तर दुसरीकडे दत्तूला जामीन मंजूर झाल्याने तक्रारदार महिला नाराज झाल्याचं बघायला मिळत असून आम्ही महिला कायद्यानुसार दाद मागू, असं तक्रारदार महिलेच्या वकिलांनी म्हटलं आहे.

काय आहे महिलेची तक्रार?

महिलेने पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार, "2015 मध्ये दत्तूला आर्मीमध्ये मेडल मिळाल्याने चांदवडमध्ये गावकऱ्यांनी त्याचा सत्कार ठेवला होता. तेव्हा त्याची आणि माझी ओळख होऊन मैत्री झाली. काही दिवसांनी मैत्रीचं रुपांतर प्रेमात होऊन आम्ही लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार आम्ही दोघांनी डिसेंबर 2017 मध्ये पुण्याच्या आळंदीला जाऊन एका कार्यालयात हिंदू पद्धतीने लग्न केलं. मात्र याबाबत कुठेही वाच्यता न करता काही दिवसांनी दोघांकडच्या नातेवाईकांसमक्ष गावी लग्न करायचं आम्ही ठरवलं.

मात्र त्यानंतर आम्ही लग्न करणार असं आमच्या घरी सांगितलं. दोन वेळा लग्नाची तारीख ठरवून कार्यालय बुक करुनही, दत्तूने ऐनवेळी नकार दिला. त्याने मला 22 डिसेंबर 2017  ते 3 मार्च 2019 या काळात शारीरिक आणि मानसिक त्रास देत माझी फसवणूक केली आहे. विशेष म्हणजे लग्नाबाबत विचारल्यास मी विष पिऊन आत्महत्या करेन, अशी धमकीही दत्तूने मला दिली.", असे त्या महिलेने तक्रारीत म्हटले आहे.

कोण आहे दत्तू भोकनळ?

- दत्तू भोकनळ हा मूळचा नाशिकच्या चांदवड तालुक्यातील तळेगाव-रोही या गावचा आहे. - सैन्यात भरती झाल्यावर त्याने रोईंगला सुरुवात केली - रोईंगमध्ये प्राविण्य मिळवत 2016 चं रिओ ऑलिम्पिक गाठलं - रिओ ऑलिम्पिकमध्ये दत्तूने रोईंगच्या सिंगल स्कल्स प्रकारात गटात 6 मिनिटं आणि 54.96 सेकंदांची वैयक्तिक सर्वोत्तम वेळ नोंदवून 13 वं स्थान मिळवलं होतं. - ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणारा दत्तू महाराष्ट्रातला पहिलाच रोईंगपटू ठरला. - दत्तू भोकनळचा समावेश असलेल्या भारताच्या रोईंग चमूने 18व्या एशियाड गेम्समधील पुरुषांच्या कॉड्रापल स्कल्स प्रकारात सुवर्णपदकाला गवसणी घातली.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कृषी समृद्धी योजनेला मंजुरी, शेतकऱ्यांना ड्रोन, शेततळे, सुविधा केंद्र, बीबीएफ यंत्रासाठी अनुदान मिळणार, 5668 कोटी मंजूर : दत्तात्रय भरणे
कृषी समृद्धी योजनेतून शेतकऱ्यांना ड्रोन, शेततळे, सुविधा केंद्र, बीबीएफ यंत्रासाठी अनुदान : दत्तात्रय भरणे
Rahul Gandhi on Parth Pawar : मतचोरी करुन बनलेल्या सरकारची जमीन चोरी, मोदीजी तुमचं शांत राहणं खूप काही सांगतं, पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरणी राहुल गांधींचा हल्लाबोल
पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरण, राहुल गांधींचा राज्य सरकारवर हल्लाबोल अन् थेट मोदींना सवाल
नितेश राणेंनी पालकमंत्री म्हणून भान ठेवलं पाहिजे; महायुतीवरुन दीपक केसरकरांचा राणेंना घरचा अहेर
नितेश राणेंनी पालकमंत्री म्हणून भान ठेवलं पाहिजे; महायुतीवरुन दीपक केसरकरांचा राणेंना घरचा अहेर
शरद पवारांच्या खासदारकीची गोपीचंद पडळकरांना चिंता; म्हणाले, 10 आमदारांवर राज्यसभेत कसं जाणार?
शरद पवारांच्या खासदारकीची गोपीचंद पडळकरांना चिंता; म्हणाले, 10 आमदारांवर राज्यसभेत कसं जाणार?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Pune Land Scam: '…या प्रकरणी कारवाई केली जाईल', पोलीस आयुक्त Amitesh Kumar यांचा इशारा
Parth Pawar Land Scam:: रद्द केला व्यवहार, वाचणार पार्थ पवार? Special Report
Lonar Lake : लोणारच्या खाऱ्या पाण्यात चक्क मासे, पर्यावरणाला मोठा धोका Special Report
Manoj Jarange vs Dhananjay Munde : जरांगेंच्या हत्येचा कट? कोण जानी दुश्मन? Special Report
Devendra Fadnavis : जमीन व्यवहार प्रकणात कुणालाही सोडणार नाही,दोषींवर कारवाई होणार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कृषी समृद्धी योजनेला मंजुरी, शेतकऱ्यांना ड्रोन, शेततळे, सुविधा केंद्र, बीबीएफ यंत्रासाठी अनुदान मिळणार, 5668 कोटी मंजूर : दत्तात्रय भरणे
कृषी समृद्धी योजनेतून शेतकऱ्यांना ड्रोन, शेततळे, सुविधा केंद्र, बीबीएफ यंत्रासाठी अनुदान : दत्तात्रय भरणे
Rahul Gandhi on Parth Pawar : मतचोरी करुन बनलेल्या सरकारची जमीन चोरी, मोदीजी तुमचं शांत राहणं खूप काही सांगतं, पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरणी राहुल गांधींचा हल्लाबोल
पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरण, राहुल गांधींचा राज्य सरकारवर हल्लाबोल अन् थेट मोदींना सवाल
नितेश राणेंनी पालकमंत्री म्हणून भान ठेवलं पाहिजे; महायुतीवरुन दीपक केसरकरांचा राणेंना घरचा अहेर
नितेश राणेंनी पालकमंत्री म्हणून भान ठेवलं पाहिजे; महायुतीवरुन दीपक केसरकरांचा राणेंना घरचा अहेर
शरद पवारांच्या खासदारकीची गोपीचंद पडळकरांना चिंता; म्हणाले, 10 आमदारांवर राज्यसभेत कसं जाणार?
शरद पवारांच्या खासदारकीची गोपीचंद पडळकरांना चिंता; म्हणाले, 10 आमदारांवर राज्यसभेत कसं जाणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 नोव्हेंबर 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 नोव्हेंबर 2025 | शुक्रवार
मोठी बातमी! अखेर पुण्यातील जमिनीचा व्यवहार रद्द, अजित पवारांनी दिली माहिती; कुणाचे फोन आले, कुणी मदत केली सर्व चौकशी होणार
मोठी बातमी! अखेर पुण्यातील जमिनीचा व्यवहार रद्द, अजित पवारांनी दिली माहिती; कुणाचे फोन आले, कुणी मदत केली सर्व चौकशी होणार
Shiv Nadar : दररोज एक दोन नव्हे तब्बल 7 कोटी रुपये दान, शिव नादर यांनी एका वर्षात किती कोटी रुपये दान केलं? पहिल्या स्थानावर कोण?
दररोज एक दोन नव्हे तब्बल 7 कोटी रुपये दान, शिव नादर यांनी एका वर्षात किती कोटी रुपये दान केलं? पहिल्या स्थानावर कोण?
अजित पवारांचा पाय आणखी खोलात? पुण्यातील जमीन खरेदीची चौकशी होणारच, शासन आदेश जारी
अजित पवारांचा पाय आणखी खोलात? पुण्यातील जमीन खरेदीची चौकशी होणारच, शासन आदेश जारी
Embed widget