Nashik Bus Fire : बसमधील लोक आम्हाला वाचवा म्हणून ओरडत होते पण...नाशिक बस अपघातात देवदूत ठरलेल्या डोंगरेंनी सांगितला भयानक अनुभव
Nashik Bus Fire : नाशिकच्या भीषण अपघातातून चार प्रवाशांना वाचवल्यानंतर दामोदर डोंगरे यांनी आपला भयानक अनुभव सांगितला आहे. नाशिक महापालिकेच्या सिटी लिंक बसवर चालक असलेल्या दामोदर डोंगरे हे या अपघातातील चार प्रवाशांसाठी देवदूत ठरले.
Nashik Bus Fire : नाशिकमधील ट्रक आणि बस अपघाताच्या भीषण घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झालाय. या घटनेत 12 जणांचा मृत्यू झालाय तर 41 जण जखमी झाले आहेत. मूळचे वाशीम जिल्ह्यातील रिसोडचे असलेले आणि सध्या नाशिक महापालिकेच्या सिटी लिंक बसवर चालक असलेल्या दामोदर डोंगरे हे या अपघातातील चार प्रवाशांसाठी देवदूत ठरले आहेत. विदर्भाचाच माणूस विदर्भवासीयांसाठी धावून आलाय. डोंगरे यांनी अपतातील चौघांचा जीव वाचवलाय. त्यामुळे अपघातग्रस्त लोक डोंगरे हे आमच्यासाठी देवदूतच असल्याचे सांगत आहेत. तर स्वत: डोंगरे यांनी देखील यावेळी नक्की काय झाले याबाबतचा आपला अनुभव सांगितला आहे.
भीषण अपघातातून चार प्रवाशांना वाचवल्यानंतरचा आपला अनुभव सांगताना दामोदर डोंगरे यांनी सांगितले की, " पहाटे पाच वाचण्याच्या सुमारास मी ड्युटीवर निघाले होतो. उपघाताचं दृश्य बघून मला काय करावं समजत नव्हतं. सगळ्यांना हात जोडून विनंती केली तुमच्या जवळचे लहान मूल माझ्याकडे द्या. त्यावेळी बस खाली खूप डिझेल सांडलेलं होतं हे अनेकांना माहीत नव्हतं. मी चार जणांचे जीव वाचवले, त्यात एक महिला दोन लहान लेकरं आणि एका वयोवृद्ध आजीचा समावेश आहे. या सर्वांना मी गाडीतून बाहेर काढलं. या चार जणांना बाहेर काढल्यानंतर आणखी लोक विनंती करत होते की मला वाचवा म्हणून. परंतु, नंतर मीच खूप घाबरलो. होतो."
...तर अजून काही जणांचे प्राण वाचले असते
डोंगरे सांगतात, "माझा मोबाईल बंद होता नाहीतर मी इतरांना फोन करून आणखी काही जणांचे जीव वाचवले असते. हे दृश्य इतके भयानक होते कोणाला सांगू सुद्धा शकत नाही. आयुष्यात पहिल्यांदाच एवढा भीषण अपघात पाहिला. अपघात झाला त्यावेळी खूप अंधार होता आणि पुढच्या टायरने पेट घेतल्याने अजून कोणाला वाचवू शकलो नाही. भयानक धूर झाला होता. वाशीम जिल्ह्यातील रिसोड हे माझं गाव आहे. त्यामुळे चिंतामणी ही माझ्या गावची गाडी ओळखू शकलो. मी असा विचार केला की देवा ही वेळी आलीच कशी, या चौघांना मी वाचवू शकलो ही देवाची मेहेरबानी."
नाशिकच्या औरंगाबाद रोड वरील मिरची हॉटेल जवळ आज पहाटेच्या सुमारास भीषण अपघात झाला. यावेली ट्रव्हल्सने पेट घेतल्याळे 12 लोकांचा होरपळून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या अपघातात 41 प्रवासी जखमी असून जखमींवर नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र मृतांची ओळख पटवण्यासाठी प्रशासनाकडून शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. यासाठी डीएनए टेस्ट आणि इतर फॉरेनची टेस्ट करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी गंगाथरण डी यांनी दिली आहे.
व्हिडीओ पाहा
महत्वाच्या बातम्या
Nashik Bus Fire : नाशिक बस दुर्घटना : फार भयानक होतं, बसमधून बाहेर कस पडलो, हे देवालाच माहीत!
Nashik Fire Accidents : उत्तर महाराष्ट्रासाठी शनिवार ठरला घातवार, पाच वेगवेगळ्या दुर्घटनांमध्ये 16 जणांचा मृत्यू