एक्स्प्लोर

हेल्मेटसक्तीचा धसका, हेल्मेट खरेदीसाठी नाशिककरांची दुकानात झुंबड

हेल्मेट न घालणाऱ्या 1495 जणांवर पोलिसांनी कारवाई केली असून 7 लाख 47 हजार 500 रुपयांचा दंडही वसूल केला आहे. यावेळी नियमीत हेल्मेट घालणाऱ्या नागरिकांचा पुष्प देऊन सत्कारही करण्यात आला.

नाशिक : पुण्यानंतर नाशिकमध्येही हेल्मेटसक्ती लागू करण्यात आली आहे. विना हेल्मेट बाईक चालवणाऱ्या जवळपास 1495 नाशिककरांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी 7 लाख 47 हजार 500 रुपयांचा दंड वसूल केला आहे. हेल्मेट सक्तीनंतर आता नाशिकरांची हेल्मेट खरेदीसाठी झुंबड उडाली आहे.

नाशिकमध्ये सोमवारपासून हेल्मेटसक्ती लागू करण्याचे आदेश नाशिक पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी दिले. त्यानंतर हेल्मेट न घातलेल्या वाहन चालकांकडून 500 रुपयांचा दंड आकरण्यात येतो आहे. या दंडाचा धसका घेत नाशिककरांनी हेल्मेट खरेदी करणे पसंत केलं आहे. त्यामुळे हेल्मेट खरेदीसाठी वाहनचालकांनी दुकानामध्ये गर्दी केली आहे. शहरातील जवळपास सर्वच दुकानांबाहेर हेल्मेट खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी केली आहे.

या कारवाईसाठी जवळपास 500 पोलीस नाशिकमधील रस्त्यावर उतरले होते आणि शहरातील 25 ठिकाणी तपासणी सुरु होती. हेल्मेट न घालणाऱ्या 1495 जणांवर पोलिसांनी कारवाई केली असून  7 लाख 47 हजार 500 रुपयांचा दंडही वसूल केला आहे. यावेळी नियमीत हेल्मेट घालणाऱ्या नागरिकांचा फुले देऊन सत्कारही करण्यात आला. स्वत:च्या सुरक्षेसाठी हेल्मेट घाला, असं आवाहन नाशिक पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी केलं आहे.

नाशिककर हेल्मेट सक्तीविरोधात कोर्टात जाण्याच्या तयारीत

पुणेकरांप्रमाणे नाशिककरांनीही हेल्मेटसक्तीला विरोध केला आहे. या हेल्मेट सक्तीविरोधात नाशिककर न्यायालयात धाव घेण्याच्या तयारीत आहेत. त्यासाठी लवकरच जनआंदोलन छेडणार असून हेल्मेटसक्ती शहराबाहेर महामार्गावर करा, शहरात नको, अशी मागणी नाशिककरांना केली आहे.

या कारवाईदरम्यान अनेक वाहनचालकांनी पोलिसांशी वादही घातला. दंड भरत असूनही पोलीस अरेरावी करत असल्याचा वाहनचालकांनी आरोप केला. तसेच 500 रुपये दंड घेण्यापेक्षा पावतीच्या बदल्यात 500 रुपयांचं हेल्मेट तरी द्या, अशी मागणीही वाहनचालकांनी केली.

पुण्यात हेल्मेटसक्तीमुळे अपघाती मृत्यूचं प्रमाण घटलं

पुण्यात हेल्मेटसक्तीनंतर अपघाती मृत्यूचं प्रमाण कमी झालं आहे. हेल्मेट सक्ती लागू केल्याच्या 4 महिन्यानंतर गेल्या वर्षीपेक्षा 23 जणांचे अपघाती मृत्यू कमी करण्यात पुणे वाहतूक पोलिसांना यश आलं आहे. पुणेकरांचा हेल्मेटसक्तीला असलेल्या विरोध झुगारून पोलिसांनी हेल्मेटसक्ती लागू केली. पुणे पोलीस आयुक्त डॉ. के व्यंकटेशम यांनी पदभार स्वीकारल्यापासून अपघाती मृत्यूचं प्रमाण रोखण्यासाठी ठोस पावलं उचलण्याचे आदेश वाहतूक शाखेला दिले होते.

महत्त्वाच्या बातम्या

FPI : विदेशी गुंतवणूकदारांनी तिजोरी उघडली, ऑगस्टमध्ये भारतीय बाजारात 23544 कोटी गुंतवले, जाणून घ्या सविस्तर 
जुलैचा ट्रेंड ऑगस्टमध्ये कायम ठेवला, FPI नं भारतीय बाजारात 23544 कोटी गुंतवले,तज्ज्ञ म्हणतात... 
Sambhajinagar News: तिघांचे अंत्यसंस्कार एकाच ठिकाणी का नाही केले? मुरलीधर यांच्या बहिणीने सांगितलं कौटुंबिक कारण
तिघांचे अंत्यसंस्कार एकाच ठिकाणी का नाही केले? मुरलीधर यांच्या बहिणीने सांगितलं कौटुंबिक कारण
आंदोलनावेळी अचानक पाऊस, पोलीस आयुक्तांनी वृद्धांसाठी छत्री धरली, संवेदनशीलपणा कॅमेऱ्यात कैद; व्हिडिओ व्हायरल
आंदोलनावेळी अचानक पाऊस, पोलीस आयुक्तांनी वृद्धांसाठी छत्री धरली, संवेदनशीलपणा कॅमेऱ्यात कैद; व्हिडिओ व्हायरल
Chhatrapati Sambhajinagar News: हे व्हिडिओ पाहून आमचं काळीज खाली बसलंय, व्ह्यूजसाठी खोटं पसरवू नका; कुणालच्या मावशीला अश्रू अनावर
हे व्हिडिओ पाहून आमचं काळीज खाली बसलंय, व्ह्यूजसाठी खोटं पसरवू नका; कुणालच्या मावशीला अश्रू अनावर

व्हिडीओ

Solpaur Drought Marriage Special Report : 350 तरुणांची लग्न पाण्याखाली रखडली? ABP Majha
Bhuleshwarcha Raja Special Report : भुलेश्वरच्या दुर्घटनेचं कारण काय? मुंबईतील गणेश मंडळं सावध
Gen Z Special Report : नेत्यांची व्होट बँक जेन झी, राजकीय नेत्यांकडून मेळावे : ABP Majha
Ravindra Sathe Majha Katta : आम्ही ठाकर, ठाकरss अजरामर गाण्याचा जादुई आवाज, रवींद्र साठेंसोबत गप्पा
Rahul Gandhi Pune: तरुणीने कडक मराठी शब्दात सरकारला झापलं; राहुल गांधीही बघत बसले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FPI : विदेशी गुंतवणूकदारांनी तिजोरी उघडली, ऑगस्टमध्ये भारतीय बाजारात 23544 कोटी गुंतवले, जाणून घ्या सविस्तर 
जुलैचा ट्रेंड ऑगस्टमध्ये कायम ठेवला, FPI नं भारतीय बाजारात 23544 कोटी गुंतवले,तज्ज्ञ म्हणतात... 
Sambhajinagar News: तिघांचे अंत्यसंस्कार एकाच ठिकाणी का नाही केले? मुरलीधर यांच्या बहिणीने सांगितलं कौटुंबिक कारण
तिघांचे अंत्यसंस्कार एकाच ठिकाणी का नाही केले? मुरलीधर यांच्या बहिणीने सांगितलं कौटुंबिक कारण
आंदोलनावेळी अचानक पाऊस, पोलीस आयुक्तांनी वृद्धांसाठी छत्री धरली, संवेदनशीलपणा कॅमेऱ्यात कैद; व्हिडिओ व्हायरल
आंदोलनावेळी अचानक पाऊस, पोलीस आयुक्तांनी वृद्धांसाठी छत्री धरली, संवेदनशीलपणा कॅमेऱ्यात कैद; व्हिडिओ व्हायरल
Chhatrapati Sambhajinagar News: हे व्हिडिओ पाहून आमचं काळीज खाली बसलंय, व्ह्यूजसाठी खोटं पसरवू नका; कुणालच्या मावशीला अश्रू अनावर
हे व्हिडिओ पाहून आमचं काळीज खाली बसलंय, व्ह्यूजसाठी खोटं पसरवू नका; कुणालच्या मावशीला अश्रू अनावर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑगस्ट 2026 | रविवार
तेली समाजाच्या कार्यक्रमात तुकाराम मुंढेंच्या निर्णयाचा 'तो' मुद्दा; विजय वडेट्टीवारांची मंत्री बानवकुळेंकडे मागणी
तेली समाजाच्या कार्यक्रमात तुकाराम मुंढेंच्या निर्णयाचा 'तो' मुद्दा; विजय वडेट्टीवारांची मंत्री बानवकुळेंकडे मागणी
बावनकुळे साहेबांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा, तुमचा शब्द राज्यात खाली पडू दिला जात नाही, आपल्या माणसाची तारीफ आपणच केली पाहिजे; विजय वडेट्टीवारांचा महसूल मंत्र्यांवर कौतुकाचा वर्षाव
बावनकुळे साहेबांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा, तुमचा शब्द राज्यात खाली पडू दिला जात नाही, आपल्या माणसाची तारीफ आपणच केली पाहिजे; विजय वडेट्टीवारांचा महसूल मंत्र्यांवर कौतुकाचा वर्षाव
Baramati News: रोहित पवारांच्या स्वीय सहायकाच्या मुलीचा मृत्यू; रात्री लिफ्टने गच्चीवर गेल्याचे सीसीटीव्हीत कैद, नेमकं काय घडलं?
रोहित पवारांच्या स्वीय सहायकाच्या मुलीचा मृत्यू; रात्री लिफ्टने गच्चीवर गेल्याचे सीसीटीव्हीत कैद, नेमकं काय घडलं?
Embed widget