एक्स्प्लोर
पिस्तुलचा धाक दाखवून 20 लाखांची लूट
ब्रिंक्स इंडिया कंपनीचे अक्षय बागुल आणि विशाल निकुंभ हे दोन कर्मचारी सिटी सेंटर मॉलमधून बाहेर पडताच त्यांना पत्ता विचारण्याचा बहाणा करत तीन चोरांनी त्यांना पिस्तुल रोखत मारहाण केली आणि त्यांच्या जवळील 20 लाख 45 हजार रुपयांची बॅग घेऊन ते पसार झाले.

नाशिक : पिस्तुलचा धाक दाखवून मारहाण करत तब्बल 20 लाख 45 हजार रुपयांची बॅग चोरांनी लांबवल्याची घटना नाशिकमध्ये समोर आलीय. भरदुपारी 12.30 वाजता सिटी सेंटर मॉल समोर गजबजलेल्या परिसरात हा प्रकार घडल्याने नाशिकमध्ये खळबळ उडाली आहे. ब्रिंक्स इंडिया कंपनीचे अक्षय बागुल आणि विशाल निकुंभ हे दोन कर्मचारी सिटी सेंटर मॉलमधून बाहेर पडताच त्यांना पत्ता विचारण्याचा बहाणा करत तीन चोरांनी त्यांना पिस्तुल रोखत मारहाण केली आणि त्यांच्या जवळील 20 लाख 45 हजार रुपयांची बॅग घेऊन ते पसार झाले. ब्रिक्स इंडिया कंपनी व्यापारी तसेच उद्योजकांकडून पैसे घेऊन बँकेत भरणा करण्याचे काम करते. आज सकाळपासून चार ते पाच व्यापाऱ्यांकडून या कर्मचाऱ्यांनी पैसे गोळा केले होते. याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सूरु असून आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना झाली आहेत. मागील महिन्यात गंगापूर रोडवरील सारस्वत बँकेतून सराफ व्यवसायिकांची 28 लाख रुपयांची बॅग चोरत्यांनी लांबवल्याची घटना समोर आली होती. त्यातील आरोपींना ताब्यात घेण्यात पोलिसांना अद्याप यश आले नसून अशाप्रकारे चोऱ्या करणारी एक टोळीच शहरात कार्यरत असल्याचा संशय आता व्यक्त केला जातोय.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
राजकारण
व्यापार-उद्योग























