एक्स्प्लोर
सुतळी बॉम्ब डोळ्याजवळ फुटला, मुलगा गंभीर जखमी
नाशिक : नाशिक शहरात सुतळी बॉम्ब डोळ्याजवळ फुटल्याने एका लहान मुलाला गंभीर ईजा झाली आहे. देवळाली कॅम्प परीसरात काल संध्याकाळी ही घटना घडली. या घटनेत 15 वर्षीय तालिब शेखच्या दोन्ही डोळ्यांना दुखापत झाली आहे.
नाशिकच्या कॅम्प परीसरात मित्राच्या घरी फटाके फोडायला गेला असताना तालिब शेखला हा अपघात झाला आहे. सुतळी बॉम्ब फुटला नाही म्हणून तालिब बघायला गेला. अचानक बॉम्ब फुटल्यानं त्याच्या दोन्ही डोळ्यांना गंभीर ईजा झाली आहे. तसंच त्याचे नाक आणि कान गंभीररित्या दुखावले आहेत.
या घटनेत जखमी झालेल्या तालिब शेखला काल रात्री जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण प्रकृती जास्तच नाजूक असल्यामुळे आज सकाळी त्याला एका खासगी रुग्णालयात हलवण्यात आलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement