Nashik News : नाशिक जिल्ह्यात मराठा आंदोलनाची धग, श्रीकांत शिंदेचा दौरा रद्द, पळसेतील गळीत हंगाम कार्यक्रमाला येणं टाळलं!
Nashik News : खासदार हेमंत गोडसे यांच्या नेतृत्वाखाली नाशिक सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगामाचा शुभारंभ होणार होता.
नाशिक : मराठा आंदोलनाची धग दिवसेंदिवस वाढत असून नाशिक जिल्ह्यातही याचे तीव्र पडसाद उमटू लागले आहेत. अशातच शिंदे पळसे येथील नाशिक सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगाम शुभारंभ प्रसंगी खासदार श्रीकांत शिंदे हे उपस्थित राहणार होते. मात्र मराठा आंदोलनाच्या गावबंदीमुळे त्यांचा दौरा रद्द करण्यात आला असून त्याच्यासोबत दादा भुसे, हेमंत गोडसे यांचाही दौरा रद्द करण्यात आला आहे. साधुसंत, शेतकऱ्यांच्या उपस्थितीत शुभारंभ होणार आहे.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेले आंदोलन तीव्र होत असून राज्यभरात मराठा समाज एकवटला आहे. नाशिक जिल्ह्यातही असंख्य गावांना पुढाऱ्यांना गावबंदी केली असून जिल्ह्यात एकही कार्यक्रम होणार नाही, असा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान आज खासदार हेमंत गोडसे यांच्या नेतृत्वाखाली नाशिक सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगामाचा शुभारंभ होणार होता. यासाठी प्रमुख उपस्थिती शिवसेना शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे हे उपस्थित राहणार होते. मात्र सध्याच्या तणावाच्या परिस्थितीमुळे खासदार श्रीकांत शिंदे यांनी कार्यक्रमाला येणं टाळलं आहे. त्याचबरोबर पालकमंत्री दादा भुसे, खासदार हेमंत गोडसे हे देखील उपस्थित राहणार नसल्याचे समोर आले आहे.
नाशिक जिल्ह्यातील असंख्य गावात राजकीय नेत्यांना बंदी घातली असून अशा स्थितीत खासदार हेमंत गोडसे यांच्या नेतृत्वाखाली पळसे येथील साखर कारखान्याचा गळीत हंगामाचा शुभारंभ होणार होता. यासाठी श्रीकांत शिंदे, पालकमंत्री दादा भुसे हे देखील उपस्थित राहणार होते. मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आंदोलनाचा धसका घेत श्रीकांत शिंदे, पालकमंत्री दादा भुसे, खासदार हेमंत गोडसे या तिघांचे दौरे रद्द करण्यात आले आहेत. मराठा समाजाच्या भावनांचा विचार करून दौरा रद्द केल्याचे खासदार गोडसे यांच्याकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. त्याचबरोबर साधुसंत, शेतकऱ्यांच्या उपस्थितीत गळीत हंगामाचा शुभारंभ होणार आहे.
नाशिकमध्ये आज मशाल रॅली, कँडल मार्चचे आयोजन
नाशिकच्या जिल्हा न्यायालयासमोर शिवतीर्थावर अखंडितपणे 45 दिवसापासून सुरू असलेलं साखळी उपोषणाचे रूपांतर आमरण उपोषणात झाले आहे. उपोषणकर्ते नाना बच्छाव आमरण उपोषणास सकाळी बसले आहे. दरम्यान यावेळी सकल मराठा समाजावतीने पुन्हा आवाहन केले की शहरात ग्रामीण भागात कुठल्याही आमदार, खासदार, नेत्याने, मंत्र्याने कार्यक्रम घेऊ नये. यापुढं नाशिक शहर जिल्ह्यात कार्यक्रम होणार नाही ही काळजी घ्या असेही सांगितले. तसेच 30 ऑक्टोबर रोजी नाशिकच्या शिवस्मारक उपोषण स्थळापासून मराठा आरक्षणासाठी मशाल रॅली काढण्यात येणार आहे. या रैलीत मोठ्या संख्येने मराठा बंधू,भगिनी, तरुण, विद्यार्थी यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.
इतर महत्वाची बातमी :