एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

मराठा आरक्षण! नांदेड जिल्ह्यात एसटीचे चाक थांबले, आतापर्यंत 55 ते 60 लाखाचे नुकसान

Maratha Reservation : पोलिसांच्या सूचनेनुसार एसटी बस (ST Bus) बंद करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती बसस्थानक प्रमुख यासिन खान यांनी दिली आहे.

नांदेड : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) आंदोलनाचा फटका एसटी महामंडळाला बसला आहे. कालपासून एसटीच्या सगळ्या फेऱ्या रद्द झाल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहे. नांदेड डेपोची बस नागपूरला जात असतांना पैनगंगेच्या पुलावर अज्ञाताकडून पेटवून देण्यात आली होती. तर, ग्रामीण भागात जाणाऱ्या बसवर दगडफेक देखील करण्यात आली होती. त्यामुळे, या सर्व पार्श्वभूमीवर पोलिसांच्या सूचनेनुसार एसटी बस (ST Bus) बंद करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती बसस्थानक प्रमुख यासिन खान यांनी दिली आहे. परिणामी महामंडळाचे आतापर्यंत 55 ते 60 लाखाचे नुकसान झाले असल्याची माहिती देखील त्यांनी दिली आहे. 

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभरात आंदोलन सुरु असून, याचे पडसाद नांदेडमध्ये देखील पाहायला मिळत आहे. नांदेड जिल्ह्यातील शेकडो गावात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण करण्यात येत आहे. असे असतांना काही ठिकाणी या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याचे सुद्धा दिसत आहे. शनिवारी नांदेड जिल्ह्यातील हदगांव तालुक्यातील मार्लेगांव जवळ रात्री अज्ञात लोकांनी एसटी बस थांबवून पेटवून दिली होती. तर, रविवारी पुन्हा एक बसवर दगडफेक करण्यात आली. नांदेडच्या माहूर तालुक्यातील आष्टा फाटा इथे अज्ञात मंडळीने एसटी बसेसवर दगडफेक केलीय. यात एसटी बसेसच्या काचा फुटून नुकसान झालंय. त्यामुळे पोलिसांच्या सुचनेनुसार आता जिल्ह्यातील एसटी बसेस बंद करण्यात आल्या आहेत. 

काय म्हणाले अधिकारी...

दरम्यान, याबाबत प्रतिक्रिया देतांना एसटी महामंडळाचे अधिकारी यासिन खान म्हणाले की. “सध्या नांदेड आगारच्या बसेस बंद ठेवण्यात आल्या आहेत. तसेच, नांदेड जिल्ह्यातील इतर सर्वच आगारातील बस देखील बंद आहे. मराठा आरक्षणासाठी सुरु असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर एसटी बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. रविवारी किमान 10 लाखाचे नुकसान झाले.  हदगांव तालुक्यात पेटवण्यात आलेल्या एसटी बसचे 30 ते 35 लाखाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे एकूण 55 ते 60 लाखांचे नुकसान झाले आहेत. त्यामुळे या सर्व पार्श्वभूमीवर एसटी बसेस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे एसटी महामंडळाचे अधिकारी यासिन खान म्हणाले.

नांदेड जिल्ह्यातील 9 आगारातील 547  बसेस जागेवरच 

माहूर परिसरात रविवारी सकाळी बसवर दगडफेक करण्यात आली. त्यामुळे एसटी महामंडळाने आंदोलनातील संभाव्य नुकसान टाळण्यासाठी काही दिवस एसटी बस सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार नांदेड जिल्ह्यातील 9 आगारातील 547 बसेस जागेवरच अडकून पडल्या आहेत. तर याचा फटका प्रवाशांना बसतांना पाहायला मिळत आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या: 

मराठवाड्यात आंदोलन पेटलं! जालन्यात तहसीलदाराची गाडी फोडली; संभाजीनगर हिंगोली,परभणी, नांदेड लातूर जिल्ह्यातील एसटी सेवा बंद

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

गृहखातं सोडाच, पण शिवसेनेतील 'या' 4 नेत्यांना मंत्रिमंडळात घेण्यास भाजपचा आक्षेप, एकनाथ शिंदे काय करणार?
गृहखातं सोडाच, पण शिवसेनेतील 'या' 4 नेत्यांना मंत्रिमंडळात घेण्यास भाजपचा आक्षेप, एकनाथ शिंदे काय करणार?
Eknath Shinde: एकनाथ शिंदेंच्या मनात नेमकं काय चाललंय? मोबाईल रेंज नसलेल्या दरे गावात मुक्काम, मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
भाजपचा गृहखात्याला नकार, एकनाथ शिंदे संध्याकाळपर्यंत मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
Ind vs Aus 2nd Test : ज्याची भीती होती तेच झाले...! पिंक बॉल टेस्टमधून स्टार वेगवान गोलंदाज बाहेर, संघाला मोठा धक्का
ज्याची भीती होती तेच झाले...! पिंक बॉल टेस्टमधून स्टार वेगवान गोलंदाज बाहेर, संघाला मोठा धक्का
 ...तर मी आमदारकीचा राजीनामा देईल,EVM चं समर्थन करत पहिल्यांदा आमदार झालेल्या भाजप नेत्याचं चॅलेंज
इव्हीएम अन् आयोगावर ठाम विश्वास, शंका निर्माण झाल्यास राजीनामा देत पुन्हा निवडणूक लढवेल, भाजप नेत्याचं चॅलेंज
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Eknath Shinde Satara : एकनाथ शिंदे दरे गावात, महायुतीची बैठक कधी होणार?TOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 30 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  8 AM : 30  नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 8 AM :  30 नोव्हेंबर  2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
गृहखातं सोडाच, पण शिवसेनेतील 'या' 4 नेत्यांना मंत्रिमंडळात घेण्यास भाजपचा आक्षेप, एकनाथ शिंदे काय करणार?
गृहखातं सोडाच, पण शिवसेनेतील 'या' 4 नेत्यांना मंत्रिमंडळात घेण्यास भाजपचा आक्षेप, एकनाथ शिंदे काय करणार?
Eknath Shinde: एकनाथ शिंदेंच्या मनात नेमकं काय चाललंय? मोबाईल रेंज नसलेल्या दरे गावात मुक्काम, मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
भाजपचा गृहखात्याला नकार, एकनाथ शिंदे संध्याकाळपर्यंत मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
Ind vs Aus 2nd Test : ज्याची भीती होती तेच झाले...! पिंक बॉल टेस्टमधून स्टार वेगवान गोलंदाज बाहेर, संघाला मोठा धक्का
ज्याची भीती होती तेच झाले...! पिंक बॉल टेस्टमधून स्टार वेगवान गोलंदाज बाहेर, संघाला मोठा धक्का
 ...तर मी आमदारकीचा राजीनामा देईल,EVM चं समर्थन करत पहिल्यांदा आमदार झालेल्या भाजप नेत्याचं चॅलेंज
इव्हीएम अन् आयोगावर ठाम विश्वास, शंका निर्माण झाल्यास राजीनामा देत पुन्हा निवडणूक लढवेल, भाजप नेत्याचं चॅलेंज
आंबेडकरी समाज 6 डिसेंबरला दु:खात बुडालेला असतो, महायुतीचा 5 डिसेंबरचा शपथविधी पुढे ढकला, 'या' नेत्याची राज्यपालांकडे मागणी
आंबेडकरी समाज 6 डिसेंबरला दु:खात बुडालेला असतो, महायुतीचा 5 डिसेंबरचा शपथविधी पुढे ढकला, 'या' नेत्याची राज्यपालांकडे मागणी
Maharashtra CM : शपथविधीसाठी निवडलेले एक मैदान, जिथे दोनवेळा शपथविधी झाला, दोन्ही वेळा सरकार कार्यकाळ पूर्णच करू शकलं नाही
शपथविधीसाठी निवडलेले एक मैदान, जिथे दोनवेळा शपथविधी झाला, दोन्ही वेळा सरकार कार्यकाळ पूर्णच करू शकलं नाही
Sanjay Gaikwad : आमचे केंद्रीय मंत्री माझ्यासोबत नव्हते, त्यांनी विरोधकांना मदत केली; शिंदेंच्या आमदाराचा प्रतापराव जाधवांवर थेट आरोप
आमचे केंद्रीय मंत्री माझ्यासोबत नव्हते, त्यांनी विरोधकांना मदत केली; शिंदेंच्या आमदाराचा प्रतापराव जाधवांवर थेट आरोप
Numerology : अत्यंत अतिशहाणे असतात 'या' जन्मतारखेचे लोक; दुसऱ्यांना लेखतात कमी, स्वत:चंच म्हणणं करतात खरं
अत्यंत अतिशहाणे असतात 'या' जन्मतारखेचे लोक; दुसऱ्यांना लेखतात कमी, स्वत:चंच करतात खरं
Embed widget