Kalyan Dombivli : 'डोंबिवलीचा पाकीटमार अन् क्या होगा माजदार'; श्रीकांत शिंदे आणि मनसेच्या राजू पाटील समर्थकांमध्ये व्हिडीओ वॉर
Shrikant Shinde Vs Raju Patil : कल्याण-डोंबिवलीमध्ये शिवसेना आणि मनसेत सुरू असलेल्या ट्विटर वॉरनंतर आता व्हिडीओ वॉरही सुरू झाले आहे.
ठाणे: कल्याण-डोंबिवलीमध्ये (Kalyan Dombivli Lok Sabha Election) शिवसेना शिंदे गट आणि भाजपच्या (BJP) वादानंतर आता शिवसेना आणि मनसेमध्ये (MNS) वाद सुरू झाल्याचं दिसून येतंय. शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांनी मनसेचे आमदार राजू पाटील (Raju Patil) यांच्यावर टीका केल्यानंतर आता या दोघांच्या समर्थकांमध्ये सोशल मीडियावर व्हिडीओ वॉर सुरू झाले आहे. त्यामध्ये शिवसेनेने राजू पाटील यांचा 'डोंबिवलीचा पाकीटमार' असा उल्लेख केल्यानंतर मनसेने त्याला उत्तर देत 'आपका क्या होंगा माजदार' अशा आशयाचा व्हिडीओ व्हायरल केला.
खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी एका कार्यक्रमांमध्ये मनसे आमदार राजू पाटील यांच्यावर जोरदार टीका केल्यानंतर डोंबिवलीमध्ये मनसे-शिवसेना मध्ये ट्विटर वॉर सुरू झाले. आता मनसेकडून राजू पाटील यांनी केलेल्या विकासकामाच्या उद्घाटनांच्या फोटोंची रील बनवून सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला. तर दुसरीकडे या रीलला प्रत्युत्तर देण्यासाठी शिवसेनेने आमदार राजू पाटील यांचा छेडछाड केलेला फोटो सोशल मीडियामध्ये व्हायरल केला. या फोटोच्या मागे काही पोलीस उभे असून आमदार राजू पाटील यांना काही पोलिसांनी पकडले आहे आणि त्या फोटोच्या खाली डोंबिवलीचा पाकीटमार अशा कमेंट केल्या आहेत.
शिवसेनेने व्हायरल केलेल्या या फोटोंमध्ये मनसे आमदार राजू पाटील यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका करण्यात आली आहे. तर त्याला उत्तर म्हणून दुसरीकडे मनसे कार्यकर्त्यांनी 'आपका क्या होंगा माजदार' या आशयाचा व्हिडीओ रील तयार करून सोशल मीडियावर व्हायरल केली आहे.
त्यामुळे ट्विटर वार कुठे संपत नाही तोच आता सोशल मीडियावर एकमेकांचे उणे-दुणे काढतानाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
दरम्यान, खासदार श्रीकांत शिंदे आणि आमदार राजू पाटील हेदेखील एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. श्रीकांत शिंदे यांनी राजू पाटील यांच्यावर टीका केल्यानंतर त्याला राजू पाटील यांनीही उत्तर दिलं आहे.
एक "नाथ" आहे घरी म्हणून ही मुजोरी ?...
— Raju Patil ( प्रमोद (राजू) रतन पाटील ) (@rajupatilmanase) October 3, 2023
बापाने पॉकेट मनी म्हणून MMRDA ,MSRDC ,चा निधी दिला म्हणून करोडोच्या बाता ? कामाने उत्तर दिले असते तर समस्या उरल्याच नसत्या, रेल्वेच्या प्रवाश्यांना रोज मरणयातना भोगाव्या लागल्या नसत्या.#काहीही_हा_श्री
ही बातमी वाचा :