एक्स्प्लोर

फडणवीसांनी महाराष्ट्र नासवला, दादा भुसे गोट्या खेळतात का? सुषमा अंधारेंच्या भाषणातील ठळक मुद्दे

Sushma Andhare Speech : दसरा मेळाव्यातून सुषमा अंधारे यांनी देवेंद्र फडणवीस, दादा भुसे आणि एक्साईज मंत्री शंभूराज देसाई यांच्यावर सडकून हल्लाबोल केला. सुषमा अंधारे यांच्या भाषणातील ठळक मुद्दे पाहूयात..

Sushma Andhare Speech : शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare Live) यांनी आज शिवसेना दसरा मेळाव्यातून (Shivsena Dasara Melava live) टीकास्त्र सोडले. सुषमा अंधारे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) आणि दादा भुसे (dada Bhuse) यांच्यावर कडाडल्या. त्यांनी नाशिक ड्रग्ज प्रकरणावरुन सरकारला घेरले. देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्र सोडले. दसरा मेळाव्यातून सुषमा अंधारे यांनी देवेंद्र फडणवीस, दादा भुसे आणि एक्साईज मंत्री शंभूराज देसाई यांच्यावर सडकून हल्लाबोल केला. सुषमा अंधारे यांच्या भाषणातील ठळक मुद्दे पाहूयात..

सुषमा अंधारे यांच्या भाषणातील ठळक मुद्दे 

हा महाराष्ट्र ड्रग्स मुक्त झाला पाहिजे. हा महाराष्ट्र नाश मुक्त झाला पाहिजे. 10 ऑक्टोबरला नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात ड्रग्स जप्त केलं.  नाशिकमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात ड्रग्स सापडतय तर पालकमंत्री काय करतायत. नाशिकला एवढ्या कोटींचा साठा मिळत असताना नाशिकचा पालकमंत्री गोट्या खेळतोय का, असे म्हणत  दादा भुसेंवर टीका केली. 

दहा दिवसांपासून मला नोटीस पाठवणारे मला अंधारात सेटलमेंटची भाषा करतायत. नाशिकचा अमोल परदेशी पुण्याच्या एकीला फोन करतो. मला नाही अब्रू आणि मी कशाला घाबरू, अशी ग्रामीण भागात म्हण आहे. 

दबाव आणतात घाबरवतात, अब्रुनुकसानीचा दावा टाकायचा... ज्यांना महाराष्ट्राच्या अब्रुची जाण नाही, ते मला नोटीस पाठवणार का ? मला नाही अब्रु अन् मी कशाला घाबरु, अशी गावाकडे म्हण आहे.. यांचेही असेच काम आहे..

हे धमकावत राहतात आणि फडणवीस म्हणतात सर्वांचे आवाज बंद होतील. गृहमंत्री साहेब ललित पाटील आमचा होता अशी बदमाशी का करतायत? शिवतीर्थावरून विचारते आहे की 9 महिने त्याला कोणता आजार होता की त्याला ससूनला ठेवले ? गरोदर महिला सोडून कोणालाच एवढे दिवस ठेवत नाहीत. 
 
पक्ष, संघटना, जात, धर्म याचा कोणताच प्रश्न नाही. महाराष्ट्रातील कोणताच तरुण व्यसनाधीन झाला नाही पाहीजे, अशी माझी भूमिका आहे..

काही जण देवेंद्र फडणवीस यांना चाणक्या म्हणतात... पण मला हे पटत नाही.. शरद पवार आणि बाळासाहेबांनी मोठ्या नेत्यांना घडवले.. देवेंद्र फडणवीस यांनी कुणाला घडवले... त्यांनी फक्त जमवले. देवेंद्र फडणवीस मोठ्या महाशक्तीचे नेते आहेत. तुम्ही लोकांना जमवले नाही, तोडले. पंकजा मुंडे, खडसे यांना संपले.. आता चंद्रकांत पाटील यांना संपवण्याचा प्रयत्न सुरु आहे. 

तुमच्याकडे सगळे काही असताना तुम्ही शिवसेना, राष्ट्रवादीमधून उचलेगिरी का करतात ? तुमचा मोठा पक्ष अन् संघटना आहे तर आमच्याकडील रेडीमेल माल का उचलता... तुम्ही कसले चाणक्य ? 

देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र नासवला आहे. महाराष्ट्रात राहून, महाराष्ट्राचे खाऊन मराठी लेकींना धमकावण्याचे काम एका अमराठी माणसाने केले. देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना सांगावे. 

सुषमा अंधारे म्हणजे अंगार भंगार नाही, शिस्तीत राहा, उडू नको... चळवळीतून आलेली मुलगी आहे. धमक्यांना घाबरत नाही. 

सुषमा अंधारे चळवळीतून आली आहे, बाळासाहेबांचं बाळकडू आहे.. आमदार, कोट्यवधीशांना तुम्ही नडला असाल पण मध्यमवर्गीयांना कधी नडला नसाल.. ड्रग्ज मुक्त महाराष्ट्राचा लढा देते आहे, फडणवीस तुम्ही फेल ठरले आहात.. सरळ सरळ प्रश्नांची उत्तरे द्या.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour Sanjay Raut : 'तो' आरोप राऊतांना महाग पडला? दुसरी जेलवारी थोडक्यात टळली?ABP Majha Headlines : 11 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सDubai Sheikh Wife Bikini Special Report : पत्नीला बिकिनीत पाहण्यासाठी केला 400 कोटींचा चुराडाPune Metro Inauguration Special Report :दौरा रद्द झाला, मेट्रोचं लोकार्पण रखडलं; पुणकरांना जाम खटकलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
Embed widget