एक्स्प्लोर

Chhagan Bhujbal : मराठा समाज भुजबळांविरोधात आक्रमक, येवल्यात भुजबळांच्या फोटोंची तोडफोड, शाई फेकली!

Nashik News : मंत्री छगन भुजबळांच्या (Chhagan Bhujbal) फोटोंची तोडफोड करण्यात आली असून फोटोंवर शाईफेक करण्यात आली आहे. 

नाशिक : मराठा समाजाचे (Maratha Andolan) आंदोलन दिवसेंदिवस आक्रमक होताना दिसत असून राज्यातील अनेक पक्षाची कार्यालये फोडण्यात आली आहे. अशातच येवल्याच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत लावलेले मंत्री छगन भुजबळांचे (Chhagan Bhujbal) फोटो काढण्यात आले आणि या फोटोंची तोडफोड करण्यात आली असून या फोटोंवर शाईफेक करत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. 

आज मंगळवार रोजी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांच्या उपोषणाचा सातवा दिवस असून दुसरीकडे मराठा आंदोलन (Maratha Reservation) चांगलंच पेटल्याचे पाहायला मिळत आहे. मराठवाड्यातील जिल्ह्यातील आंदोलनाची धग कायम असून जाळपोळीसह गाड्यांची तोडफोड करण्यात येत आहे. तर इकडे पुणे, नाशिकमध्ये (Nashik) देखील मराठा समाज आक्रमक झाला आहे. आज दुपारी आमदार सीमा हिरे (Sima Hiray) यांच्या कार्यालयाला टाळे लावण्यात आले. तर मंत्री छगन भुजबळ यांच्या येवला मतदारसंघांमध्ये देखील मराठा समाज चांगलाच आक्रमक झाल्याचा पाहायला मिळत आहे. आता काही वेळापूर्वी येवला (Yeola) कृषी उत्पन्न बाजार समितीतील छगन भुजबळ यांच्या फोटोंची तोडफोड करण्यात आली असून शाई फेकून निषेध करण्यात आला आहे.

मराठा आरक्षण (Maratha Aarakshan) मागणीवरून राज्यभरात आंदोलन होत असून नाशिक जिल्ह्यात येवल्यात देखील त्याचे पडसाद उमटताना दिसून येत आहे. राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या येवला मतदारसंघात मराठा समाज आक्रमक झाला असून कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये असलेल्या छगन भुजबळ यांचे फोटो काधनून टाकण्यात आले असून त्यांची तोडफोड करण्यात आली आहे. त्याचबरोबर त्या फोटोंवर शाई फेकून भुजबळांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आल्याचे दिसून आले. तसेच पंचायत समिती, जगदंबा माता देवस्थान कोटमगाव, अंदरसुल ग्रामपंचायत तसेच अधिक विविध शासकीय व निमशासकीय कार्यालयातील मंत्री छगन भुजबळ यांच्या लावलेल्या प्रतिमा काढून त्यावर शाही फेकून निषेध करण्यात आला आहे. 

भुजबळ संपर्क कार्यालयावर पोलीस बंदोबस्त...

मराठा समाजाला आरक्षण मिळावे याकरता मराठा आंदोलन हे ठीक ठिकाणी आक्रमक होत असून मराठवाडा भागात लोकप्रतिनिधींचे घर व कार्यालय लक्ष करण्यात आले. बीड येथे आमदार प्रकाश सोळंके यांच्या घरांवर आंदोलकांनी दगडफेक करत जाळपोळ केल्याची घटना घडल्याने खबरदारी म्हणून मुंबई व नाशिक येथील मंत्री छगन भुजबळांच्या निवासस्थानावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आल्यानंतर भुजबळांच्या येवला मतदारसंघातील संपर्क कार्यालयावर देखील सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्याचबरोबर नाशिक शहरातील भुजबळ फार्मवर देखील पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 

इतर महत्वाची बातमी : 

मराठ्यांना जिंकायचं आहे पण ते तुमच्या सोबतच! शिवव्याख्यात्याचं मनोज जरांगेंना अंगावर काटा आणणारे पत्र

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Crime News: गुटखा तस्करीचा 'हायटेक' फंडा, रिमोट दाबताच वाहनाच्या नंबर प्लेटवर यायचा काळा पडदा; 'असा' झाला भांडाफोड
गुटखा तस्करीचा 'हायटेक' फंडा, रिमोट दाबताच वाहनाच्या नंबर प्लेटवर यायचा काळा पडदा; 'असा' झाला भांडाफोड
Supriya Sule: 'आम्हाला फक्त मनसेमध्ये पाठवायचं बाकी राहिलंय'; पक्षांतराच्या चर्चांवर सुप्रिया सुळेंचा खोचक टोला, म्हणाल्या, 'आता राष्ट्रवादीचे खासदार...'
'आम्हाला फक्त मनसेमध्ये पाठवायचं बाकी राहिलंय'; पक्षांतराच्या चर्चांवर सुप्रिया सुळेंचा खोचक टोला, म्हणाल्या, 'आता राष्ट्रवादीचे खासदार...'
Uddhav Thackeray Operation Tiger: 5 कोटींचं आमिष, 'ऑपरेशन टायगर'च्या वावड्या उठताच उद्धव ठाकरेंची मोठी ॲक्शन, खास शिलेदाराला तडकाफडकी नाशिकला पाठवलं; नेमकं काय घडतंय?
5 कोटींचं आमिष, 'ऑपरेशन टायगर'च्या वावड्या उठताच उद्धव ठाकरेंची मोठी ॲक्शन, खास शिलेदाराला तडकाफडकी नाशिकला पाठवलं; नेमकं काय घडतंय?
Operation Tiger: आम्हाला कोणत्याही एजंटची गरज नाही, गोकुळ गीतेंना उबाठाने मतदान केलं, ते आता शिंदे साहेबांसोबत, त्यामुळे...; 'ऑपरेशन टायगर'वर शिंदेसेनेतील नेत्याचं मोठं विधान
आम्हाला कोणत्याही एजंटची गरज नाही, गोकुळ गीतेंना उबाठाने मतदान केलं, ते आता शिंदे साहेबांसोबत, त्यामुळे...; 'ऑपरेशन टायगर'वर शिंदेसेनेतील नेत्याचं मोठं विधान

व्हिडीओ

Sanjay Raut Vs Devendra Fadnavis Special Report : राऊतांनी डिवचलं, बावनकुळे, फडणवीसांना शुभेच्छा
Sanjay Raut PC : फडणवीस केंद्रात, मुख्यमंत्री बावनकुळे होतील, राऊत हसले अन् थेट बोलले
Nashik Operation Tiger Special Report : ठाकरेंच्या नगरसेवकांना ऑफर? नाशिकमध्ये एकीची वज्रमूठ
Devendra Fadnavis on Karjmafi : 50 हजार रुपयांऐवजी 2 लाखांपर्यंत कर्जमाफी मिळणार
SIR Form Maharashtra : SIR चा फॉर्म कसा भरायचा? संपूर्ण माहिती

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur News : तुकाराम मुंढे यांचा धडाका! 37 हजार लिटर भेसळयुक्त दूध जागेवरच ओतलं, सांगोल्यातील 'अजिंक्यराणा' केंद्रावर कारवाई
तुकाराम मुंढे यांचा धडाका! 37 हजार लिटर भेसळयुक्त दूध जागेवरच ओतलं, सांगोल्यातील 'अजिंक्यराणा' केंद्रावर कारवाई
Rajpal Yadav : 85 कोटींची संपत्ती, 1200 कोटींचे प्रोजेक्ट... तरीही फक्त 9 कोटींसाठी राजपाल यादव तुरुंगात जाणार!
85 कोटींची संपत्ती, 1200 कोटींचे प्रोजेक्ट... तरीही फक्त 9 कोटींसाठी राजपाल यादव तुरुंगात जाणार!
'आम्ही तुम्हाला सर्वांसमोर उघडे पाडू...' न्यायालयाची महाराष्ट्र सरकारला 'सर्वोच्च' फटकार! न्यायालयाने इतका संताप का व्यक्त केला?
'आम्ही तुम्हाला सर्वांसमोर उघडे पाडू...' न्यायालयाची महाराष्ट्र सरकारला 'सर्वोच्च' फटकार! न्यायालयाने इतका संताप का व्यक्त केला?
Team India Coach: टीम इंडियाच्या कोचिंग स्टाफमध्ये मोठा फेरबदल होणार; गंभीर गुरुजींचे दोन सहकारी सोडून जाण्याची शक्यता!
टीम इंडियाच्या कोचिंग स्टाफमध्ये मोठा फेरबदल होणार; गंभीर गुरुजींचे दोन सहकारी सोडून जाण्याची शक्यता!
Crime News: रात्रीपासून शोधत होते, मध्यरात्री बांधकाम सुरू असलेल्या मॉलमध्ये सापडला चिमुरडीचा मृतदेह! संपवण्याआधी नको ते केलं अन्...
रात्रीपासून शोधत होते, मध्यरात्री बांधकाम सुरू असलेल्या मॉलमध्ये सापडला चिमुरडीचा मृतदेह! संपवण्याआधी नको ते केलं अन्...
चार मिनिटांचा थरारक Video: थारला ATM बांधून सेंटरमधून उखडलं, खेचून नेताना दोरी तुटली, तिघांना जागेवरून हलेना, नोटा सुद्धा निघता निघेनात, शेवटी तिथंच टाकून फरार!
चार मिनिटांचा थरारक Video: थारला ATM बांधून सेंटरमधून उखडलं, खेचून नेताना दोरी तुटली, तिघांना जागेवरून हलेना, नोटा सुद्धा निघता निघेनात, शेवटी तिथंच टाकून फरार!
Nashik Crime News: गुटखा तस्करीचा 'हायटेक' फंडा, रिमोट दाबताच वाहनाच्या नंबर प्लेटवर यायचा काळा पडदा; 'असा' झाला भांडाफोड
गुटखा तस्करीचा 'हायटेक' फंडा, रिमोट दाबताच वाहनाच्या नंबर प्लेटवर यायचा काळा पडदा; 'असा' झाला भांडाफोड
तब्बल 12 तास हायवे बंद, तुफान दगडफेक! भाजपने माजी गृहमंत्र्यांना पोटनिवडणुकीत तिकिट नाकारताच हिंसेचा आगडोंब, कार्यकर्त्यांचा हैदोस; एसपीसह 8 पोलिस जखमी, कलम 163 लागू करण्याची वेळ
तब्बल 12 तास हायवे बंद, तुफान दगडफेक! भाजपने माजी गृहमंत्र्यांना पोटनिवडणुकीत तिकिट नाकारताच हिंसेचा आगडोंब, कार्यकर्त्यांचा हैदोस; एसपीसह 8 पोलिस जखमी, कलम 163 लागू करण्याची वेळ
Embed widget