एक्स्प्लोर

मराठ्यांना जिंकायचं आहे पण ते तुमच्या सोबतच! शिवव्याख्यात्याचं मनोज जरांगेंना अंगावर काटा आणणारे पत्र

Maratha Reservation : तिकडे आंतरवाली सराटी मध्ये त्या मनोज जरांगे पाटलांच्या जीवाला काही बरं वाईट झालं तर मराठ्यांच्या घराघरातील मनोज जरांगे कोलमडून पडेल, तो सैरभैर होईल.

Manoj Jarange Patil News : आज महाराष्ट्रातील लाखो मराठ्यांच्या घरामध्ये जेवणाचं ताट समोर आलं की तोंडातला घास घशाखाली उतरत नाही, हे वाक्य आहे रायगडमधील शिवव्याख्याते प्रशांत देशमुख यांनी जरांगेंना लिहिलेल्या पत्रातील. मनोज जरांगे पाटील मागील सहा दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी (Maratha Reservation) बेमुदत उपोषण करत आहेत. 40 दिवसांची मुभा दिल्यानंतरही सरकारने आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावला नाही, त्यामुळे जरांगे पाटील पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहेत. प्रशांत देशमुख यांनी जरांगे पाटील यांना पत्र लिहिलेय, त्यांनी काळजी घेण्याचे आवाहनही केलेय. फक्त मराठ्यांनाच नव्हे जीवनात प्रामाणिकपणे  संघर्ष करणाऱ्या प्रत्येकालाच तुम्ही हवे आहात.मराठ्यांना जिंकायचं आहे पण ते तुमच्या सोबतच! असेही त्यांनी पत्रात म्हटलेय. 

पत्रात काय म्हटलेय ?

शिवव्याख्याते प्रशांत देशमुख यांनी मनोज जरांगे पाटलांना पत्र लिहून प्रकृतीची काळजी घेण्याची विनंती केली. आज महाराष्ट्रातील लाखो मराठ्यांच्या घरामध्ये जेवणाचं ताट समोर आले की तोंडातला घास घशाखाली उतरत नाही, कारण डोळ्यासमोर उभी राहते ती आंतरवाली सराटीमधील मनोज जरांगे-पाटलांची आकृती. त्यांची शरीरयष्टी, पांघरूण अंगावर घेऊन तक्क्यावर निपचित पडलेले शरीर, माईकवर बोलताना थरथरणारा हात, बसलेला आवाज आणि डोळ्यात दिसणारी मराठा आरक्षणाची काळजी. मात्र सध्याच्या घडीला मराठ्यांच्या आरक्षणाच्या प्रश्नाबरोबरच जरांगे-पाटलांची सुरक्षितता लाखो मराठ्यांच्या दृष्टीने महत्त्वाची असल्‍याचे देशमुख यांनी पत्रात नमूद केले.

सिर सलामत तो पगडी पचास - 

आत्ताच्या घडीला मराठ्यांच्या आरक्षणाच्या प्रश्नापेक्षाही  मनोज जरांगे पाटलांच्या जीवनाची सुरक्षितता लाखो मराठ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचीआहे. 'सिर सलामत तो पगडी पचास' एक मनोज जरांगे पाटील असतील तर मराठ्यांच्या आरक्षणाचाच प्रश्न काय, पण भविष्यात मराठ्यांच्या विकासाचे अनेक प्रश्न मार्गी लागण्याची आशा जिवंत राहील, असे देशमुखांनी विनंती केलीय. 

जीवाला बरं वाईट झालं तर...

तिकडे आंतरवाली सराटी मध्ये त्या मनोज जरांगे पाटलांच्या जीवाला काही बरं वाईट झालं तर मराठ्यांच्या घराघरातील मनोज जरांगे कोलमडून पडेल, तो सैरभैर होईल. त्याची आशा संपेल,तो निराशेच्या गर्तेत जाईल, अविचाराची वाट धरेल, चुकीच्या मार्गाने पेटून उठेल, अशी भीतीही प्रशांत देशमुख यांनी व्यक्त केली. 


प्रशांत देशमुख यांचं पत्र जसेच्या तसे - 

प्रति,
 आदरणीय मनोज जरांगे -पाटील
 आंतरवाली सराटी, जालना.

आज महाराष्ट्रातील लाखो मराठ्यांच्या घरामध्ये जेवणाचं ताट समोर आलं की तोंडातला घास घशाखाली उतरत नाही, कारण डोळ्यासमोर उभी राहते ती आंतरवाली सराटी मधील मनोज जरांगे पाटलांची आकृती, त्यांची शरीरयष्टी, पांघरूण अंगावर घेऊन तक्क्यावर निपचित पडलेला चोळामोळा झालेला  देह, माईक वर बोलताना थरथरणारा हात, बसलेला आवाज आणि डोळ्यात दिसणारी मराठा आरक्षणाची काळजी.

आत्ताच्या घडीला मराठ्यांच्या आरक्षणाच्या प्रश्नापेक्षाही  मनोज जरांगे पाटलांच्या जीवनाची सुरक्षितता लाखो मराठ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचीआहे. 'सिर सलामत तो पगडी पचास' एक मनोज जरांगे पाटील असतील तर मराठ्यांच्या आरक्षणाचाच प्रश्न काय, पण भविष्यात मराठ्यांच्या विकासाचे अनेक प्रश्न मार्गी लागण्याची आशा जिवंत राहील. खूप काळानंतर मराठ्यांच्या प्रश्नासाठी प्रामाणिकपणे लढणारे नेतृत्व भेटतय असं आता कुठे वाटत चाललंय. त्यामुळे या नेतृत्वाची जपणूक महत्त्वाची आहे.

चौरी चौरा येथील घटना घडल्यानंतर महात्मा गांधींनी ही काही कालावधीसाठी आंदोलन मागे घेतलं होतं. छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला शिकवलं आहे की लढायचं ते मरण्यासाठी नाही, तर लढायचं ते जिंकण्यासाठीच. त्यासाठी वेळ पडली तर गनिमी काव्याने दोन पावलं मागे यायची ती पुन्हा एकदा उसळून झेप घेण्यासाठी.

तिकडे आंतरवाली सराटी मध्ये त्या मनोज जरांगे पाटलांच्या जीवाला काही बरं वाईट झालं तर मराठ्यांच्या घराघरातील मनोज जरांगे कोलमडून पडेल, तो सैरभैर होईल. त्याची आशा संपेल,तो निराशेच्या गर्तेत जाईल, अविचाराची वाट धरेल, चुकीच्या मार्गाने पेटून उठेल. मग त्या पेटलेल्या घराघरातल्या मनोज जरांगे पाटलाला कोणालाच थांबवता येणार नाही. मग काय होईल कल्पनाही करता येणार नाही.

आदरणीय मनोज जरांगे पाटील तुमचा जीव आता एकट्याचा जीव राहिला नाही. तुमचा जीव आता महाराष्ट्राचा जीव झालाय. तुमच्या जिवात महाराष्ट्राचा जीव अडकलाय. महाराष्ट्राच्या शांत जगण्यासाठी तुमचं जगणं महत्त्वाचं आहे.

हात जोडून विनंती आहे, काळजी घ्या. फक्त मराठ्यांनाच नव्हे जीवनात प्रामाणिकपणे  संघर्ष करणाऱ्या प्रत्येकालाच तुम्ही हवे आहात.... मराठ्यांना जिंकायचं आहे पण ते तुमच्या सोबतच!

जय शिवराय

शिवव्याख्याते प्रशांत देशमुख.
( हातनोली - रायगड)

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधान परिषद निवडणुकांचा धुरळा; मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण पदवीधर मतदारसंघात कोणात चुरस?
विधान परिषद निवडणुकांचा धुरळा; मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण पदवीधर मतदारसंघात कोणात चुरस?
महायुतीच्या गोटात शिजतंय काय? मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची रात्री उशीरा दीड तास वर्षावर खलबतं
रात्रीच्या बैठकांचा खेळ, महायुतीच्या गोटात शिजतंय काय? मुख्यमंत्र्यांसह, उपमुख्यमंत्र्यांची वर्षावर खलबतं
Nana Patekar :  सुपरस्टार मीच...,तुझ्याकडे कोणीच पाहणार नाही; नाना पाटेकर अनिल कपूरला असं का म्हणालेले?
सुपरस्टार मीच...,तुझ्याकडे कोणीच पाहणार नाही; नाना पाटेकर अनिल कपूरला असं का म्हणालेले?
PM Narendra Modi यांनी शब्दाला जागावं आणि लोकसभा उपाध्यक्षपद विरोधकांना द्यावं : सामना
PM Narendra Modi यांनी शब्दाला जागावं आणि लोकसभा उपाध्यक्षपद विरोधकांना द्यावं : सामना
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Majha Gaon Majha Jilha : गावा-खेड्यातील बातम्या : माझं गाव माझा जिल्हा : 26 June 2024Shivnath Darade on Election : मुंबई शिक्षक मतदारसंघात महायुतीत चढाओढ, शिवनाथ दराडे ExclusiveMahendra Bhavsar Dhule : निवडणुकीत विजय आमचाच, महायुतीचे उमेदवार महेंद्र भावसार यांना विश्वासTOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 26 June 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधान परिषद निवडणुकांचा धुरळा; मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण पदवीधर मतदारसंघात कोणात चुरस?
विधान परिषद निवडणुकांचा धुरळा; मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण पदवीधर मतदारसंघात कोणात चुरस?
महायुतीच्या गोटात शिजतंय काय? मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची रात्री उशीरा दीड तास वर्षावर खलबतं
रात्रीच्या बैठकांचा खेळ, महायुतीच्या गोटात शिजतंय काय? मुख्यमंत्र्यांसह, उपमुख्यमंत्र्यांची वर्षावर खलबतं
Nana Patekar :  सुपरस्टार मीच...,तुझ्याकडे कोणीच पाहणार नाही; नाना पाटेकर अनिल कपूरला असं का म्हणालेले?
सुपरस्टार मीच...,तुझ्याकडे कोणीच पाहणार नाही; नाना पाटेकर अनिल कपूरला असं का म्हणालेले?
PM Narendra Modi यांनी शब्दाला जागावं आणि लोकसभा उपाध्यक्षपद विरोधकांना द्यावं : सामना
PM Narendra Modi यांनी शब्दाला जागावं आणि लोकसभा उपाध्यक्षपद विरोधकांना द्यावं : सामना
Shivaji Maharaj: महाराष्ट्रात आजघडीला शिवाजी महाराजांची निव्वळ उथळ भक्ती, राजकारणापुरता शिवरायांचा वापर: विजय देशमुख
महाराष्ट्रात आजघडीला शिवाजी महाराजांची निव्वळ उथळ भक्ती, राजकारणापुरता शिवरायांचा वापर: विजय देशमुख
PM Modi: सुंभ जळाला, पीळही जाईल! बहुमत गमावल्यावर मोदी जमिनीवर, राहुल गांधींना 'राम राम' करावा लागतोय; 'सामना'तून भाजपवर बोचरी टीका
सुंभ जळाला, पीळही जाईल! बहुमत गमावल्यावर मोदी जमिनीवर, राहुल गांधींना 'राम राम' करावा लागतोय; 'सामना'तून भाजपवर बोचरी टीका
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
Adult Web Series On OTT : फक्त 'मस्तराम'च नाही तर 'या' वेब सीरिजमध्येही हॉट सीन्सचा भडिमार, कुटुंबासह चुकूनही पाहू नका
फक्त 'मस्तराम'च नाही तर 'या' वेब सीरिजमध्येही हॉट सीन्सचा भडिमार, कुटुंबासह चुकूनही पाहू नका
Embed widget