Nashik Rain Dandiya : नवरात्रीचा तुफान जल्लोष, नाशिककरांचा भर पावसात 'दांडिया रास'
Nashik Rain Dandiya : नाशिक (Nashik) शहरातील अनेक भागात उत्साही दांडिया प्रेमींनी (Dandia) भर पावसात दांडिया खेळण्याचा आनंद घेतला.
Nashik Rain Dandiya : नाशिक (Nashik) शहरात दांडिया गरबासाठी (Dandiya) उत्साही वातावरण असताना सायंकाळी पावसाचे (Rain) आगमन झाल्याने भाविकांचा हिरमोड झाला. शहरातील अनेक भागात उत्साही दांडिया प्रेमींनी भर पावसात दांडिया खेळण्याचा आनंद घेतला.
गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने आज दुपारच्या सुमारास जोरदार हजेरी लावली. यामुळे भाविकांचा हिरमोड झाला. मात्र दुपारनंतर उघडीप दिल्यानंतर दांडिया प्रेमींमध्ये उत्साह संचारला होता. असे असताना सायंकाळी पुन्हा पावसाने हजेरी लावल्याने नवरात्रीच्या (Navratri 2022) गरबा दांडियासाठी उत्साही असणाऱ्या भाविकांना उत्साहावर पाणी फेरले आहे. मात्र शहरात सायंकाळच्या सुमारास महिलांनी भर पावसात दांडियाचा आनंद घेतला.
गेल्या दोन दिवसांपासून नाशिक शहरात नवरात्रीचा फिव्हर आहे. दोन वर्षांनंतर निर्बधमुक्त नवरात्री साजरी होत असल्याने नाशिककर उत्साही आहेत. सर्वत्र जल्लोषाचे वातावरण आहे. त्यामुळे अनेक भागात दांडिया रास चे आयोजन मोठ्या प्रमानावर करण्यात आले आहेत. अनेक ठिकाणी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी दांडिया प्रेमींनी जोरदार तयारी देखील केली आहे. एक पार्श्वभूमीवर गेल्या दोन दिवसांपासून शहरातील आयोजित दांडिया रासमध्ये नाशिककर सहभागी होत आहेत.
कोरोनानंतर निर्बंधमुक्त सण साजरे होत असून नवरात्री मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. त्याचप्रमाणे काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या दिवाळी सणाला देखील उत्साहाचे वातावरण आहे. तर नाशिकमध्ये त्याच उत्साहात नवरात्रौत्सव साजरा केला जात आहे. नाशिक शहर नवरात्रीच्या निमित्ताने दिव्यांच्या रोषणाईने आणि आदिशक्तीच्या भक्तीने भारावून गेले आहे. गेल्या दोन तीन दिवसांपासून नाशिकमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत असून सायंकाळी दांडिया गरब्याने नवरात्रीला उधाण आले आहे. दरम्यान अशातच काल सायंकाळी आलेल्या पावसाने दांडिया प्रेमींचा हिरमोड केला. मात्र दांडिया प्रेमींनी पावसाचा आंनद घेत दांडियात सहभाग घेतला. बेधुंद होत नाशिकमधील लहानांपासून ते अबाल वृद्धांपर्यंत सर्वच आनंद घेत आहेत.
परतीच्या पावसाने तारांबळ
दरम्यान यंदा नाशिक जिल्ह्यात अनेक भागात मुसळधार पाऊस बरसला आहे. जाता जाता आता पुन्हा पावसाने शहरात हजेरी लावण्यास सुरवात केली आहे. काही दिवसांपासून उघडीप दिलेल्या पावसाने आज दुपारी हजेरी लावली. त्यानंतर सायंकाळी भाविक दर्शनासाठी बाहेर पडले असतांना पावसाने बरसात केली.यामुळे भाविकांची चांगलीच तारांबळ उडाली. आजचा नवरात्रीचा चौथा दिवस असून नाशिककर गरब्याचा आंनद घेत आहेत. तर आज अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. मात्र या पावसातही नाशिककरांनी गरब्याचा आंनद घेतला. दरम्यान अशातच सायंकाळी आलेल्या पावसाने दांडिया प्रेमींचा हिरमोड केला. मात्र दांडिया प्रेमींनी पावसाचा आंनद घेत दांडियात सहभाग घेतला. बेधुंद होत नाशिकमधील लहानांपासून ते अबाल वृद्धांपर्यंत सर्वच आनंद घेत आहेत.