एक्स्प्लोर

Nashik News : मोक्कार थंडी! निफाड आजही पाच अंशावर, तर नाशिकचा पाराही घसरला 

Nashik News : निफाडचा पारा आजही 5 अंशावर जैसे थे असून नाशिकमध्ये पारा घसरून 7.6 अंशावर पोहचला आहे.

Nashik News : आज पुन्हा नाशिकच्या (Nashik) तापमानात घट होऊन पारा दोन अंशांनी घसरला आहे. तर नाशिक कॅलिफोर्नियात आजही पाच अंश तापमानाची नोंद करण्यात आली आहे. आज नाशिक शहरात 7.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली तर निफाडमध्ये (Niphad) आज पुन्हा 5 अंश सेल्सिअस तापमान (Temperature) नोंदविण्यात आले आहे. 

गेल्या काही दिवसांपासून हवेत गारठा असल्याने सकाळी नऊपर्यंत घराबाहेर निघणे कठीण झाल्याचे चित्र आहे. अशातच आज पुन्हा पारा खाली गेल्याने नाशिकसह जिल्ह्याला हुडहुडी भरली. नाशिक शहरासह जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढला असून मागील चार ते पाच दिवसांपासून हुडहुडीने वेढा घातला आहे. ढगाळ वातावरणाने काढता पाय घेतल्यानंतर आता थंडीचे आगमन झाले असून किमान तापमानाबरोबरच कमाल तापमानातही घसरण झाली आहे.तर सकाळच्या सुमारास थंड वाऱ्यांमुळे दिवसाही नागरिकांना थंडीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे सकाळी नऊ वाजेपर्यंत घरातून बाहेर निघणे कठीण झाले आहे. सकाळी आठ वाजेला निघणारे नोकरदार वर्गही नऊ वाजेला घराबाहेर पडत असल्याचे चित्र आहे. दिवसभर स्वेटर आणि रात्री शेकोटीचा आधार नागरिक घेत आहेत. 

नाशिकमध्ये काल 8.7 अंश तापमानाची नोंद करण्यात आली तर पारा घसरून 7.6 अंशावर पोहचला आहे. तर जिल्ह्याचा कॅलिफोर्निया म्हणून ओळख असलेल्या निफाडला कालच यंदाच्या हंगामातील सर्वात निचांकी तापमानाची नोंद करण्यात आली असताना आजही 5 अंशावर पारा जैसे थे आहे. दरम्यान थंडीची सुरुवात झाल्यानंतर नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन महिन्यात बोचरा थंडीचा अनुभव नाशिककरांनी घेतला. मात्र मागील काही दिवसांपासून किमान तापमान वाढले असले तरी कमाल तापमानात मात्र घसरण पाहायला मिळत होती. म्हणजेच सकाळी नऊ वाजेपर्यंत हवेत गारवा असल्याने नाशिककरांना हुडहुडी भरली आहे. दिवसाही असलेल्या शीतलहरींमुळे वातावरणात गारवा जाणवत आहे, शिवाय शहरासह जिल्ह्याचे तापमान दोन दिवसांपासून चांगलेच घसरले असून बोचऱ्या थंडीचा अनुभव नाशिककरांना मिळत आहे. त्यामुळे सकाळपासून घातलेला स्वेटर दिवसभरही परिधान करावा लागत आहे. 

निफाड नीचांकी तापमानाची नोंद 

तीन दिवसांपूर्वीपर्यंत नाशिकमधील 15.4 अंश सेल्सिअसपर्यंत नोंदवले गेले होते. तर रविवारी हेच तापमान 13.0 अंश सेल्सिअस नोंदवले गेले असताना सोमवारी म्हणजेच काल त्यात पाच अंशांची घसरण झाली. त्यामुळे हे तापमान 8.7 अंश सेल्सिअस नोंदवले गेले. तर आज पुन्हा एका अंशाने तापमान घसरले आहे. दरम्यान निफाडच्या पारा काल अचानक घसरल्यानंतर आज पुन्हा पाचच अंशावर पारा थांबला आहे. आजही निफाचं कुंदेवाडी गहू केंद्रात 5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. तर नाशिक 7.6 अंश तापमानाची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान हवेत गारवा असल्याने प्रचंड थंडी जाणवत असल्याचे चित्र आहे. 

सर्दी, खोकला वाढला...

 गेल्या तीन ते चार दिवसांपासून शहर परिसरात हवेत गारवा वाढला असल्याने शहरात सर्दी खोकल्याचे रुग्ण वाढले आहेत. त्यामुळे क्लिनिकला गर्दी वाढत असून थंडीसह गारवा वाढल्याने सर्दी तापाचे रुग्ण आढळून येत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. बदलत्या वातावरणामुळे तापमानात घसरण होत असून आरोग्याच्या तक्रारीत वाढ झाली आहे. यासाठी घराबाहेर पडताना उबदार कपडे, पाणी पिताना कोमट पाण्याचा वापर करावा, सार्वजनिक ठिकाणी जाताना मास्कचा वापर करावा असे आवाहन डॉक्टरांकडून देण्यात येत आहेत.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Solapur DDC Bank : सोलापूर बँकेत 238 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप; मोहिते-पाटील, दिलीप सोपल, शिंदे बंधूंसह 33 जणांच्या अडचणी वाढल्या
सोलापूर बँकेत 238 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप; मोहिते-पाटील, दिलीप सोपल, शिंदे बंधूंसह 33 जणांच्या अडचणी वाढल्या
विधानसभेची खडाजंगी: करमाळ्यात शिंदेंची जादू चालणार की पुन्हा संजय मामाच करिश्मा दाखवणार; शरद पवारांनीही डाकलाय डाव
विधानसभेची खडाजंगी: करमाळ्यात शिंदेंची जादू चालणार की पुन्हा संजय मामाच करिश्मा दाखवणार; शरद पवारांनीही डाकलाय डाव
Sharad Pawar : मोदींकडून अपेक्षा पूर्ण न झाल्यानं  लोकांनी त्यांना लोकसभेला जागा दाखवली; राज्यातलं सरकार बदलायचा निकाल घ्यावा लागेल : शरद पवार
बळीराजाकडं दुर्लक्ष केलं, शेतमाल आंतरराष्ट्रीय बाजारात पाठवण्यावर बंधनं घातली, शरद पवारांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
लाडक्या बहिणींना देवाभाऊचा विनोदी सल्ला; कुटुंबीयांनी इकडे तिकडे मतदान केल्यास 2 दिवस जेवायला देऊ नका
लाडक्या बहिणींना देवाभाऊचा विनोदी सल्ला; कुटुंबीयांनी इकडे तिकडे मतदान केल्यास 2 दिवस जेवायला देऊ नका
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Chitra Wagh on Nana Patole | नाना पटोलेंचा जुना व्हिडिओ शेअर करत चित्रा वाघ यांचा टोलाABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 08 November 2024Zero Hour Full | दिवाळीनंतरही जोरदार राजकीय फटाके, भुजबळ, मोदी, शाहांनी गाजवला दिवस ABP MajhaPoonam Mahajan Majha Katta : वडील, हत्या आणि राजकारण; 'माझा कट्टा'वर पूनम महाजन यांचे मोठे खुलासे

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur DDC Bank : सोलापूर बँकेत 238 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप; मोहिते-पाटील, दिलीप सोपल, शिंदे बंधूंसह 33 जणांच्या अडचणी वाढल्या
सोलापूर बँकेत 238 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप; मोहिते-पाटील, दिलीप सोपल, शिंदे बंधूंसह 33 जणांच्या अडचणी वाढल्या
विधानसभेची खडाजंगी: करमाळ्यात शिंदेंची जादू चालणार की पुन्हा संजय मामाच करिश्मा दाखवणार; शरद पवारांनीही डाकलाय डाव
विधानसभेची खडाजंगी: करमाळ्यात शिंदेंची जादू चालणार की पुन्हा संजय मामाच करिश्मा दाखवणार; शरद पवारांनीही डाकलाय डाव
Sharad Pawar : मोदींकडून अपेक्षा पूर्ण न झाल्यानं  लोकांनी त्यांना लोकसभेला जागा दाखवली; राज्यातलं सरकार बदलायचा निकाल घ्यावा लागेल : शरद पवार
बळीराजाकडं दुर्लक्ष केलं, शेतमाल आंतरराष्ट्रीय बाजारात पाठवण्यावर बंधनं घातली, शरद पवारांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
लाडक्या बहिणींना देवाभाऊचा विनोदी सल्ला; कुटुंबीयांनी इकडे तिकडे मतदान केल्यास 2 दिवस जेवायला देऊ नका
लाडक्या बहिणींना देवाभाऊचा विनोदी सल्ला; कुटुंबीयांनी इकडे तिकडे मतदान केल्यास 2 दिवस जेवायला देऊ नका
Video: आधी विनंती, नंतर हात धरला; विराट कोहलीच्या चाहत्याने अखेर सेल्फी काढला; व्हिडिओ व्हायरल
Video: आधी विनंती, नंतर हात धरला; विराट कोहलीच्या चाहत्याने अखेर सेल्फी काढला; व्हिडिओ व्हायरल
अमित शाहंनी देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करण्याचे संकेत दिले; उद्धव ठाकरे कडाडले, शिंदे-पवारांवर घणाघाती टीका
अमित शाहंनी देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करण्याचे संकेत दिले; उद्धव ठाकरे कडाडले, शिंदे-पवारांवर घणाघाती टीका
मावळ पॅटर्नवाल्या बापू भेगडेंसह 8 जणांवर कारवाई; राष्ट्रवादीतून हकालपट्टी, तटकरेंकडून पत्र जारी
मावळ पॅटर्नवाल्या बापू भेगडेंसह 8 जणांवर कारवाई; राष्ट्रवादीतून हकालपट्टी, तटकरेंकडून पत्र जारी
अजित पवारांसह 74 राजकीय नेत्यांवर आरोप असलेला शिखर बँक घोटाळा झालाच नाही; पोलिसांची दुसऱ्यांदा कोर्टात धाव
अजित पवारांसह 74 राजकीय नेत्यांवर आरोप असलेला शिखर बँक घोटाळा झालाच नाही; पोलिसांची दुसऱ्यांदा कोर्टात धाव
Embed widget