Nashik NMC Teachers : नाशिक मनपा शिक्षकांचा आक्रमक पवित्रा, शिक्षक उपसंचालक कार्यालयावर मोर्चा
Nashik NMC Teachers : नाशिक (Nashik) शिक्षक संघटना समन्वय समितीच्या वतीने येथील शिक्षण उपसंचालक (Deputy Director Of Education) कार्यालयावर विराट मोर्चा काढण्यात आला.
Nashik NMC Teachers : तीन महिन्यांचा पगार थांबल्यानंतर नाशिक (Nashik) महापालिकेतील शिक्षक (NMC Teachers) आक्रमक झाले असून आज शिक्षक संघटना समन्वय समितीच्या वतीने येथील शिक्षण उपसंचालक (Deputy Director Of Education) कार्यालयावर आमदार सुधीर तांबे (Sudhir Tambe) यांच्या नेतृत्वाखाली विराट मोर्चा काढण्यात आला.
नाशिक मनपाच्या (Nashik NMC) शहर परिसरात सातशेहून अधिक शाळा आहेत. कोरोना काळात (Corona) ऑनलाईन शिकवणी बंद झाल्याने सध्या सर्व शाळा सुरळीत सुरु आहेत. असे असताना मात्र येथील शिक्षकांना तब्बल तीन महिन्यापासून वेतन मिळाले नसल्याचे समोर आले आहे. नाशिक महापालिकेच्या शाळांतील शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी वेतन अनुदानासाठीचा शासन हिस्सा लालफितीच्या फाइलमध्ये अडकल्याने गेल्या तीन महिन्यांपासून या शिक्षकांचे वेतन रखडले आहे. ही आर्थिक घुसमट सहन करण्याच्या पलिकडे गेल्याने शिक्षक संघटनांच्या वतीने आंदोलनाचा इशारा देण्यात आला.
त्यानुसार आज आमदार सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली आज शिक्षण उपसंचालक कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला. आपल्या विविध मागण्यांसाठी शिक्षक संघटना समन्वय समितीच्या वतीने येथील शिक्षण उपसंचालक कार्यालयावर आमदार सुधीर तांबे (Sudhir Tambe) यांच्या नेतृत्वाखाली विराट मोर्चा काढण्यात आला आहे. या मोर्चात नाशिक जिल्हा व इतर जिल्ह्यातून सुद्धा शिक्षक मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. मोर्चानंतर संघटनेच्या वतीने शिक्षण उपसंचालकांना निवेदन देण्यात आले.
बैठकानंतर आश्वासने
शिक्षक संघटना समन्वय समितीच्या माध्यमातून यापूर्वीही अनेक बैठका व निवेदन दिले आहेत. वेतन अनुदान व इतर अनुदाने शिक्षण विभाग मनपा नाशिक यांच्याकडे वर्ग न झाल्यामुळे शिक्षकांना वेतनापासून वंचित राहावे लागत आहे. तसेच सेवानिवृत्त लोकांचे वेतनापोटी आर्थिक हाल अपेष्टा होत असून त्याकरिता दिनांक 12 सप्टेंबर 2022 रोजी लाक्षणिक धरणे मोर्चा व आंदोलन त्याचे शिक्षक संघटना समन्वय समिती नाशिक मनपा यांच्या वतीने पुकारण्यात आला.
अशा आहेत शिक्षकांच्या मागण्या
माहे जानेवारी फेब्रुवारी 2020 फेब्रुवारी 2021 शिक्षक वेतन अनुदान नाही. माहे जून जुलै ऑगस्ट 2022 शिक्षक अनुदान नाही. सेवानिवृत्त शिक्षक शिक्षिका दरमहा पेन्शन साठी अनुदान कमी येते. 30 लोकांचेअंशी करण निधी अद्यापही देण्यात आलेला नाही, तसेच त्यांचा महागाई भत्ता फरक सुद्धा मिळालेला नाही वरिष्ठ वेतन श्रेणी, निवड श्रेणी फरकाची रक्कम अद्याप उपलब्ध झालेली नाही. 2015 पासून वैद्यकीय बिले, रजा पुरवणी बिले यासाठी सुद्धा निधी उपलब्ध करून देण्यात आला नाही. सातव्या वेतन आयोगाचा तिसरा हप्ता व सेवानिवृत्त लोकांची पहिला, दुसरा व तिसरा हप्ता अद्याप देण्यात आलेला नाही.