PM Modi In Shirdi : 'बारा सुसज्ज हॉल, संपूर्ण एसी दर्शन रांग, एकावेळी दहा हजार भाविकांच्या दर्शनाची सोय', पंतप्रधान मोदींच्या हस्ते लोकार्पण
PM Modi In Shirdi : पीएम नरेंद्र मोदी यांच्या हस्ते एक वातानुकूलित सुसज्ज अशी दर्शन रांगेचे लोकार्पण करण्यात आले.
![PM Modi In Shirdi : 'बारा सुसज्ज हॉल, संपूर्ण एसी दर्शन रांग, एकावेळी दहा हजार भाविकांच्या दर्शनाची सोय', पंतप्रधान मोदींच्या हस्ते लोकार्पण Ahmednagar Latest News Inauguration of AC Darshan service at Shirdi Saibaba Temple by Prime Minister Narendra Modi maharashtra news PM Modi In Shirdi : 'बारा सुसज्ज हॉल, संपूर्ण एसी दर्शन रांग, एकावेळी दहा हजार भाविकांच्या दर्शनाची सोय', पंतप्रधान मोदींच्या हस्ते लोकार्पण](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/26/17a46b2b7f026579995f78d141c2a29b1698307035280738_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
शिर्डी : तिरुपती बालाजी मंदिराच्या दर्शन रांगेच्या धर्तीवर असलेली, दररोज दहा हजार भाविकांना दर्शन घेता येईल, अशा पद्धतीची भव्य अशी दर्शन रांग शिर्डीच्या साईमंदिरात साकारण्यात आली असून आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा पार पडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर (Ahmednagar District Visit)आहेत. शिर्डीच्या साई मंदिरात दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात. आणि याच पार्श्वभूमीवर पीएम मोदी यांच्या हस्ते 2018 मध्ये सुसज्ज दर्शन रांगेची पायाभरणी भाविकांच्या सुलभतेसाठी करण्यात आली होती. आणि आता याच दर्शन रांगेचा लोकार्पण सोहळा पार पडतो आहे. त्यामुळे देश विदेशातून येणाऱ्या भाविकांना साईबाबांचं दर्शन घेणे सुलभ होणार आहे. तत्पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शिर्डीच्या साई मंदिरात दर्शनासाठी गेले. यावेळी अर्धा तास मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले होते. त्यानंतर संस्थानच्या वतीने त्यांच भव्य स्वागत करण्यात आले. त्यानंतर शिर्डीच्या दिननदर्शिकेचे प्रकाशन देखील झाले. यानंतर पीएम नरेंद्र मोदी यांच्या हस्ते एक वातानुकूलित सुसज्ज अशी दर्शन रांगेचे लोकार्पण करण्यात आले.
दरम्यान शिर्डीच्या साईमंदिरात रोज हजारोच्या संख्येने भाविक येत असतात. शनिवार, रविवार आणि गुरुवार रोजी त्याचबरोबर सणउत्सवाच्या काळात तर इथली गर्दी ही लाखोंच्या घरामध्ये जात असते. त्यामुळे शिर्डी साई मंदिराबाहेर लांबच लांब रांगा लागलेल्या दिसून येतात. याच रांगेतून भाविकांची सुटका होणार असून आता अत्याधुनिक वातानुकूलित दर्शन रांग असणार आहे. दरम्यान, दोन मजली दर्शन रांग असून पहिल्या मजल्यावर सहा मोठे हॉल असून खालच्या मजल्यावर सहा मोठे मोठे हॉल असणार आहेत. यात एका हॉलमध्ये साधारणतः 800 भाविक एकाच वेळेस थांबू शकतील अशी ही व्यवस्था आहे. म्हणजे एका वेळेत जवळपास 10 हजार भाविक या दर्शन रांगेमधून साईबाबांच्या दर्शनासाठी प्रवास करणार आहेत. विशेष म्हणजे तिरुपती बालाजीच्या धरतीवर ही दर्शन रांग बनवण्यात आलेली आहे.
पीएम मोदींच्या हस्ते लोकार्पण
तसेच येणाऱ्या भाविकांसाठी मोबाईल लॉकरची व्यवस्था करण्यात आलेली आहे. प्रसाधनगृहाची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचबरोबर लाडूचे काउंटर्स असून दर्शनासाठी लागणाऱ्या वस्तूचे देखील काउंटर्स इथे उपलब्ध असणार आहेत. त्याचबरोबर 68 काउंटर्सवर पासेस मिळणार असून 48 काउंटरवर निशुल्क पास मिळणार आहे. तर वीस काऊंटरवर सशुल्क पास भाविकांना दिला जाणार आहे. त्यामुळे जे भाविक सशुल्क दर्शन घेण्यासाठी इच्छुक आहेत, त्यांची देखील व्यवस्था आहेत. जे भाविक धर्म दर्शनासाठी येत असतात त्यांची देखील इथे व्यवस्था केली जात आहे. विशेष म्हणजे 2018 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन झालेलं होतं आणि आज देखील त्यांच्या हस्ते लोकार्पण होत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)