एक्स्प्लोर

PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदनगर दौऱ्यावर; साईबाबांच्या दर्शनासह निळवंडे धरण जलपूजन, असा असणार ए टू झेड दौरा!

PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आज अहमदनगर जिल्ह्याच्या (Ahmednagar District) दौऱ्यावर येत आहेत.

अहमदनगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आज अहमदनगर जिल्ह्याच्या (Ahmednagar District) दौऱ्यावर येत आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी (Shirdi) साईबाबा दर्शनासह दोन ठिकाणी त्यांच्या हस्ते विविध कार्यक्रमांचा लोकार्पण सोहळा होणार आहे. यानंतर शिर्डीजवळील काकडी गावात पंतप्रधान मोदींची सार्वजनिक सभा होणार असून यात 86 लाख लाभार्थ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी वाटपाचे उद्घाटन होणार आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी सुमारे एक वाजता अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी येथील श्री साईबाबा (Shirdi Saibaba) समाधी मंदिरात पूजा करून दर्शन घेतील. पंतप्रधानांच्या हस्ते मंदिरातील नवीन दर्शन रांग संकुलाचे उदघाटन देखील होणार आहे. सुमारे दोन वाजता पंतप्रधान निळवंडे धरणाचे (Nilvande Dam) जल पूजन करून या धरणाच्या डाव्या कालव्याची यंत्रणा राष्ट्राला समर्पित करतील. त्यानंतर सुमारे सव्वा तीन वाजता पंतप्रधान शिर्डी येथे एका सार्वजनिक सभेला उपस्थित राहणार असून आरोग्य, रेल्वे, रस्ते, तेल आणि वायू अशा बहुविध क्षेत्रातील सुमारे 7500 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचे लोकार्पण, पायाभरणी आणि उदघाटन करणार आहेत. पंतप्रधान संध्याकाळी 6.30 वाजता गोव्यात पोहोचतील, त्यांच्या हस्ते 37 व्या राष्ट्रीय स्पर्धांचे उद्घाटन होईल.

पंतप्रधान महाराष्ट्रात पंतप्रधानांच्या हस्ते उदघाटन होणारे शिर्डी येथील नवीन दर्शन रांग संकुल म्हणजे एक वैशिष्ट्यपूर्ण आणि अत्याधुनिक अशी भव्य इमारत असून येथे दर्शनासाठी आलेल्या भक्तांसाठी आरामदायी प्रतिक्षालय बांधण्यात आले आहे. दहा हजारांहून अधिक भाविकांच्या एकत्रित आसनक्षमतेसह या इमारतीत अनेक सुसज्ज प्रतिक्षालये आहेत. यामध्ये कपडे बदलण्यासाठी खोल्या, स्वच्छतागृह, बुकिंग काउंटर, प्रसाद काउंटर, माहिती केंद्र इत्यादी वातानुकूलित सार्वजनिक सुविधांची तरतूद आहे. पंतप्रधानांच्या हस्ते ऑक्टोबर 2018 मध्ये या दर्शन रांग संकुलाची पायाभरणी झाली होती.

86 लाख लाभार्थ्यांना पीएम किसानचा लाभ 

पंतप्रधान निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्याचे जाळे (85 किमी) राष्ट्राला समर्पित करतील. यामुळे जलवाहिन्यांद्वारे थेट पाईप मधून जल वितरण सुविधा उपलब्ध झाल्याने 7 तालुक्यांतील अहमदनगर जिल्ह्यातील 6 आणि नाशिक जिल्ह्यातील एक अशा 182 गावांना याचा लाभ होईल. निळवंडे धरणाची संकल्पना सर्वप्रथम 1970 मध्ये मांडण्यात आली होती. सुमारे 5177 कोटी रुपये खर्चून ते विकसित करण्यात आले आहे. त्यानंतर एका सार्वजनिक सभेदरम्यान, पंतप्रधानांच्या हस्ते नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे उदघाटन होणार आहे. या योजनेमुळे महाराष्ट्रातील प्रधान मंत्री किसान सम्मान निधी योजनेच्या 86 लाख लाभार्थ्यांना दरवर्षी 6000 रुपयांची अतिरिक्त रक्कम देण्यात येणार असल्याने त्यांना लाभ होईल.

अनेक कामांचे लोकार्पण 

पंतप्रधानांच्या हस्ते अहमदनगर शासकीय रुग्णालयामधील आयुष हॉस्पिटलसह अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि लोकार्पण होणार आहे. यात कुर्डुवाडी-लातूर मार्ग रेल्वे विभागाचे विद्युतीकरण (186 किमी); जळगाव ते भुसावळला जोडणारा तिसरा आणि चौथा रेल्वे मार्ग (24.46 किमी), NH-166 (पॅकेज-I) च्या सांगली ते बोरगाव विभागाचे चौपदरीकरण; इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या मनमाड टर्मिनलवर अतिरिक्त सुविधा इत्यादी प्रकल्पांचे उदघाटन होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अहमदनगर शासकीय रुग्णालयामधील माता आणि बाल आरोग्य विभागाची पायाभरणी देखील होईल. या कार्यक्रमादरम्यान पंतप्रधानांच्या हस्ते लाभार्थ्यांना आयुषमान कार्ड आणि स्वामित्व कार्डाचे वाटप होणार आहे

इतर महत्वाच्या बातम्या : 

पंतप्रधान मोदींचा शिर्डी दौरा, साईचरणी नतमस्तक होणार; क्षणोक्षणीचे अपडेट्स एका क्लिकरवर...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Team India Victory Parade : विश्वविजेत्यांची विजयी मिरवणूक, हजारोंच्या संख्येने चाहत्यांची गर्दीAshish Shelar And Rohit Pawar : रोहित पवारांसाठी आशिष शेलार धावले; 'हिटमॅन'ला थांबवलं अन् फोटो काढलाRohit Sharma Meet Family : विजयानंतर रोहित शर्मा आईवडीलांना पहिल्यांदा भेटतो तेव्हा...Ajit Pawar Special Report : बजेटवरुन टीका; अजितदादांचं सडेतोड उत्तर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
Embed widget