एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
नाशिकमध्ये भाजप आमदार, खासदारांना शेतकऱ्यांनी हाकललं
![नाशिकमध्ये भाजप आमदार, खासदारांना शेतकऱ्यांनी हाकललं Nashik Farmers Strike नाशिकमध्ये भाजप आमदार, खासदारांना शेतकऱ्यांनी हाकललं](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/06/03091152/Nashik-Farmers-1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नाशिक: शेतकरी आंदोलनाचं केंद्र आता पुणतांब्यावरुन नाशिककडे वळल्याचं चित्र आहे. कारण नाशिकच्या शेतकऱ्यांनी आता आंदोलन पुढं सुरु ठेवण्याचा निर्धार केला आहे.
आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. तर या बैठकीला हजर असलेल्या भाजप नेत्यांना शेतकऱ्यांनी हकलवून लावलं.
भाजप खासदार हरिश्चंद्र चव्हाण, आमदार बाळासाहेब सानप आणि आमदार देवयानी फरांदे यांना या शेतकऱ्यांनी विरोध केला. या विरोधानंतर हे नेते माघारी फिरले. मात्र हा विरोध शेतकऱ्यांनी नाही, तर राष्ट्रावादीच्या कार्यकर्त्यांनी केलाय असं भाजप नेत्यांनी म्हटलं.
दरम्यान नाशिकमधील संप कायम राहणार असून संपाची दिशा ठरवण्यासाठी उद्या दुपारी 4 वाजता नाशिकच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बैठक होणार आहे. राज्यातील शेतकऱ्यांना या बैठकीचं निमंत्रण देण्यात आलं आहे.
महाराष्ट्रातील शेतकरी उद्या नाशिकमध्ये उपस्थित राहणार असून, उद्या या आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यात येणार आहे.
मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या चर्चेनंतर पुणतांब्याच्या शेतकऱ्यांनी नाशिकच्या शेतकऱ्यांशी चर्चा करणे अपेक्षित होते, मात्र तसे न होता हा निर्णय घेण्यात आल्याने शेतकऱ्यांकडून आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
संबंधित बातम्या
जयाजी सूर्यवंशीचा पुतळा जाळला
नाशिक, पुणतांब्यातील शेतकरी संपावर ठाम
महाराष्ट्र किसान सभा अजूनही संपावर ठाम
साडेबारा ते साडेचार, ‘वर्षा’वर नेमकं काय घडलं?अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
महाराष्ट्र
निवडणूक
व्यापार-उद्योग
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)