एक्स्प्लोर

Mumbai Crime: रागाच्या भरात बाप हैवान झाला, पोटच्या 9 वर्षांच्या पोराला गरम इस्त्रीचे चटके, अमानुष मारहाण अन्.. भाईंदरपूर्वमध्ये भयंकर घटना 

विद्यार्थ्याने संपूर्ण प्रकार सांगितला. शाळा प्रशासनाने संपर्क साधल्यावर वडिलांनी जखमा गिझरच्या गरम पाण्यामुळे झाल्याचे सांगितले.

Mumbai Crime: भाईंदर पूर्व येथून समोर आलेल्या एका धक्कादायक प्रकरणाने परिसर हादरला आहे. अवघ्या 9 वर्षांच्या मुलाने स्वतःच्या वडिलांवर अमानुष छळ आणि मारहाणीचे गंभीर आरोप केल्याने खळबळ उडाली आहे. मुलाच्या शरीरावर गरम इस्त्रीचे चटके दिल्याने त्याच्या शरीरावर जखमा आढळल्याचाही आरोप करण्यात आलाय. काठीने मारहाण आणि उपाशी ठेवण्याचे प्रकार समोर आल्याने या प्रकरणाची गंभीरता वाढली आहे. आईच्या कॅन्सरने झालेल्या निधनानंतर आधीच मानसिक धक्क्यात असलेल्या या मुलाची ओढाताण झाली. शिक्षकांनी शरीरावरील जखमांचे निशाण पाहून विचारपूस केली असता, विद्यार्थ्याने संपूर्ण प्रकार सांगितला. या प्रकारानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करत चौकशीला सुरुवात केली आहे. (Mumbai Crime)

नेमके घडले काय? 

भाईंदर पूर्व येथे राहणाऱ्या 9 वर्षांच्या विद्यार्थ्याने आपल्या वडिलांविरुद्ध शारीरिक व मानसिक छळ केल्याचा गंभीर आरोप केला आहे. विद्यार्थी उत्तर प्रदेश मधील मथुरा भक्ती वेदांता गुरुकुल अँड इंटरनॅशनल स्कुल,येथे इयत्ता तिसरीत शिक्षण घेत असून शाळेच्या वसतिगृहात राहतो.

विद्यार्थ्याच्या म्हणण्यानुसार, 2021 पासून अभ्यासातील किरकोळ चुकांवरून वडील त्याला मारहाण करत होते. 2024 मध्ये आईचे कॅन्सरने निधन झाल्यानंतर त्याला पुढील शिक्षणासाठी उत्तर प्रदेश, वृंदावन येथील गुरुकुलमध्ये पाठविण्यात आले. 

20 डिसेंबर 2025 रोजी शाळेच्या सुट्टीत तो भाईंदर पूर्व येथील घरी आला असता, वडिलांनी अभ्यास व जेवणाच्या कारणावरून वारंवार मारहाण केल्याचा आरोप आहे. कधी पोटभर जेवण दिले जात नव्हते, तर कधी जबरदस्तीने जास्त जेवण करण्यास भाग पाडले जात होते. विरोध केल्यास काठीने, ठोसे-लाथांनी मारहाण केली जात असल्याचे त्याने सांगितले.तसेच, रागाच्या भरात गरम इस्त्रीने शरीरावर चटके दिल्याने अंगावर ठिकठिकाणी जखमा झाल्याचा आरोप आहे.

अंगावर जखमा, चटके....

उपचारासाठी डॉक्टरांकडे न नेता घरीच मलम लावण्यात येत असल्याचेही मुलाने नमूद केले आहे. त्याला घराबाहेर जाऊ दिले जात नव्हते आणि वडील बाहेर जाताना दरवाजाला कुलूप लावत होते, असेही त्याचे म्हणणे आहे. 6 फेब्रुवारी 2026 रोजी पुन्हा शाळेत सोडल्यानंतर शिक्षकांनी शरीरावरील जखमांचे निशाण पाहून विचारपूस केली असता, विद्यार्थ्याने संपूर्ण प्रकार सांगितला. शाळा प्रशासनाने संपर्क साधल्यावर वडिलांनी जखमा गिझरच्या गरम पाण्यामुळे झाल्याचे सांगितले.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Crime: गुंगीचे औषध अन् मद्य पाजलं, दहावीच्या विद्यार्थ्यांकडून 5वी ते 7वीच्या चिमुकल्यांसोबत नको ते कृत्य; समाजकल्याण विभागाच्या वसतिगृहातील संतापजनक प्रकार
गुंगीचे औषध अन् मद्य पाजलं, दहावीच्या विद्यार्थ्यांकडून 5वी ते 7वीच्या चिमुकल्यांसोबत नको ते कृत्य; इगतपुरीच्या समाजकल्याण विभागाच्या वसतिगृहातील संतापजनक प्रकार
Vasai Crime News: 5 ते 6 मद्यधुंद तरुण एकाला लुटायला गेले; रिक्षाचालक मदतीला धावला अन् जीवावर बेतलं, धारदार शस्त्राने हल्ला; 26 टाके पडले, वसईतील घटना
5 ते 6 मद्यधुंद तरुण एकाला लुटायला गेले; रिक्षाचालक मदतीला धावला अन् जीवावर बेतलं, धारदार शस्त्राने हल्ला; 26 टाके पडले, वसईतील घटना
Nashik Crime : बदलापूर स्त्री बीज विक्री प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई; नाशिकच्या मालती IVF सेंटरच्या संचालकाला अटक, आंतरराष्ट्रीय रॅकेटचा उलगडा होणार?
बदलापूर स्त्री बीज विक्री प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई; नाशिकच्या मालती IVF सेंटरच्या संचालकाला अटक, आंतरराष्ट्रीय रॅकेटचा उलगडा होणार?
Raigad Crime News: सहा महिन्यांपूर्वी मामाच्या मुलीसोबत लग्न; घरापासून दोघंही दूर, चारित्र्याच्या संशयातून त्रास अन् माहेरहून पैसे आणण्यासाठी तगादा, शेवटी नको ते घडलं
सहा महिन्यांपूर्वी मामाच्या मुलीसोबत लग्न; घरापासून दोघंही दूर, चारित्र्याच्या संशयातून त्रास अन् माहेरहून पैसे आणण्यासाठी तगादा, शेवटी नको ते घडलं
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Sanjay Raut Mumbai PC : जे काय होईल ते एकमतानेच होईल सातवी जागा मविआ म्हणूनच जिंकू
Raj Thackeray MNS On BMC Ward Committees Election:उद्धव ठाकरेंच्या त्या निर्णयामुळे राज ठाकरे नाराज?
Rajyasabha Election : शरद पवारांना उमेदवारी न दिल्यास भाजप मोठा निर्णय घेणार
Iran–Israel Conflict : इराण इस्त्रायल युद्धाच्या सर्व बातम्या एका क्लिकवर
Iran Drone : इराणी ड्रोनची भरारी, अमेरिकेची उडली भंबेरी? युद्ध अधिक लांबल्यास अमेरिकेची चिंता वाढणार? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Rajya Sabha Election: आधी बिहार काबीज करून दिलं अन् आता केरळ मोहिमेवर; निष्ठा अन् इमानदारीचं फळ राज्यसभेला मिळताच विनोद तावडे काय म्हणाले?
आधी बिहार काबीज करून दिलं अन् आता केरळ मोहिमेवर; निष्ठा अन् इमानदारीचं फळ राज्यसभेला मिळताच विनोद तावडे काय म्हणाले?
Rohit Pawar on VSR: ..तेव्हा एकनाथ शिंदेंचं विमान पाडू अशी धमकी इराण-इराकने दिली होती, रोहित पवारांचा VSR च्या बेजबाबदारपणावर खळबळनजक आरोप
..तेव्हा एकनाथ शिंदेंचं विमान पाडू अशी धमकी इराण-इराकने दिली होती, रोहित पवारांचा VSR च्या बेजबाबदारपणावर खळबळनजक आरोप
Nashik Crime: गुंगीचे औषध अन् मद्य पाजलं, दहावीच्या विद्यार्थ्यांकडून 5वी ते 7वीच्या चिमुकल्यांसोबत नको ते कृत्य; समाजकल्याण विभागाच्या वसतिगृहातील संतापजनक प्रकार
गुंगीचे औषध अन् मद्य पाजलं, दहावीच्या विद्यार्थ्यांकडून 5वी ते 7वीच्या चिमुकल्यांसोबत नको ते कृत्य; इगतपुरीच्या समाजकल्याण विभागाच्या वसतिगृहातील संतापजनक प्रकार
Maharashtra Rajya Sabha Election: राज्यसभेसाठी भाजपकडून चार नव्या चेहऱ्यांना संधी, एका महिलेचाही समावेश, पण केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचं काय?
राज्यसभेसाठी भाजपकडून चार नव्या चेहऱ्यांना संधी, एका महिलेचाही समावेश, पण केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचं काय?
Vasai Crime News: 5 ते 6 मद्यधुंद तरुण एकाला लुटायला गेले; रिक्षाचालक मदतीला धावला अन् जीवावर बेतलं, धारदार शस्त्राने हल्ला; 26 टाके पडले, वसईतील घटना
5 ते 6 मद्यधुंद तरुण एकाला लुटायला गेले; रिक्षाचालक मदतीला धावला अन् जीवावर बेतलं, धारदार शस्त्राने हल्ला; 26 टाके पडले, वसईतील घटना
Iran War Live News: स्पेन, ब्रिटनचा अमेरिकेला इराणविरोधात एअरबेस वापरण्यास थेट नकार; संतापलेल्या ट्रम्पकडून थेट व्यापारबंदीचा इशारा!
स्पेन, ब्रिटनचा अमेरिकेला इराणविरोधात एअरबेस वापरण्यास थेट नकार; संतापलेल्या ट्रम्पकडून थेट व्यापारबंदीचा इशारा!
Iran Dubai Live News: अमेरिकन दुबई दुतावासावर इराणचा हल्ला; अमेरिका आणि इस्रायलचा इराण आणि लेबनॉनवर बॉम्बहल्ला सुरूच, सर्वोच्च नेता निवडणाऱ्या असेंब्ली ऑफ एक्सपर्ट्सच्या इमारतीवरही हल्ला
अमेरिकन दुबई दुतावासावर इराणचा हल्ला; अमेरिका आणि इस्रायलचा इराण आणि लेबनॉनवर बॉम्बहल्ला सुरूच, सर्वोच्च नेता निवडणाऱ्या असेंब्ली ऑफ एक्सपर्ट्सच्या इमारतीवरही हल्ला
Nashik Crime : बदलापूर स्त्री बीज विक्री प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई; नाशिकच्या मालती IVF सेंटरच्या संचालकाला अटक, आंतरराष्ट्रीय रॅकेटचा उलगडा होणार?
बदलापूर स्त्री बीज विक्री प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई; नाशिकच्या मालती IVF सेंटरच्या संचालकाला अटक, आंतरराष्ट्रीय रॅकेटचा उलगडा होणार?
Embed widget