एक्स्प्लोर

Ramdas Athawale : अजितदादांचा घातपात नसून अपघातच; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंची प्रतिक्रिया, राज्यसभेच्या उमेदवारीसंदर्भातही स्पष्टीकरण, म्हणाले....

Ramdas Athawale : अजितदादांचा घातपात नसून तो अपघातच आहे. मात्र या संपूर्ण घटनेची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे.अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी केली आहे.

Ramdas Athawale : “अजितदादांचा घातपात नसून तो अपघातच आहे.” मात्र या संपूर्ण घटनेची (Ajit Pawar plane crash) सखोल चौकशी होणे गरजेचे असून, या संदर्भात सत्य समोर यावे. तसेच संबंधित विमान कंपनीवर योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी केली आहे. राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar Baramati Plane Crash) यांच्या संदर्भातील घटनेबाबत बोलताना रामदास आठवले यांनी भाष्य करत चौकशीची मागणीही त्यांनी केलीय.केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले हे आज (26 फेब्रुवारी) लातूर जिल्हा दौऱ्यावर असून, जिल्ह्यातील विविध कार्यक्रमांना ते उपस्थित राहणार आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांनी शासकीय विश्रामगृह येथे पत्रकारांशी संवाद साधत दौऱ्याचे नियोजन स्पष्ट केले.

स्थानिक स्वराज्य संस्थांमधील प्रभागनिहाय निवडणूक पद्धत बंद करून वार्डनिहाय निवडणूक घेण्यात यावी, अशी मागणीही रामदास आठवले यांनी केली. “आमच्यासारख्या छोट्या पक्षांच्या कार्यकर्त्यांना प्रभागनिहाय निवडणुकीत निवडून येणे अवघड जाते. त्यामुळे याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.

Ramdas Athawale : एनडीएचा घटक पक्ष म्हणून माझी उमेदवारी निश्चित, राज्यसभा निवडणुकीवर स्पष्टीकरण

राज्यसभा निवडणुकीबाबत बोलताना आठवले म्हणाले की, “मी सध्या मंत्रिमंडळात असून एनडीएचा घटक पक्ष म्हणून माझी उमेदवारी निश्चित आहे.” अनेक नावे चर्चेत असली तरी एप्रिल महिन्यात आपला कार्यकाळ संपुष्टात येत असल्याने, काही दिवसांत उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे त्यांनी सांगितले. या संदर्भात कोणतीही शंका नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Rajya Sabha Election: 37 जागांसाठी 16 मार्च रोजी निवडणुका होणार

निवडणूक आयोगाने बुधवारी 10 राज्यांमधील 37 राज्यसभेच्या जागांसाठी निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या. या 37 जागांसाठी 16 मार्च रोजी निवडणुका होणार आहेत. रिक्त जागांपैकी 12 जागांवर एनडीए आहे, तर 25 जागांवर विरोधी पक्षांचा समावेश आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक (7) जागा आहेत, त्यानंतर तामिळनाडू (6) आणि पश्चिम बंगाल आणि बिहार (प्रत्येकी 5) आहेत. शरद पवार, रामदास आठवले, कनिमोझी, तिरुची शिवा आणि राज्यसभेचे उपसभापती हरिवंश, प्रियांका चतुर्वेदी यांचा कार्यकाळ 2 एप्रिल रोजी संपत आहे. 16 मार्च रोजी मतदान होईल आणि त्याच दिवशी संध्याकाळी पाच वाजता मतमोजणी होईल.

Rajya Sabha Election: राज्यसभा निवडणुकीचे सूत्र

  • एकूण आमदारांची संख्या x 100 / (राज्यसभेच्या जागा + 1) = +1
  • 288X100/(7+1)= +1
  • 28800/8= +1
  • 3600= +1
  • 3601
  • एका आमदाराच्या मताचे मूल्य 100 असल्याने, महाराष्ट्रात राज्यसभेची एक जागा जिंकण्यासाठी किमान 36 आमदार आवश्यक आहेत.

 इतर महत्वाच्या बातम्या

Rohit Pawar: बिघडलेले विमान अजितदादांना दिले का? एफआयआर का घेत नाही? क्रिमिनल अँगल का तपासला जात नाही? रोहित पवारांचा संताप

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Aaditya Thackeray : राज्यसभेसाठी शरद पवारांच्या नावाची चर्चा, आदित्य ठाकरेंची तातडीने पोस्ट, अजून काही ठरलं नाही...
राज्यसभेसाठी शरद पवारांच्या नावाची चर्चा, आदित्य ठाकरेंची तातडीने पोस्ट, अजून काही ठरलं नाही...
शरद पवार दिल्लीला जाणारच, मविआकडून राज्यसभेसाठी नावावर एकमत; दोन नेत्यांच्या मध्यस्थीने तोडगा?
शरद पवार दिल्लीला जाणारच, मविआकडून राज्यसभेसाठी नावावर एकमत; दोन नेत्यांच्या मध्यस्थीने तोडगा?
अभिनेत्रीचा लेक कुवेतमध्ये अडकला, भरल्या डोळ्यांनी मुख्यमंत्र्यांना विनंती; एकनाथ शिंदे मदतीसाठी धावले, फोन करुन म्हणाले..
अभिनेत्रीचा लेक कुवेतमध्ये अडकला, भरल्या डोळ्यांनी मुख्यमंत्र्यांना विनंती; एकनाथ शिंदे मदतीसाठी धावले, फोन करुन म्हणाले..
Rajya Sabha Election 2026: लोकसभेत पराभव, आता एकनाथ शिंदे राज्यसभेवर पाठवणार? नाशिकमध्ये जोरदार चर्चा, काय म्हणाले हेमंत गोडसे?
लोकसभेत पराभव, आता एकनाथ शिंदे राज्यसभेवर पाठवणार? नाशिकमध्ये जोरदार चर्चा, काय म्हणाले हेमंत गोडसे?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

CCTV Hack Special Report : सीसीटीव्ही हॅकिंग, ऑपरेशन खामेनींचं प्लनिंग, इस्त्रायलच्या हजारो नजरा
Golesten Palace Special Report : इराणमधील 500 वर्ष जुन्या वास्तूचं गोलेस्टन पॅलेसचं युद्धात नुकसान
Team India Special Report: सूर्याच्या संघाला चंद्राचं ग्रहण, इंग्लंडचा वेळेवरच सराव, टीम इंडियानं मात्र वेळ बदलली
Pakistan Operation Sindoor Special Report : भीती ऑपरेशन सिंदूरची, भाषा बदलली पाकची, पाकिस्तानची झोप उडाली?
Iran Vs America Special Report : इराणचा पलटवार, पश्चिम आशियात हाहाकार, कतारमधील तळ इराणचं लक्ष्य

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pandharpur Viral Video : पंढरपुरात ट्रक चालकाला पोलिसांकडून बेदम मारहाण, नो एन्ट्री कारवाईचा पोलिसांचा दावा, व्हिडीओने खळबळ
पंढरपुरात ट्रक चालकाला पोलिसांकडून बेदम मारहाण, नो एन्ट्री कारवाईचा पोलिसांचा दावा, व्हिडीओने खळबळ
Israel Iran War : दोन दिवसांपूर्वीच पदभार स्वीकारला, इस्त्रायलच्या हल्ल्यात इराणचे नवे संरक्षणमंत्री ठार
दोन दिवसांपूर्वीच पदभार स्वीकारला, इस्त्रायलच्या हल्ल्यात इराणचे नवे संरक्षणमंत्री ठार
Aaditya Thackeray : राज्यसभेसाठी शरद पवारांच्या नावाची चर्चा, आदित्य ठाकरेंची तातडीने पोस्ट, अजून काही ठरलं नाही...
राज्यसभेसाठी शरद पवारांच्या नावाची चर्चा, आदित्य ठाकरेंची तातडीने पोस्ट, अजून काही ठरलं नाही...
Iran Nuclear Radiation Risk : संघर्ष वाढला तर इराणमध्ये न्युक्लिअर रेडिएशनचा धोका? किती देशांना फटका बसणार?
संघर्ष वाढला तर इराणमध्ये न्युक्लिअर रेडिएशनचा धोका? किती देशांना फटका बसणार?
संतापजनक... बदलापुरात 5 रुपयासाठी महिलेला लघुशंकेपासून रोखले; आमदाराचं ठिय्या आंदोलन, गुन्हा दाखल
संतापजनक... बदलापुरात 5 रुपयासाठी महिलेला लघुशंकेपासून रोखले; आमदाराचं ठिय्या आंदोलन, गुन्हा दाखल
Sam Curran : वानखेडे स्टेडियमवर भारतीय चाहत्यांना जल्लोषाची संधी देणार नाही, इंग्लंडच्या सॅम करनचा 'पॅट कमिन्सच्या' स्टाईलमध्ये भारताला इशारा
वानखेडेवर भारतीय चाहत्यांना जल्लोषाची संधी देणार नाही, मैदान शांत ठेवणार,इंग्लंडच्या सॅम करनचा इशारा
मोठी बातमी! शासकीय वसतिगृहांच्या नावातून मागासवर्गीय शब्द हटवला; दोन महापुरुषांची नावे देण्याचा निर्णय
मोठी बातमी! शासकीय वसतिगृहांच्या नावातून मागासवर्गीय शब्द हटवला; दोन महापुरुषांची नावे देण्याचा निर्णय
सोलापुरात रंगणार 4 थी 'महिला महाराष्ट्र केसरी'; तारीख ठरली, मानाची गदा अन् बक्षीस देऊन गौरव
सोलापुरात रंगणार 4 थी 'महिला महाराष्ट्र केसरी'; तारीख ठरली, मानाची गदा अन् बक्षीस देऊन गौरव
Embed widget